बाल भारती - उत्तम संस्कार कथा - भाग 2 | BAL BHARTI - UTTAM SANSKAR KATHA - TWO

Book Image : बाल भारती - उत्तम संस्कार कथा - भाग 2 - BAL BHARTI - UTTAM SANSKAR KATHA - TWO

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

माधव राजगुरु - MADHAV RAJGURU

No Information available about माधव राजगुरु - MADHAV RAJGURU

Add Infomation AboutMADHAV RAJGURU

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
६. अडाणी बाहेर अंधार पडत होता. माझ्या दारात दिवा लागला होता. दारात मला गेनूबुवा तराळ दिसताच मी आईला बोललो, ““आये ! दारात तराळ आलाय !* माझ्या आईनं तराळाला बघताच डोईचा पदर नीट केला. तोच माझ्या बा नं त्यांना पुसलं, “का वं ! एकाएकी अंधार करून माज्या दारात ?' मग उभ्या उभ्याच गेनूबुवानं आपल्या दंडकीच्या खिशातून पत्र काढलं. ते माझ्या “बा'च्या हातात देता देता म्हणाला, रामा ! तुझ्या नावावर हे पतर आलंय बघ.*' माझ्या बापानं तो कागद हातात घेऊन उलटा-पालटा , करून दाराच्या उजेडात बघितलं. पुढं अंधारात नजर टाकली व अण्णा चितागती झाल्यागत गप्प झाला. माझ्या वडलांना मी ' अण्णा ' म्हणत _ असे. वास्तविक माझ्या बापाच्या. एवढ्या हयातीत त्यांना कुणीच पत्र . असं पाठवलं नसावं. त्यांना कोण कशाला पत्र पाठवणार ? काय खबर आली, सांगावा आला, तर माणसाच्या तोंडीच येणार. तोंडातोंडीचा सांगावा हेच खरं पत्र-टपाल ! पण पोष्टकार्डावर लिहिलेलं पत्र माझ्या बा'ला कधीच आलं नव्हतं. त्यात माझ्या बापानं सरकारी गावकीचं टपाल, कागदपद्राचा लखोटा गावोगाव पाटील -तलाट्याला, महालकरी-मामलदाराला, हवालदार-फौजदाराला गावकीच्या कामात पोहोचता केलेला होता. त्यातच त्यांनी आपल्या आयुष्याचे दिवस खर्ची घातलेले होते; पण स्वतःला म्हणून कुणाचं पत्र आलेलं नव्हतं, हे मला घरात दिसत होतं. त्यांना तसं कुणी पत्र-टपाल धाडत नव्हतं, कुणी तसं धाडण्याचं कारणही नव्हतं. त्यात माझी थोरली बहीण पवित्रा नवऱ्याच्या गादी नांदायला होती. पण तिचं काय़ पत्र येण्याची आशाच नव्हती. आला तर सांगादा, निरोप येणार. त्यात माझ्या बापाची एक मावस बहीण मुंबईला होती. आता तेवढीच बया काय खबर कळवली ऱ्दं . तर पत्रानं कळवणार ! पण तिनंही काय कवा मुंबईला असल्यापासून कागद-पत्र धाडला नव्हता. काय तसं कागद पाठवण्याचं कारणही कधी घडलं नसावं, “पन काईतरी .महत्त्वांचंच असावं अशी ही सगळी वस्तुस्थिती होती. मग गेनूबुवा तराळानं कुणाचा कागद द्यावा ? या विचारात पडून माझ्या वडलानं-अण्णानं लागलीच तराळाला पुसलं, “काय गा, ह्यो कागद मला आलाय म्हंतूच ?** “व्हय रं रामा, तुलाच आलाय !*' वबडलानं हातातलं पत्र पुन्हा उलटं-पालटं बघितलं. त्याला विचारलं, “यात माजं नाव, रामा तात्या असं लिव्हलंय ?*' **तर काय ? त्यात तुजा पत्त्यापण हाय !'' “हे पत्र माजंच हाय म्हण की 1!*' *तर दुसऱ्या कुणाचं न्हाय ! तुजंच हाय बघ. त्यात तराळ बोलता बोलता खाली बसला व वडलाला बोलला, “रामा, जरा चिलीम तरी पेटव ! मग माझा बाप तंबाकूनं चिलीम भरू लागला. तोवर मी त्याचं बोलणं ऐकून बाहेर आलो. कुणाचं पत्र आलं ? म्हणून ते पत्र हातात घेऊन उलटं-पालटं करून पाहिलं. मी लहान होतो. अडाणीच. शाळेत जात नव्हतो. पत्र पाहून माझी वाचा बंदच. काय वाचणार ? मला बाचताच येत नव्हतं. बापानं - अण्णानं चिलीम पेटवली, एक झुरका मारून तराळाच्या हातात चिलीम देत सहज बोलला, ' व्हय गा ! कुणाचा असावा हा कागद ?'*' “कुणाला ठावं ! माझ्या हातात नायकानं दिलं. तेच्यापण हातात पोष्टमननं बाजारात दिलं.*' “पण त्या नायकाला पोष्टमन बाजारात काय बोलला असंल की! उ चिलमीचा झुरका मारून तराळ बोलला, “आता मला का ते ठावं ?* र्य




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now