आरोग्य आणि अंधश्रध्दा - भाग 1 | AROGYA ANI ANDHSHRADHA - PART ONE

Book Image : आरोग्य आणि अंधश्रध्दा - भाग 1 - AROGYA ANI ANDHSHRADHA - PART ONE

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

मनीषा लढ्ढा - MANISHA LADHDHA

No Information available about मनीषा लढ्ढा - MANISHA LADHDHA

Add Infomation AboutMANISHA LADHDHA

संजयकुमार लढ्ढा - SANJAY LADHDHA

No Information available about संजयकुमार लढ्ढा - SANJAY LADHDHA

Add Infomation AboutSANJAY LADHDHA

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
उबदार वातावरण त्याच्यासाठी उत्तम असते. त्यामुळे एकांत असावा, प्रकाश मंद असावा हे उत्तम. अशा वातावरणामुळे इतरांपासून संसर्गाचा धोकाही कमी असतो; पण त्याचा विपरित अर्थ घेऊन त्यांना अंधाऱ्या कोठडीत . अगदी आरोग्यास हानिकारक परिस्थितीमध्ये ठेवले जाते, त्यामुळे हें आनंदाचे _ सुखद दिवस आईला जाचक वाटू लागतात. ७) टाळू लागणे- बाळाला स्तन्यपान करणाऱ्या मातांमध्ये स्तनास सूज येणे व दुधाचे स्त्राव आतमध्ये अडकून वेदनादायक गाठी निर्माण होतात. यास टाळू _ लागणे असे म्हणतात. टाळूचा आणि याचा प्रत्यक्ष काहीएक संबंध नाही. अस्वच्छतेमुळे किंवा स्तनास जखम झाल्यास जंतुंचा शिरकाव दुग्धवाहिनीमध्ये होतो व सूज येते, अशा स्त्रीला थंडी वाजून ताप येणे, छातीत दुखणे सुरू होते. तेव्हा दवाखान्याची आठवण होते व डॉक्टरांना सांगितले जाते- “काही नाही हो, दूध पाजताना टाळू लागली.” त्यावर वेळेवर. ' औषधोपचार न घेतल्यास ऑपरेशन करावे लागते. - भेैेशवकालीन अंधश्रद्धा _ बाळाच्या आगमनानंतर माता-पित्यांनी बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य अयोग्य काय असते, याचे यंथार्थ ज्ञान घेणे गरजेचे असते: पण त्य क्षेत्रात घरातील आज़ी किंव इतर बुजुर्ग व्यक्तीशिवाय कुणाचेही काही चालत नसते. त्यामुळे या महत्त्वाच्या कालखंडामध्ये विविध अंधश्रद्धा वाढवल्या जातात. बाळाच्या पुढील निरोगी जीवनाचे बीज याच कालावधीत पेरले जाते. त्यामुळे या कालखंडास अत्यंत महत्त्व आहे. उ १) टाळू भरणे- बाळाची टाळू लवकर भरावी, यासाठी आई, आजी व दाई यांची टीम अव्याहत प्रयत्नशील असते. टाळूला जास्तीत जास्त तेल लावणे लोणी, साय लावणे इ. प्रकार केले जातात. त्यामुळे उद्भवलेला एक गंभीर प्रकार नुकताच ऐकण्यात आला. एका मातेने आपल्या बाळाची टाळ साय लावून भरली आणि त्यानंतर बाळ झोपी गेले. बाळ एकटे असताना एक मांजर आली व तिने १२ ७ आरोग्य आणि अंधश्रद्धा भाग-१ साय खाण्याच्या नादात अक्षरश: बाळाचा मेंदू ओढून काढला. केवढा भयंकर प्रसंग आहे ! ऐकलं तरी अंगावर काटा येतो खरम्हणजे टाळू म्हणजेमेंदूच्या कवटीच्या हाडातील निसर्गत: असलेली. फट होय. येथील हाडे वयाच्या. अठराव्या महिन्यात जुळून येतात व॒॒ टाळू भरते. टाळूच्या विशिष्ट रचनेमुळे प्रसूतीच्या वेळी बाळाचे डोके प्रसूतीमार्गातून सुलभतेने बाहेर येऊ शकते. तसेच बाळाच्या मेंदूची वाढ होत असते त्यासाठी जागा आवश्यक असते. अशा टाळू निसर्गाच्या विविध योजना असतात. त्यामुळे टाळू भरण्यासाठी दुराग्रह करू नये ) काजळ घालणे - अद्यापी आपल्या कुणाच्याही पाहण्यात काजळ न घातलेले लहान मूल आलेले नसेल, ही खात्री आहे. काजळामुळे डोळे चकचकीत, मोठे निरोगी होतात, असे समजले जाते. निसर्गत: प्रत्येक अवयव निरोगी राहण्यासाठी सर्व उपाययोजना केलेल्या असतात, त्यामुळे केवळ योग्य काळजी घेणे एवढेच आपण केले तरी पुरेसे असते काजळ हे बहुधा अस्वच्छ बोटाने घातले जाते. तसेच त्याच्या दर्जाबद्दलही शंका असते. त्यामुळे जंतूसंसर्ग होण्याची शक्‍यता असते. तसेच डोळ्यांच्या नैसर्गिक रचना व तेथील कार्याचा विचार केल्यास लक्षात येईल की, डोळ्यांत सतत आर्द्रता राहावी व जंतू, केरकचरा यांच्यापासून संरक्षण व्हावे म्हणून अंश्रूंची धार अश्रूग्रंथीपासून तर नाकामध्ये उघडणाऱ्या नलिकेपर्यंत अव्याहतपणे चालू असते. कधी-कधी काजळ या नलिकेच्या मार्गात अडकून पडते व तिथे अश्रू तुंबले जातात. त्यामुळे सूक्ष्मजंतूंची वाढ होण्यास पोषक वातावरण निर्माण होते त्यामुळे डोळ्यांतून सतत पाणी वाहत राहते. तसेच वारंवार सर्दी-पडसे-खोकला होऊ शकतो. म्हणून काजळ डोळ्यांत न घालणे हेच उत्तम ३) नाक, कान, बेंबी येथे तेल सोडण्यावरील प्रत्येक ठिकाणी आवश्यक तेवढी स्निग्धता ठेवण्यासाठी तेलग्रंथींची योजना शरीरात केलेली असते. त्यामुळे वरून आरोग्य आणि अंधश्रद्धा भाग-१ ७०१३




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now