इराव तीच्या गोष्टी | IRAWATI'S STORY

Book Image : इराव तीच्या गोष्टी  - IRAWATI'S STORY

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

श्रीनिवास पंडित - SHRINIWAS PANDIT

No Information available about श्रीनिवास पंडित - SHRINIWAS PANDIT

Add Infomation AboutSHRINIWAS PANDIT

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
स्टेशन सुटलं “माकडु, उठ. आज आपल्याला ट्रीपला जायचंय ना?'' आईनं त्याला हलवलं. माकडुला रात्री उशीरा झोपायची सवयच होती. अगदी डोळे मिरटेपर्यंत तो टिवल्याबावल्या, टाईमपास करत बसायचा. मग सकाळी उठायला व्हायचा उशीर. ''बघितलंस का, कडू-वाकडू कधीचे तयार आहेत.'' 3 वाकडू होता माकडूचा दादा. त्याची शेपूट टोकाला थोडीशी वाकडी होती, म्हणून तो वाकडू; अन्‌ कडू होता त्यांचा मावसभाऊ. त्याला सगळे कडू पदार्थ खूप आवडायचे. ते दोघं माकडूपेक्षा थोडेसे मोठे होते. माकडू होता टोळीत सगळ्यात लहान. म्हणून तो झाला होता लाडोबा. त्यात तो खूप गोंड खायचा, सारखा कडेवर (पोटाशी) बसायचा, त्यामुळे गब्बू झाला होता. आई सोडून बाकी सगळे त्याला लाडूच म्हणायचे.'' ('म्हणजे इरा ना?' ईशान कुजबुजला. बाबानं डोळे वटारले. इरानं ते बोलणं ऐकलं होतं. इतर वेळा तिनं जोरात भोकाड पसरलं असतं, ईशानला मारलं असतं. पण आत्ता गोष्ट ऐकायची म्हणून ती गप्प बसली. ) ट्रीपची आठवण झाल्यावर माकडू पटकन्‌ उठला. आई म्हणाली, लवकर आवर. परवा माझ्या अंगावर शी-शू केलीस. आठवतंय ना? तसं परत केलंस तर याद राख.' उ माकडूनं पटकन आवरलं. त्यांना काय, दात घासायचे नाहीत, आंघोळ नाही की कपडे बदलायचे नाहीत. मज्जा ना? मग माकडूनं इकडे-तिकडे पाहिलं. रात्री ते एका मोठ्या आंब्याच्या झाडावर झोपले होते. त्यांच्या टोळीतली वानरं इकडे-तिकडे बसली होती. कुणी उगाचच एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत होतं, कुणी उन घेत होतं, तर कुणी दुसऱ्याच्या अंगावरच्या उवा शोधून खात होतं. (ई55!)




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now