मंजिज्या | Manjirayaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मंजिज्या  - Manjirayaa

More Information About Author :

No Information available about वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar

Add Infomation About. . Vi. S. Khaandekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
११ कुठं आाहे तो मेघ ! मी चहा पिऊन पुन्हां गच्चीत आलों. अवघ्या दहा मिनिटांत केवढा बदल झाला 'होता बाहेर | विज्ञेचा कारखाना एकदम बंद पडल्यामुळें काळोख्या रात्रीं गावावर जशी अवकळा पसरावी तसें मघाशीं आभाळ दिसत होतें. पण आता तें भराभर उजळू लागलें. टोळघाडीप्रमार्णे आलेले ते लहानमोठे ढग एकाएकीं कुठें गुप्त झाले देव जाणे | जवळ जवळ स्वच्छ होत आलेलें तें आकाश पाहून माझ्या मनांत एक निराळीच कल्पना येऊन गेली--समुद्रकांठच्या वाळयंटावर लहान लहान खेकडे नेहमीं सैर संचार करीत असतात. ते ढगही आकाशाच्या वाळवंटात तसेच खेळत असावेत. आणि ते छोटे खेकडे (कोकणांत कुरल्या म्हणतों आम्ही त्यांना | किती काव्यमय नांव आहे नाहीं १) माणसाची चाहूल लागली कीं कसे पटकन्‌ वाळूतल्या इवल्या इवल्याशा बिळांत जातात | मघाचे ढगही तसेच आका- शांतल्या आपआपल्या गुह!त लपून बसले असावेत ! इकडे पृथ्वीच्या हारिराची आग आग होत होती; आणि तिकडे ती शांत करण्याची शक्ति असलेले ढग लपून बसले होते; त्यांच्या त्या पळपुटेपणाचें कारण मात्र माझ्या कल्पनेला शोधशोधून सुद्धां सांपंडेना. शेवटीं मीं स्वतःचे समाधान करण्यासाठीं म्हटलें, * कुठलीही क्रांति अशीच असते. ती आतां होणार, क्षणांत होणार असं भोंवतालच्या परिस्थितीवरून वाटू लागतं, पण कांहीं तरी कारण घडतं आणि क्रांति लांबणीवर पडते !* माझ्या या कल्पनेचा उपहास करण्याकरतांच कीं काय कुणीतरी खदखदून हॅसलें असा मला भास झाला. विचाराच्या तंद्रींतून जागा होऊन मौ पाहूं लागलों. मघांच्या मेथांच्या सैन्याचा तो पुढारी--क्षितिजावर प्रथम दिसू लागलेला तो काळा ढग--परत जातां जातां गडगडत होता ! त्याचें तें विचित्र हास्य ऐकून मी चिडून गेलीं, मी त्याला उद्देशून उच्च स्वरानें म्हणालो, “मेघा, तं. कांहीं उच्च कुळांतला दिसत नाहींस. आज इतका उकाडा होत असतांना प्रथ्वीवर पाण्याचे चार थेंब शिंपडण्याचं औदार्य सुद्धां तुला दाखवता आलं नाहीं. तुझ्यापेक्षा आमची म्युनिसिपालिटी हजारपटींनीं बरी ! लग्नांत हातरुमालावर गुलाबपाणी शिंपडतात ना! तशी ती धुळींत भरलेल्या आमच्या राजरस्त्यांवर दररोज नियमितपर्णे जल- सिंचन करीत असते | पण तं--छे: ! तुझे पूर्वज फार कदूरू असले पाहिजेत ! मेघांत सुद्धां तिमाजी नाईक असतात हें आज कळलं मला | * तो मेघ गडगडतच माझ्याशी बोळ लागला. माझ्या टीकेचा त्याला बहुधा राग




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now