कृष्णविवरे | HOW DID WE KNOW ABOUT BLACK HOLES ?
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
1 MB
Total Pages :
27
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
आइज़क एसिमोव -Isaac Asimov
No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE
No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)आकाशातून वेगवेगळ्या ठिकाणांहून येणाऱ्या क्ष-किरणांचा जर
आपण अभ्यास करू शकलो तर त्यावरून अवकाशात कुठे न्यूट्रॉन
तारे आहेत का याबद्दल आपल्याला काहीतरी सांगता येईल. पण यातही
एक अडचण आहे, ती म्हणजे क्ष-किरण आपल्या वातावरणात येऊ
शकत नाहीत. प्रकाश येऊ शकतो पण क्ष-किरण येऊ शकत नाहीत.
सुद्दैवाने, १९५० च्या दशकापासून आपल्या वातावरणापलीकडे,
अंतराळात रॉकेट पाठवण्यात शास्त्रज्ञांना यश आले. या रॉकेटमधील
उपकरणांमुळे अवकाशातील किरणोत्सर्गाचा अभ्यास करणे शक्य झाटे.
१९६३ साळी हर्बर्ट फ्रिडमन या अमेरिकन खगोठशास्त्रज्ञाच्या
सूचनेनुसार क्ष-किरणांचा शोध घेणारी उपकरणे रॉकेटमधून पाठवण्यात
आली. अवकाशातील निरनिराळ्या ठिकाणांहून क्ष-किरण येत असल्याचे
दिसून आले , पण ते न्यूट्रॉन ताऱ्यातून येत होते की आणखी कशातून?
जिथून क्ष-किरण येत होते त्यापैकी एक जागा म्हणजे क्रॅब
नेब्युला' किंवा क्रॅब तेजोमेघ. क्रॅब नेब्युला म्हणजे धूळ आणि वायूचा
पट्टा; १०५४ साली स्फोट झालेल्या एका प्रचंड सुपरनोवाचे अवशेष.
यातच एखादा न्यूट्रॉन तारा असेल का?
हे सांगणे फारच कठीण होते. क्ष-किरण कदाचित गरम धूळ
आणि वायूमधून देखील येत असतील- कदाचित तिथे न्यूट्रॉन तारा
नसेलही.
१९६४ साठी चंद्र या क्रॅब तेजोमेघासमोरून गेला. क्ष-किरण जर
धूळ आणि वायूमधून येत असतील तर त्यांना थोपवण्यासाठी चंद्राला
बराच वेळ लागेल आणि हे क्ष-किरण हळू हळू कमी कमी होत जातील.
मात्र क्ष-किरण जर लहानशा न्यूट्रॉन ताऱ्यातून येत असतील तर चंद्राला
ते अडवण्यास काहीच वेळ छागणार नाही आणि सर्व क्ष-किरण एकदमच
थांबतील.
२८ शोधांच्या कथा । कृष्णविवरे
यावेळी क्ष-किरण हळूहळू कमी होत गेले म्हणजे त्या ठिकाणी
न्यूट्रॉन तारा नसणार असे अनुमान करण्यात आले.
पण ही गोष्ट इथेच संपली नाही. १९३१ साली कार्ल जॅन्स्की या
अमेरिकन अभियंत्याने आकाशातून रेडिओ लहरी येतात असा शोध
लावला होता. रेडिओ लहरी या प्रकाश लहरींसारख्याच असतात फक्त
त्यांची लांबी अधिक असते. काही प्रकारच्या रेडिओ लहरी प्रकाश
लहरींप्रमाणे आपल्या वातावरणात सहज येऊ शकतात आणि कार्ल
जॅन्स्कीने त्यांचाच शोध लावला होता.
१९५०च्या दशकात खगोलशास्त्रज्ञांनी रेडिओ टेलिस्कोप' नावाचे
नवे उपकरण बनवले होते, त्यात या लहरी पकडून त्यांचा अभ्यास
करता येई.
१९६०च्या सुमारास काही खगोलशास्त्रज्ञांच्या असे लक्षात आले
की काही वेळा या लहरी अधिक शक्तिशाली असतात आणि कधी
कधी एकदमच क्षीण होतात. रेडिओ टेलिस्कोपला हया बदल टिपण्यास
पुरेसा वेळ मिळणार नाही इतक्या जलदगतीने हे घडत असे.
१९६७ साली अँथनी हेविश या इंग्रज खगोलशास्त्रज्ञाने हे जलद
होणारे बदल नोंदविले जातील, अशा तऱ्हेचा एक विशेष रेडिओ
टेलिस्कोप तयार केला.
१९६७च्या जुलै महिन्यात या रेडिओ टेलिस्कोपचे काम सुरू झाले.
पहिल्याच महिन्यात जोस्लिन बेल या हेविशच्या विद्यार्थ्याला आकाशातील
एका विशिष्ट ठिकाणाहून येणारे रेडिओ लहरींचे पुंजके किंवा फवारे
(बर्स्ट किंवा पल्स) सापडले. प्रत्येक फवार १/२० सेकंद इतकाच
टिकत होता आणि १.३३७३०१०९ सेकंदाच्या कालावधीने नियमितपणे
येत होता. दोन फवाऱ्यांमधील कालावधीत सेकंदाच्या एक कोटी अंश
इतक्या काळाचाही फरक पडत नव्हता.
शोधांच्या कथा। कृष्णविवरे । २९
User Reviews
No Reviews | Add Yours...