एका काडातून क्रांति | ONE STRAW REVOLUTION

ONE STRAW REVOLUTION by पुस्तक समूह - Pustak Samuhमासानोबू फुकूओका -MASANOBU FUKUOKAवेणु पळशीकर - VENU PALSHEEKAR

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

मासानोबू फुकूओका -Masanobu Fukuoka

No Information available about मासानोबू फुकूओका -Masanobu Fukuoka

Add Infomation AboutMASANOBU FUKUOKA

वेणु पळशीकर - VENU PALSHEEKAR

No Information available about वेणु पळशीकर - VENU PALSHEEKAR

Add Infomation AboutVENU PALSHEEKAR

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
०२८ एका काडातून क्रांती हवामान व क्रहतुमान यांप्रमाणे कामाचे स्वरूप बदलते. सकाळी आठच्या सुमारास कामाला सुरुवात होते. दुपारच्या जेवणासाठी एक तास सुट्टी असते. कडक उन्हाळ्यात ही सुट्टी दोन ते तीन तासांची असते. काळोख पडायच्या थोडे आधी विद्यार्थी काम संपवून आपापल्या झोपड्यांत परत येतात. पाणी वाहून आणणे, इंधनासाठी लाकूड फोडणे, अन्न शिजवणे, आंघोळीसाठी पाणी तापवणे, बकऱ्यांची काळजी घेणे, कोंबड्यांना दाणापाणी घालणे, कोंबड्यांची अंडी गोळा करणे, मधमाशांच्या पोळ्यांवर लक्ष ठेवणे, जुन्या झोपड्या दुरुस्त करणे व अधून मधून नव्या झोपड्या बांधणे, मिसो' (सोयाबीनची पेस्ट) आणि 'तोफु (सोयाबीनचे दही) तयार करणे यासारखी देनंदिन कामेही शेतीच्या कामाच्या जोडीला असतातच. आपल्या शेतीवाडीवर काम करणाऱ्या सर्व स्वयंसेवक मंडळींसाठी वर- खर्चाकरिता फुकुओका-सान दरमहा १०,००० येन (सुमारे ३५ डॉलर्स) पुरवतात. लहान प्रमाणावर उत्पादन करणे अव्यवहार्य असलेल्या सोयाबीन सॉस, खाद्य तेल आणि इतर गरजेच्या वस्तू विकत घेण्यावर यापैकी बराचसा पैसा वापरला जातो. आपल्या इतर गरजांसाठी मात्र या विद्यार्थ्यांना त्यांनी स्वतः काढलेली पिके, त्या क्षेत्रातील आसपास उपलब्ध असलेल्या गोष्टी व त्यांची स्वतःची अक्कलहुशारी यावर सर्वस्वी अवलंबून रहावे लागते. खुद्द फुकूुओका-सान अनेक वर्षे हेच, अंशतः: आदिम जीवन जगत आले आहेत. आपल्या विद्यार्थ्यांनाही ते हेतुतः हेच जीवन जगायला लावतात. त्यांचा असा विश्‍वास आहे की या प्रकारचे जीवन जगल्यामुळे त्यांच्या अंगी नैसर्गिक शेती पद्धतीसाठी आवश्यक असलेली संवेदनक्षमता विकसित होईल. . फुकुओका-सान ज्या शिकोकु क्षेत्रात राहतात तेथे किनारपट्टीच्या मैदानी प्रदेशात साळ पिकवली जाते आणि सभोवतालच्या डोंगर-उतारांवर संत्र्याच्या बागा आहेत. सव्वा एकर भातशेती आणि साडेबारा एकरांची मंदारिन संत्र्यांची फळबाग हा फुकुओका-सान यांच्या शेतीचा व्याप आहे. एवढी शेती म्हणजे काही फार मोठी आहे असे पाश्चिमात्य शेतकऱ्याला वाटणार नाही. पण या शेतीवरचे सर्व काम हाताने वापरावयाच्या पारंपरिक जपानी औजारांकरवी केले जात असल्यामुळे इतक्या छोट्या जमिनीच्या देखभालीसाठीसुद्धा चांगलेच श्रम करावे लागतात. या