फुळें आणि कांटे | Phulen Aani Kaante
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
119
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)शश केळकरांचा विनोद
करितां करितां त्यांनीं काढलेलें रॅग्लर परांजप्यांचें शब्दचित्र किती मार्मिक
आणि मजेदार वाटतें.
“ कव्यासारर्न आधुनिक विद्वान हातीं धरण्यास न लाभता तर रघुनाथास
पंत ही पदवी न मिळतां भट्ट ही पदवी मिळाली असती. इंग्लंडांत कॅम नदीच्या
कांठीं साइन थीटा कास थीटा या शब्दांचा पाठ ताडांतून निघण्याऐवजीं मुडी
गांवच्या परसांतील आवारात नारळीपोफळींना पाणी लावीत लावीत वेदांतील
छटचांच्या जटापाठांचीं व घनपाठांचीं त्यांचीं आवतेनें चालती; लसळुशीत
सुगंधी पियसं सोपाऐवजीं नित्य समिध शेकलेल्या अग्निकुंडांतील भरड भस्मच ते
अंगास चर्चीत बसते; कॅब्रिजच्या पदवीधराच्या काळ्यानिळ्या शिपतरी टोपी-
ऐवजीं हिरवी फीत लावलेली, तांबडी बनातीची टोपीच त्यांच्या डोक्यावर राहती;
लॉड कझन यांनीं प्रीढीने वर्णिलिल्या ब्लू रिबनऐबजीं दगडी चातीनें कातलेल्या
व बोजड ब्रह्मगांठ मारलेल्या यज्ञोपवीताचाच ते अभिमान ब्राळगते ! *
लेखकाच्या पहिल्या अपत्याच्या तोंडवळ्यावरून त्याच्या प्रतिभेच्या
स्वरूपाचे बहुधा अनुमान करतां येतें. केळकरांनीं वाळ्मयांत प्रवेश केला तो
“ नवरदेवाची जोडगोळी ? या विनोदी नाटकाच्या द्वारानें. मराठी गद्य रंगभूमि
त्यावेळीं स्वगस्थ देवतांश्ीं गञजना--गोष्टी करणाऱ्या भीमदेवाच्या ताब्यांत
होती. अगा वेळीं शेरिडनच्या विनोदप्रधान नाटकाचे रूपांतर त्या रंगभूमीवर
आणण हे होळीच्या दिवशीं दिवाळी साजरी करण्यासारखेच होतें. पण
विनोदग्रवण प्रवृत्तीमुळे केळकरांनी तें रूपांतर केलें. स्वतंत्र नाटकें लिहिण्याच्या
वेळींहि कलहप्रिय पण सद्ददय नारद व गानलोलुप भित्रा उत्तर यांचींच
कथानके त्यांच्या डोळ्यापुर्दे सहज उभीं राहिलीं, ही गोष्टहि लक्षांत घेण्या-
जोगी आहे.
काव्य काय अथवा विनोद काय, दोन्हींचीहि बुद्धि मनुष्याला उपजतच
असावी लागते. आंधळ्याला कितीहि जाड कांचाचा चष्मा दिला, तरी त्याचा
जसा उपयोग नाहीं, त्याप्रमाणें बहिःसृष्टि व॒अंतःसृष्टि यांतील सौंदर्याचे
संवर्धन करणारी सुसंबद्धता अथवा विनोदविलासाला पोषक असा विसंगतपणा
सूक्ष्मतेने जाणण्याची शक्ति नैसर्गिकच म्हटली पाहिजे, तसें नसतें तर कालि-
दासाच्या काव्यरसांत बुडून कोरडे राहणारे अगर बोलण्याखाण्याखेरीज ओठांना
विभक्त होऊं न देणारे हरीचे लाल जगांत दिसलेच नसते !
User Reviews
No Reviews | Add Yours...