ळो. टिळकांचीं धर्मविषयक मतें | Lo. Tilakaanchiin Dharmavishhayak Maten

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Lo. Tilakaanchiin Dharmavishhayak Maten  by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
निबध पहिला ३ परिस्थितीला व काळालाहि नवीन वळण देऊं शकतो व देतो, किंबहुना ह्यांतच त्याचें श्रेष्ठत्व असते ही गोष्ट खरी असली, तरी त्याला सुद्धां या मर्यादांचे सर्वस्वी अतिक्रमण करतां येत नाहीं, उलट त्यांचाहि ठसा त्याच्या बुद्धीवर व कायावर उमटलेला असतो म्हणून त्याच्या बुद्धीचा व कामगिरीचा विचार करतांना ह्या परिस्थिति आदिकरून गोष्टी लक्षांत घेणें जरूर असतें. ह्या दृष्टीनें पाहिलें असतां, टिळकांच्या धार्मिक बुद्धीचा व सभोवतालच्या परिस्थितीचा निकट संबंध आपणास दिसून येतो. टिळकांचे लहानपण अगदीं जुन्या प्रवृत्तीच्या व जुन्या समजुतीच्या धार्मिक माणसांत गेलें. त्यांच्या घरची मंडळी, विशेषतः आई, हीं अशा तर्‍हेनें जुन्या वळणाचीं असल्यामुळे त्यांच्यावरचे संस्कार तशाच प्रकारचे झाले, “मुंज होण्यापूर्वीच ब्रह्मकर्मांचा बहुतेक भाग पाठ झाला होता.'-- दहा वर्षापर्यंत टिळकांचें आयुष्य रत्भागिरीस अशा जुन्या वातावरणांत गेले, व ह्याच आयुष्याच्या काळांत मनावर चिरस्थाथे संस्कार होत असतात. या लहानपणच्या कोंबळ्या बुद्धीत, धार्मिक आईच्या सहवासांत त्यांच्या मनावर जो धार्मिक संस्कार उठला असेल तो किती जोराचा असेल त्याची कल्पना आपणास सहज करतां येईल. कार्लीईलने एके ठिकाणीं म्हटलें आहे कां, धर्म- मॉदेरांत, माझ्यासमोर प्राथना करतांना, माझ्या आईच्या डोळ्यांतून सद्रदित होऊन जे अश्रु बाहेर पडले त्यांचा पारेणाम आमरण माझ्यावर टिकला, दहाव्या वर्षांच टिळक पुण्यांत आले. पुणे हें आतांप्रमाणें, तेव्हांहि बुद्धीचें व शिक्षणाचें आगर असून, तेथ सर्व तऱ्हेच्या मतांचे पुढारी लोक होते व म्हणून शिक्षण घेण्यास पुण्यास आल्यावरच टिळकांच्या खऱ्या * बौद्धिक आयुष्यास * सुरुवात झाली, असं म्हणण्यास हरकत नाहीं. टिळकांची बुद्धि जात्या फार तीक्ष्ण असल्यामुळे पहिली पांच सहा वर्ष जरी या वातावरणाचा त्यांच्यावर विद्वेष हृद्य परिणाम झाला नसला तरी निरनिराळे संस्कार होतच असतील, व पुढें टिळकांच्या कॉलेजमधील अभ्यासक्रमास सुरुवात होण्याचे वेळेपासून षुण्यांतील विविध प्रकारच्या नवीन विचारांची त्यांच्यावर जोराची प्रतिक्रिया सुरू झाली असली पाहिजे, व अशा तऱ्हेची वस्तुस्थिति असल्याचे खुद्द टिळकां- नींच पुढें एका व्याख्यानांत सूचित केलें आहे. पण ही प्रतिक्रिया व तिचे परि- णाम सांगण्यापूर्वी आपणास या नवीन विचारांचे स्वरूप थोडें पाहिलें पाहिजे, म्हणजे टिळकांच्या धार्मिक मतांचे स्वरूप कळण्यास अडचण पडणार नाहीं. महाराष्ट्राची घार्मिक परिस्थिति यावेळीं फार चमत्कारिक झाली होती. ति बर्णन सुदेवाने आपणांस तत्कालीन वाड्मयांत पहावयास सांपडतें. परंतु तिचे खर्व वर्णन न कररितां त्यापैकीं जिचा टिळकांच्या मनावर परिणाम होण शक्‍य क क आपा न टि. च. पा. २१
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now