ध्वन्याळोक १ | Dhwanyalok 1
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
61 MB
Total Pages :
649
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
पु. ना. वीरकर - Pu. Na. Veerkar
No Information available about पु. ना. वीरकर - Pu. Na. Veerkar
मा. वा. पटवर्धन - Ma. Va. Patavardhan
No Information available about मा. वा. पटवर्धन - Ma. Va. Patavardhan
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)नावाचे एक महाकाव्य लिहिले होते. काशी. आवृत्ति, पू. ३८८ वर संदीये एव
अजनचरिते असे विधान आहे. त्यातलेच पुढील दोन चरण अभिनवगुप्तांती
उद्धृत केले आहेत-- र उ
समृत्थिते धनृर्ध्वनो भयावहे किरीटिनो
महानपप्लवो$भवत् पुरे पुरन्दरद्विषाम् ।
* विषमबाणलीला ' या नावाचे एक प्राकृत काव्यही आनंदवधंनकृतच. आहे.
(पाहा, प्रस्तुत ग्रंथ, पृ. ३१७ व ५३८). या काव्याचा विषय मदनाने त्रलोक्यावर
मिळविलेला विजय हा आहे असे अभिनवगृप्त म्हणतो ( प्रस्तुत ग्रंथ, प. ५३८
पाहा). याशिवाय या काव्यामध्ये काही साहित्यशास्त्रीय विषयांचा सविस्तर
विचार करण्यात आला असावा असे ( काशी आवृत्ति, पृ. ५४० पाहा) विषम-
बाणलीलेसंबंधी आनंदवधंनाने केलेल्या विधानांवरून वाटते.
याखेरीज 'तत्त्वालोक ' नावाचा शास्त्रीय ग्रंथ, धर्म कीर्तीच्या प्रमाणविनिश्चय-
नामक ग्रंथावरील धर्मोत्तरी या टीकेवरची विंवृति हा ग्रंथ व * देवीशतक * नावाचे
स्त्तोत्रपर काव्यही आनंदवर्धनाने लिहिले होते.
काशी आवृत्ति प. ४९९ येथे आनंदवर्धनाने स्वेषु काव्यप्रबन्धेषु असे शब्द
वापरून आपल्या काव्यग्रंथांचा मोघम निर्देश केला आहे. याशिवाय प्रस्तुत ग्रंथ;
पृ. ४९१ व ५३४ येथे ग्रंथांचा निर्देश न॒ करिता यथा वा मसेव असा प्रस्ताव
करून दोन पद्ये उद्धृत केलेली आढळतात. यावरून वर तिदेशिलेल्या काव्यांखेरीज
आणखी काव्ये आनंदवर्धनाने रचली असल्यास नकळे.
ध्वन्यालोक या ग्रंथामध्य कारिका व त्यांवरील वृत्ति असे दोन भाग आहेत.
या दोन भागांच्या कतुंत्वाबाबत विद्वानांत दोन मते प्रचलित आहेत : (१) एक-
कर्तृकत्ववाद--ध्वतिकारिका व वृत्ति हे दोन्ही भाग आनंदवधेन या एकाच लेखकाने
लिहिले. (२) भिन्नकतंकत्ववाद--वुत्ति आनंदवर्धेनानेच लिहिली, पण ती लिहिताना
कारिका हा आधी सिद्ध असलेला भाग त्याच्यापुढे होता, व तो त्याच्या पूर्वींच्या
काव्यशास्त्रज्ञाने लिहिला होता.
या दोन्ही मतप्रवाहांवर विपुल साधकबाधक चर्चा आतापर्यंत निरनिराळ्या
विचारवंतांनी आपल्या ग्रंथांमध्ये व स्फुट लेखांमध्ये केलेली आहे. १९६१ पूर्वी
झालेल्या चर्चेचा सारांश म. म. डॉ. काणे यांनी आपल्या 107 07 8808६0६
2०८४८ (१९६१) या ग्रंथामध्ये प. १६२-१९९ येथे दिला आहे, तो जिज्ञासूंनी
अवश्य पाहावा. या वादविवादातील एकक्तुकत्वपक्ष म. म. कुप्पुस्वामी, डॉ. ए.
शंकरत्, डॉ. सत्कारी मुखर्जी, डॉ. के. सी. पांडे व डॉ. कृष्णमूरति यांनी स्वीकारला
आहे, तर भिन्नकतृंकत्वपक्ष प्रो. एस्. पी. भट्टाचार्य, के. गोदा वर्मा इत्यादि
पंडितांनी स्वीकारला आहे. स्वतः म. म. डॉ. काणे यांनी भिन्नकतेकत्वपक्षाचा
थुरस्कार केलेला आहे. पण इतके करूवही हा प्रशत अद्यापि निकालात निघालेला
(१५) - उपोदघात
User Reviews
No Reviews | Add Yours...