अंटार्टिका खंड | HOW DID WE KNOW ABOUT ANTARCTICA?

HOW DID WE KNOW ABOUT ANTARCTICA? by आइजक एसीमोव - ISAAC ASIMOVपुस्तक समूह - Pustak Samuhसुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

More Information About Authors :

आइज़क एसिमोव -Isaac Asimov

No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov

Add Infomation AboutIsaac Asimov

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

No Information available about सुजाता गोडबोले - SUJATA GODBOLE

Add Infomation AboutSUJATA GODBOLE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
त्या वर्षी जॉन ब्रिस्को या इंग्रज दर्यावर्दी खलाशाला आफ्रिकेच्या बर्‍याच दक्षिणेला प्रथमच किनारपट्टी दिसली. ती अंटार्टिक वर्तुळाच्या सुमारे ९६ किलोमीटर उत्तरेला होती, म्हणजे ती दक्षिणेकडील समशीतोष्ण कटिबंधातच होती. त्याला त्याने 'एंडर्बी लेण्ड' असे त्याच्या जहाजाच्या मालकाचे नाव दिले. अर्थात ही जमीन त्याने काही अंतरावरून पाहिली होती. बर्फामुळे तो प्रत्यक्ष तेथे जाऊ शकला नाही. १८४० साली ज्यूल द्युमाँ दुर्विल या फ्रेंच संशोधकाने ऑस्ट्रेलियाहून दक्षिणेच्या प्रवासाला सुरुवात केली आणि त्याला दिसलेली किनारपट्टी बरोबर अंटार्टिक वर्तुळावरच होती. 'आदेली लॅण्ड' असे आपल्या पत्नीचे नाव त्याने त्या भूप्रदेशाला दिले. जवळजवळ त्याच सुमारास चार्ल्स विल्कीस हा अमेरिकन संशोधक एंडर्बी लॅण्ड आणि आदेली लॅण्ड या दरम्यानच्या लांबच लांब किनाऱ्याने आपले जहाज घेऊन जात होता. ही किनारपट्टी बरोबर अंटार्टिक वर्तुळावरच होती. हिंदी महासागराच्या दक्षिणेला असलेल्या या किनारी प्रदेशाला विल्कीस लॅण्ड म्हणून ओळखतात. परत आल्यावर, यापूर्वीच्या वीस वर्षातील निरनिराळ्या शोधांचा एकत्रित विचार केला असता त्यावरून अंटार्टिक खंडाच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो, असे विल्कीसने सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले. त्याचे म्हणणे कोणालाही पटेल असेच होते आणि ते सर्व संशोधकांनी मानले. सर्वात दक्षिणेकडील हे खंड पूर्णपणे अंटार्टिक प्रदेशात आहे आणि ते कायमच बर्फाच्छादित असते. हे खंड मनुष्यप्राण्यांनी वस्ती करण्यासारखे नाही. आजतागायत केवळ काही संशोधक आणि शास्त्रज्ञच तेथे काही थोड्या काळासाठी वास्तव्य करतात. अंटार्टिका हे नाव या खंडासाठी योग्यच आहे. २८ 1 शोधांच्या कथा । अटार्टिका खंड दक्षिण धुवापर्यंत धट एकदा अंटार्टिका खंडाचा शोध लागल्यावर तेथील शोधकार्य जोमाने सुरू झाले. लोकांना या नव्या खंडाचे सर्व बारकावे समजून घ्यायचे होते. १८४१ सालच्या जानेवारी महिन्यात जेम्स क्लार्क रॉस या स्कॉटिश संशोधकाने अंटार्टिक किनाऱ्याने प्रवास करताना त्यालगतंच्या एका खाडीत प्रवेश केला. न्यूझीलंडच्या दक्षिणेला हा भाग आहे आणि त्याला आता रॉस समुद्र असेच म्हणतात. याच्या पश्‍चिम किनाऱ्याला रॉसने व्हिक्टोरिया लॅण्ड' असे नाव दिले कारण चार वर्षांपूर्वीच इंग्लंडमध्ये व्हिक्टोरिया राणीचा राज्याभिषेक झाला होता. या पश्‍चिम किनाऱ्याला समांतर अशी एक पर्वतांची रांग होती, तिला रॉसने 'प्रिन्स अल्बर्ट पर्वतरांग' असे व्हिक्टोरिया राणीच्या पतीचे नाव दिले. रॉस समुद्रात रॉसने आणखी दक्षिणेकडे प्रवास केला. अखेर ६० ते ९० मीटर उंचीची बर्फाची जणू प्रचंड भिंतच समोर आल्यावर त्याला थांबावे लागले. ही बर्फाची प्रचंड रसच होती. हा बर्फ प्रथम जमिनीवर . तयार झाला होता, पण आणखी बर्फ त्याच्यावर सतत तयार होत गेल्यामुळे तो समुद्रात ढकलला गेला होता. या बर्फाच्या राशीने रॉस समुद्राचा बराचसा भाग व्यापला होता. आता ज्याला रॉस बर्फरास म्हणतात तो प्रदेश जवळजवळ फ्रान्स या देशाइतका मोठा आहे. ज्या ठिकाणी रॉसला ही बर्फरास लागली त्या ठिकाणी जी जमीन शोधांच्या कथा । अंटार्टिका खंड । २९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now