रोगजन्तु | HOW DID WE KNOW ABOUT GERMS

Book Image : रोगजन्तु  - HOW DID WE KNOW ABOUT GERMS

More Information About Authors :

आइज़क एसिमोव -Isaac Asimov

No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov

Add Infomation AboutIsaac Asimov

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

Add Infomation AboutSUJATA GODBOLE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
की ती हलकीशी तापवावी असा पाश्‍चरने सल्ला दिला. यामुळे यीस्टच्या पेशी मारल्या जातील. चांगल्या यीस्टने आपले काम पार पाडले असल्याने त्याची आता जरुरी नव्हतीच आणि वाईट यीस्टने दारू कडवट करण्यापूर्वीच त्यांचाही नाश होईल. दारू उत्पादकांना ही सूचना फारशी रुचली नाही पण तरीही त्यांनी ती अमलात आणली आणि त्याचा इच्छित परिणाम दिसून आला. दारू कडू होणे थांबले आणि दारूउद्योगावरील संकट टळले. तेव्हापासून अयोग्य किंवा वाईट प्रकारचे जिवाणू नष्ट करण्यासाठी पदार्थ तापविण्याच्या क्रियेला पाश्‍चरायझेशन' असे नाव पडले. आपण विकत घेतो ते दूध बहुतेक वेळा अशा प्रकारे 'पाश्‍चराइझ' म्हणजे निर्जंतुक केलेले असते. पाश्‍चरने दारूसंदर्भात केलेले संशोधन हेही स्वयंस्फूर्त निर्मिती अशक्य असल्याची त्याची खात्री पटण्याचे एक कारण होते. जर यीस्टच्या पेशी कि: 3 प. २८ । शोधांच्या कथा । रोगजंतू स्वयंस्फूर्त निर्मिती होत असेल तर यीस्टच्या पेशी मरून गेल्याने काहीच फरक पडायला नको होता. दोन्ही प्रकारची यीस्ट परत उत्पन्न होऊ शकली असती आणि दारू परत कडू झाली असती. खराब किंवा कुजलेल्या कचऱ्यातून सूक्ष्म जिवाणूंची आपोआप वाढ होत नाही, या विषयावरील महत्त्वाच्या संशोधनाला त्याने आता आत्मविश्‍वासाने सुरुवात केली. सूक्ष्म जिवाणू हाताळण्यातील किंवा त्यांच्या वहनातील संभाव्य धोकेही दारूसंबंधीच्या संशोधनातून पाश्‍चरच्या प्रकर्षाने ध्यानात आले. जर थोडीशी कडू दारू चांगल्या दारूत मिसळली गेली तर कडू दारूतील वाईट यीस्ट्ची वाढ होऊन सर्वच दारू कडू होई. समजा, पिंपात भरताना थोडीशी दारू एखाद्या कामगाराच्या हाताला लागली. त्या दारूत जर दारू कडू बनविणारे वाईट प्रकारचे यीस्ट असेल आणि ते जर त्या कामगाराच्या हाताला लागले असेल तरं अनपेक्षितपणे ते चांगल्या दारूत मिसळले जाईल. अशा तऱ्हेने त्या कामगाराने हाताळलेल्या सर्वच दारूत त्याचा प्रदुर्भाव होऊन सर्व दारू कडू होईल. नवीन विभागातील दारूला हात लावण्यापूर्वी प्रत्येक वेळी जर त्या कामगाराने हात धुतले तर हा धोका टाळता येईल. डॉक्टांच्या हातांमुळे रोगांचा प्रसार होत असावा असे जे सेमेल्वेसना वाटले होते ते योग्यच होते. हातावर तर काहीच दिसत नाही असे डॉक्टरांना वाटणेदेखील साहजिकच होते, कारण अशा तऱ्हैने रोग पसरविणारे सूक्ष्म जिवाणू साध्या डोळ्यांना दिसतच नाहीत. त्यावेळी पाश्‍चरंच्या मनातदेखील अशाच प्रकारचे विचार असतील परंतु आजारांमध्ये सूक्ष्म जिवाणूंचा सहयोग असतो हे सिद्ध करेपर्यंत तो काहीच म्हणू शकत नव्हता. क शोधांच्या कथा । रोगजंतू । २९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now