धूमकेतु | DHOOMKETU

DHOOMKETU  by पुस्तक समूह - Pustak Samuhशुभदा न्यायते - SHUBHDA NYAYATE

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

शुभदा न्यायते - SHUBHDA NYAYATE

No Information available about शुभदा न्यायते - SHUBHDA NYAYATE

Add Infomation AboutSHUBHDA NYAYATE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
त्यामुळे धूमकेतूचा मार्ग बदलतो. कधी तो अधिक लंबवर्तु- ळाकारं होतो तर कधी कमी न्यूटन ह्या शास्त्रज्ञाने दाखवले की ज्या धूमकेतूचा वेग सूर्याच्या सर्वात जवळ असताना कमी असेल तर त्याची कक्षा अधिक लंबवर्तुळाकार असते. असा धूमकेतू सूर्याच्या भेटीस पुन्हा येतोच पण धूमकेतूचा वेग सूर्याजवळ जर प्रचंड असेल तर त्याची कक्षा ही खि्रियांच्या केसांतील आकड्याप्रमाणे असते. हा धूमकेतू पुन्हा परत येत नाही रः ह्या सर्व अभ्यासानंतर सुद्धा एखादा धूमकेतू नक्की किती वर्षांनी परत येईल हे कोणी सांगू शकत नव्हते. १६८२ साली . न्यूटनचा मित्र एंडमंड हॅले ह्याने एका तेजस्वी धूमकेतूचा अभ्यास केला. हा धूमकेतू ७८५/७६ वर्षांनी परत येईल असे त्याने सांगि- तले आणि ते खरे ठरले. धूमकेतू त्यांना शोधणाऱ्या शाखज्ञाच्या ' नावाने ओळखले जाऊ लागले. हॅलेचा धूमकेतू १० वर्षांपूर्वी म्हणजे १९८६ साली सूर्याला भेट देऊन गेला. ही आहे धूमकेतूच्या भ्रमणगाथेची कथा . पण पुन्हा पुन्हा हे . धूमकेतू येतात कोठून? असे धूमकेतू आहेत तरी किती? असेही प्रश्न आपल्याला पडतच असतात. धूमकेतूचा जन्म आणि त्याचे अंतरंग आता धूमकेतूचे जन्मस्थान शोधायचे तर ते किती लांबून येतात ते शोधले पाहिजे. १९७३ साली कोहूटेक शाखज्ञाने एक धूमकेतू शोधला. हा धूमकेतू सूर्याच्या अगदी जवळ आला तेव्हा त्याचे सूर्यापासूनचे अंतर होते सुमारे अडीच कोटी मैल. पण हाच ८ “चूमकेतू 8 धूमकेतू जेव्हा सूर्यापासून लांब गेला तेव्हा त्याचे अंतर होते ३३४ अब्ज मैल. त्याला सूर्याभोवती एक फेरी मारायला किती काळ लागतो मांहीत आहे? १ लाख वर्षे! यातून एक गोष्ट लक्षात आली. धूमकेतूचे जन्मस्थान हे हजारो अब्ज मैलांपलिकडे आहे. धूमकेतू सूर्याकडे खेचले जातात ते सूर्याच्या गुरूत्वाकर्षणामुळे. मग सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव जास्तीतजास्त किती दूरपर्यंत आहे? सुमारे २ प्रकाशवर्षे ह्या अंतरापर्यंत. एक प्रकाशवर्ष म्हणजे प्रकाशाच्या किरणाने एका वर्षात पार केलेले अंतर. प्रकाशाचा किरण एका सेकंदात सुमारे तीन लाख किमी. जातो. म्हणजे एक प्रकाशवर्ष > १०४६० अब्ज किमी. एवढे अंतर. डच खगोलशास्त्रज्ञ उर्ट ह्याने नवा सिद्धांत मांडला. सूर्या- पासून साधारण एक ते दीड प्रकाशवर्षे अंतरावर एखाद्या पोकळ चेंडूप्रमाणे धूमकेतूंचे पातळ आवरण आपल्या सूर्यमालिकेभोवती आहे. ते आवरण एखाद्या ढगाप्रमाणे आहे. त्यात अब्जावधी धूमकेतू आहेत. तिथून हे धूमकेतू येत असतात. हा महाप्रचंड धूमकेतूचा ढग आला कोळून? आपल्या सूर्य- मालेचा जन्म सुमारे पाच अब्ज वर्षापूर्वी झाला. तो स्वत:भोवती प्रचंड वेगाने फिरणाऱ्या आणि स्वत:च्याच गुरुत्वाकर्षणामुळे आंकुंचन पावणाऱ्या धुळीच्या आणि वायूच्या प्रचंड ढगापासून झाला. ह्या ढगाच्या केंद्रभागाची घनता आणि उष्णता वाढत गेली. त्यामुळे केंद्राचे तापमान प्रचंड वाढले. तिथे अणुभट्टी पेटली. या केंद्रा- मधील हैड्रोजन वायूचे रूपांतर हेलियम मध्ये होण्यास सुरूवात झाली. त्यातून प्रचंड उर्जा बाहेर फेकली जाते. ह्या उर्जेमुळे ह्या ढगाचा केंद्रभाग प्रकाशमान झाला. ते केंद्र म्हणजे आपला सूर्य. धूमकेतू / . र
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now