विद्यार्थ्यांबरोबर फुकुओका-सान शेतांवर आणि फळबागेमध्ये काम करतात. पण नेमके कोणत्या वेळेला ते विशिष्ट कामाच्या जागेला भेट देणार आहेत ते कोणालाच माहीत नसते. ज्यावेळी ते येतील अशी अंधुकशीसुद्धा अपेक्षा विद्यार्थ्यांना नसते, नेमके त्याच वेळेला अचानक प्रगट होण्याची कला ओळख ०२९ त्यांना अवगत झाल्यासारखी वाटते. अंगात भरपूर जोम असलेले फुकुओका- सान मोठे उत्साही आहेत. या ना त्या गोष्टीबद्दल ते अखंडपणे बोलत असतात. काही वेळा या विद्यार्थ्यांना एकत्र बोलावून, ते करत असलेल्या कामाबद्दल फुकुओका-सान त्यांच्याशी चर्चा करतात. बहुतेक वेळेला तेच काम अधिक सोप्या पद्धतीने व जलद कसे करता येईल याचे दिग्दर्शन करतात; इतर काही वेळेला ते एखाद्या तणाचे जीवनचक्र, फळबागेतील बुरशी रोग अशाविषयी बोलतात. आणि प्रसंगवशात्‌ स्वतःच्या शेतीविषयक अनुभवांचे चिंतन किंवा स्मरण करण्यात ते रमतात. आपल्या तंत्रांचे स्पष्टीकरण देण्याबरोबरच फुकूओका-सान शेतीतील मूलभूत कौशल्यांचेही शिक्षण देतात. शेतीच्या औजारांची योग्य प्रकारे काळजी घेण्याच्या महत्त्वावर ते भर देतात. या औजारांची उपयोनिता दाखवून देण्याचे काम ते सतत न कंटाळता करतात. नैसर्गिक शेती म्हणजे शेतीचे काम निसर्गाने करावे आणि आपण नुसते बसून आरामात ते पहात राहावे अशी समजूत असलेला एखादा नवागत येतो तेव्हा बऱ्याच गोष्टी माहीत असणे व त्याप्रमाणे कृती करणे कसे जरुरीचे आहे याचा धडा फुकुओका-सान त्याला अल्पावधीतच देतात. काटेकोरपणे बोलायचे झाले तर, शिकार करणे आणि कंदमुळे गोळा करणे यालाच फक्त भैसर्गिक' शेती म्हणता येईल. शेती पिकवणे ही एक सांस्कृतिक नवनिर्मिती आहे. त्यासाठी ज्ञान आणि सतत परिश्रम यांची गरज आहे. निसर्गावर जय मिळवून त्याला सुधारण्याऐवजी निसर्गाशी सहकार्य करून फुकुओका-सान शेती करतात हा मूलभूत फरक आहे. हा प्रयोग पाहायला येणारे अनेकजण एखादी दुपार फुकुओकांच्या समवेत घालवण्याच्या हेतूनेच फक्त येतात. फुकुओका शांतपणे त्यांना सर्व शेतीवर हिंडवून आणतात. डोंगराची चढण फुकुओका झपाट्याने चढत आहेत आणि त्यांच्यामागून प्रयोग-दर्शनार्थ आलेले दहा पंघराजण धापा टाकीत येत आहेत, हे काही अनोखे दृश्य नसते. अर्थात सुरुवातीपासूनच इतके लोक या प्रयोगाला भेट देण्यासाठी येत नव्हते. सुरुवातीची अनेक वर्षे जेव्हा फुकुओका-सान आपली पद्धती विकसित करत होते तेव्हा आपल्या खेड्यापलीकडील जगाशी त्यांचा फारच थोडा संबंध येत होता. तरुणपणी आपले ग्रामीण भागातील घर सोडून सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ म्हणून काम करण्यासाठी फुकूुओका-सान योकोहामा शहरी गेले. रोपांवर पडणाऱ्या विविध रोगांसंबंधी संशोधन करून त्यांनी त्या क्षेत्रात नैपुण्य संपादन केले. कस्टम्स खात्यात प्रयोगशाळेत शेतीविषयक पर्यवेक्षक म्हणून त्यांनी काम केले.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now