ऋग्वेदांतीळ भक्ति मार्ग | Kragvedaantiil Bhakti Maarg

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : ऋग्वेदांतीळ भक्ति मार्ग  - Kragvedaantiil Bhakti Maarg

More Information About Author :

No Information available about हरी दामोदर वेळणकर - Hari Damodar Velanakar

Add Infomation AboutHari Damodar Velanakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
८० वागणूक; अशी वागणूक तसेंच देवाचें मातेसारखें आत्यन्तिक वात्सल्य व भक्तपालनाची प्रतिज्ञा हींहि संतवाड्मयाप्रमाणेंच त्रग्वेद- सूक्तामध्ये आढळतात. परि० १५ (पृषट्टे ७०-७६ ): यावरून वैदिक भक्तीचें स्वरूप व वेदोत्तर भक्तीचे स्वरूप यांत तत्त्वतः फरक नाहीं; बाह्य स्वरूपांतील फरकाचें कारण पुरुषार्थांच्या बदलत्या कल्पना हेंच आहे, यांत संदेह नाहीं. याशिवाय देवतांच्या मूततिंबद्धतेची कल्पना अद्यापि अपुरी होतीं म्हणून वेदकाळीं सगुण उपासना अशक्य होती व सगुण उपासने- वांचून निर्भीक प्रेमरूप भक्ति वाटूं शकत नाहीं हेंहि एक वैदिक भक्तीच्या भिन्न स्वरूपाचे अन्य कारण आहे. परि० १६ (पृष्ट ७६-८२): चौथ्या मंडलांतील 'चोविसाव्या सूक्तांत मूर्तिपूजेचा उल्लेख आहे असं कांहीं पंडितांचे म्हणणें आहे. पण त्या सृक्ताचा व त्यासारख्या अन्य उताऱ्यांचा नीट बिचार केला असतां ही कल्पना बरोबर नाहीं असेंच दिसून येईल. परि० १७ (पूरे ८२-८४): आमच्या आत्यन्तिक भक्तीची कल्पना व पाश्चात्यांच्या निरतिशय भक्तीची कल्पना यांत मूलगामी भेद आहे. आमच्या आत्यन्तिक भक्तीला भीतीचे, आदराचें वावडे आहे तर पाश्चात्यांच्या आत्यन्तिक भक्तीत उपास्याचा मोठेपणा व भक्ताचे लघुत्व यांचें भान आवश्यक आहे. परि० १८ (पृट्रे ८४-९०): याच भेदामुळें कांहीं पाश्चात्य पंडितांनी ्रवेदांतील भक्ति वरुणसूक्तांतच आढळते, इतर सूृक्तांत ती दिसत नाहीं अशी कल्पना केली आहे. परंतु आम्हां भारतीय आयांच्या कल्पनेची भक्ति इम्ट्रसूक्तांतच दिसते, वरुणसूक्तांत दिसणारी भक्ति ही खालच्या दजाची आहे, ही गोष्ट परि० १७ त सांगितलेला भेद लक्षांत घेतल्यास स्पष्टपणे प्रतीत होण्यासारखी आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now