मराठी बखर गद्य | Maraathii Bakhar Gadya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मराठी बखर गद्य  - Maraathii Bakhar Gadya

More Information About Author :

No Information available about गं. ब. ग्रामोपाध्ये - Gn. B. Gramopadhye

Add Infomation About. . Gn. B. Gramopadhye

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(६) एका भावनात्मकतेची जाणीव होते. “भाऊसाहेबांची बखर ?, किंवा * पानिपतची बखर”? यांत असा अनुभव वरचेवर येतो. ह असें कां व्हावें * प्रत्यक्ष पाहिलेली, व[ कर्णीपकर्णी ऐ[किलेली किंवा जमाविलेली माहिती संगतवार सांगूं इच्छिणाऱ्या बखरींतून कल्पनेनें निर्भिलेल्या कांदबरीचा प्रत्यय कां यावा १ बखरकार हा कितीहि कुल कथनकार असला तरी तो कांहीं कादेबरीकार नव्हे. म्हणजेच त्याने आपल्या कथनाला, बखरलेखना[ला सुरवात करतांच अशा कोणत्या गोष्टी घडतात कीं, त्याच्या लेखणीतून ऐ.तिहयासैक सत्याचें दर्शन होण्याऐवजी वाड्मयीन भावसत्याचें दर्शन घडल्याचा भास व्हावा! अर्थात्‌ येथे एक गोष्ट लक्षांत घेतली पाहिजे कीं, बखरकार हा कांह्दी जाणीवपूर्वक कलानिमिाति करणारा कलावंत ((005- ८1005 87४5८ ) नव्हे ; परंतु बखरींच्या एकंदर घाटावरून व त्यावर चढलेल्या कल्पनेच्या व भावनात्मकतेच्या रंगावरून बखरकार हा एक (00८005ट10प5 2115: आहे असे अनुमान केलें तर वावग होणार नादी. कारण निर्जीव घटना, इतिहासवजा प्रसंग, मृत व्यक्ति इत्यादिकांचे जे कांही तपशील त्यान गोळा केलेले असतात, म्हणजे इतिहासाने जी वस्तुस्थिति त्याच्या डोळ्यांपुढे उभी केलेली असते; तिच्यांतून तो संपूर्ण काल्पनिक साधे निर्माण करीत नसला आणि त्यांतून अखेर कांहीं एक कलात्मक प्रत्यय देत नसला, तरी त्या ऐतिहासिक वस्तुस्थितीला चालती*बोलती करितो, है खास. अर्थात्‌ बखरलेखनामागची प्रक्रिया ही कांहीं ऐतिहासिक कार्दंबरीसारखी असते असं म्हणावयाचे नाही; किंबहुना ती तशी नसतेहि. कारण ऐतिहासिक कादंबरीकार जेव्हां इतिहासाचा उपयोग करतो, तेव्हां तो द्यांतील साराच्या सारा तपशील वापरीत नाहीं. तर उलट त्याला जो परिणाम साधावयाचा असेल त्याला सुसंगत अशांचीच फक्त निवड करतो. अथांत्‌ ही क्रिया त्याच्या कल्पनाशक्तीकडून आपोआप होत असते. या- शिवाय त्या कल्पनाशक्तीकडून वास्तवाबरोबर कांहीं काल्पनिक प्रसंगांची नि व्यक्तींची नि्मितिहि होत असते. कारण त्याच्या दृष्टीने ऐतिहासिक तपश्चिलाला महत्त्व असत नाहीं, तर मागच्या सत्याला, कल्पनेला (1069 ) महत्त्व असते; आणि त्या सत्याचा जता त्याला भावनात्मक प्रत्यय आालेला असतो तसाच भावनात्मक प्रत्यय त्याला वाचकांनाहि द्यावयाचा असतो.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now