तमस | TAMAS
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Hindi
Book Size :
7 MB
Total Pages :
138
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
भीष्म साहनी - BHISM SAHNI
No Information available about भीष्म साहनी - BHISM SAHNI
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)20 तम
त्या पोषाखात कधी शिट्टीची भर पडायची, कधी तिरंग्याची दोरी लटकत असायची.
दिवस फिरले की मग तो पोषाख धुतलासुद्धा जायचा नाही. जरतेलला कधीच कुठं
काम मिळालं नाही, आणि त्यानंही कधी केलं नाही. प्रचारकाचा मोबदला म्हणून
काँग्रेसच्या कार्यालयातून तो महिन्याला पंधरा रुपये घेत असे. बक्षींनी कधी दुर्लक्ष
केलं की आहे तिथंच उभा राहून भाषण करू लागायचा. मैंदूत एक सणक होती,
त्याच आधारावर आयुष्यातलं दु:ख, कष्ट निभावून न्यायचा. त्याला ना घर होतं ना
दार, ना बायको ना पोरगं, ना काम होतं ना धाम - आठवड्यातून दोनतीनदा तरी
कुठं ना कुठं मार खावा लागायचा. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये बाकीचे लोक जीव
वाचवून पळून जायचे, मात्र तिथं जरनेल निव्वळ सणक म्हणून आपली बारकुळी
सुरकुत्यांनी भरलेली छाती ताणून उभा राहायचा आणि फासळ्या तुडवून घेऊन
परतायचा.
“काश्मिरीलाल उतरव बाबा त्याला. सकाळी-सकाळी तमाशा चालवलाय्,'
या वेळी मेहताजींनी आवाज चढवून सांगितलं. पण मग जरनेल जास्तच खंबीरपणे
उभा राहिला.
“साहेबहो, आम्हाला खेदाने हे सांगावे लागत आहे, की जिल्हा काँग्रेसच्या
प्रधानांनी देशाचा विश्वासघात केलेला आहे. जे वचन आम्ही रावीच्या किनाऱ्यावर
इ, स. १९२९ मध्ये घेतले होते, ते आम्ही मरेपर्यंत पाळू. आपला जास्त वेळ न
घेता मी एवढेच सांगतो, की काँग्रेसच्या नियमांचे उल्लंघन करू शकेल असा एकही
माईचा पूत अजून पैदा झाला नाहीय्. मेहताजी असे कोण लागून गेलेत? आम्ही
त्यांना पाहून घेऊ आणि त्यांचे पिद्दे काश्मिरीलाल, शंकरलाल जीतसिंहसारख्या
गृद्दारांनाही पुरून उरू...”
प्रचंड जोरात हशा पिकला.
“हा काही असं उतरणार नाही, काश्मिरीलालनं हे भूत उभं केलं होतं आणि
तो स्वतःच बक्षीजीच्या कानात सांगू लागला होता, “जर त्याला खाली आणायचा
प्रयत्न केला तर आणखीनच जास्त हट्टाला पेटेल तो.”
बक्षींनी रागानं लालबुंद होऊन काश्मिरीलालकडे पाहिलं.
“गळ्या वाजवल्या की हा आपोआप उतरेल, आपण काळजी करू नक्त.
दोन-तीनदा यळ्या वाजवल्या की तौ स्वतःच आपलं भाषण बंद करील,” म्हणत
काश्मिरीलालनं टाळ्या वाजवल्या. मग इतर लोकांनीही य॒ळ्या वाजवल्या.
“वा वा, फर छान, उत्तमच!”
“साहेबहो, मी आपला जास्त देळ न घेता आपले आभार मानतो. आपण
इतका वेळ धीर धरून आणि आनंदाने माझे तोकडे-मोडके शब्द ऐकून घेतलेत.
तरमस २214
मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की तो दिवस, जेव्हा हिंदुस्तान स्वतंत्र होईल
फारसा दूर नाही. काँग्रेस आपल्या उद्दि्ंमध्ये निश्चित यशस्वी होईल. जी शपथ मी
रावीच्या किनाऱ्यावर...
“छान-छान; खूपच छान!” काश्मिरीलालनं पुन्हा यळ्या वाजवल्या.
“साहेबलोकहो, मी आपले आभार मानतो. मी आपल्यासमोर पुन्हा कधी
तरी उपस्थित राहीन. आता सर्वांनी मिळून माझ्यासोबत नारा लावा: इन्कलाबे|*
उत्तरादाखल दोन-चार जण ओरडले: जिन्दाबाद]”
“का? जेवला नाहीत का? जोरात म्हणा-इन्कलाब]*
आणि प्रचंड जोरात उत्तर आलं.
“जिन्दाबाद!
मग जरनेल काखेत वेताची छडी धरून दगडावरून खाली उत्तरला!
“जिन्दाबाद!” एक आवाज उताराच्या दिशेनंही आला. मास्टर रामदास धापा
टाकत पहाटेच्या धुंधुरक््यातून समोर आला होता.
“ही काय वेळय् यायची? बक्षीजींनी रागात विचारलं.
काश्मिरीलालनं उत्तर दिलं :
“गोऱ्यानं दूध पिऊन य॒कलं, म्हणून वेळ झाला...”
सगळे हसू लागले. पण रामदास धीरगंभीर आवाजात म्हणाला:
“आज प्रभातफेरी होणार नाही.”
“क?”
“आज विधायक कार्य करायचं ठरलं होतं.”
“विधायक कार्याचं कुणी ठरवलं होतं?*
मला गोसावीजींनी काल रात्री सांगितलं, इमामदीनच्या मोहेल्ल्याच्या
मागील भागातल्या गल्ल्यांची साफसफाई करू.”
“उशिरा आलास आणि वर बहाणा करतोस काय?”
“का? मी तर झाडू आणि कुदळी पण तिकडं पोहचवून आलोय. काही रात्रीच
पाठवले होते, काही आज सकाळी तिथं ठेवून आलोय्.” मग तो स्वतःच मोजू
लागला; पाच खुरपे, बारा झाडू, तीन कुदळी, आणि पाच येपल्या तर मी रात्रीच
तिथं देऊन आलो होतो, सगळं सामान शेरखानाच्या घरी ठेवलंय्.”
“आम्हाला तर कुणीच सांगितलं नाही.
“म्हणून तर मी धावत-पळत आलेोय्. मी पहिल्यांदा इथं आलो होतो तेव्हा
इथं कुणीच नव्हतं.'
“मोहल्ल्यामागच्या नाल्या साफ करायच्या? तुझं डोकं फिरलंय का काय?”
User Reviews
No Reviews | Add Yours...