संत जनाबाई | Sant Janabai

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : संत जनाबाई - Sant Janabai

More Information About Author :

No Information available about सुहासिनी यशवंत - Suhasini Yashvant

Add Infomation AboutSuhasini Yashvant

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
“म्हणे नामयाची जनी'* नामदेवांचे पंढरपूर येथील घर म्हणजे यादवकालीन संतांच्या परस्पर संवादाचे केंद्रस्थान होते. त्यामुळे संत जनाबाईंना आयताच संतसहवास लाभला. नामदेवांशी जनाबाईंनी साधलेला ऐक्यभाव तर आश्चर्यकारकच होता. नामदेवांवाचून जनाबाईंना वेगळे असे स्वत:चे जीवन नव्हतेच. “म्हणे नामयाची जनी' ह्या त्यांच्या प्रत्येक अभंगाच्या अखेरीस येणाऱ्या नाममुद्रेवरून त्याचा प्रत्यय येतो. नामदेवांचे दासीपण जनाबाई बिरुदाप्रमाणे मिरवितात. आणि असे घडणे स्वाभाविकच होते. कारण जनाबाईंना स्वतःचे घर नव्हते, कुटुंब नव्हते. नामदेवांचे घर आणि कुटुंब हेच त्यांनी आपले घर व कुटुंब मानले. त्या नामदेवांच्या कुटुंबाशी पूर्णार्थाने समरस झाल्या. त्या कुटुंबाचा एक घटक झाल्या. नामदेवांच्या जीवनातील सुखदु:खे त्यांनी आपलीच सुख-दु:खे मानली. जनाबाईची मूळ वृत्तीच ईश्वरपरायण होती. संतश्रेष्ठ नामदेवांच्या विठ्ठल-भक्तीमय झालेल्या कुटुंबाच्या सहवासाने जनाबाईंच्या विठ्ठलभक्तीला बहर आला. नामदेव हे बालभक्त होते. त्यांच्या जीवनविकासानुसार त्यांची भक्तीही विकसित झाली. उत्कट संवेदनशक्ती लाभलेल्या जनाबाईंनी नामदेवांची भक्तिसाधना विकसित होताना अशी जवळून पाहिली. ईश्वरसाधना कशी करावी, विठ्ठलभक्ती कशी अनुभवावी, विठ्ठलाशी संवाद कसा करावा, त्याच्याशी मनाने कसे समरस व्हावे, ऐक्य कसे साधावे, हे जनाबाईंना नामदेवांच्या अखंड सहवासामुळे शिकता आले. नामदेवांच्या आध्यात्मिक जीवनाचा असा सखोल संस्कार होऊन जनाबाई स्वत:चे आध्यात्मिक जीवन जगू लागल्या. संत नामदेवांचे लौकिक व आध्यात्मिक जीवन हा त्यांच्या अखंड निरीक्षणाचा, चिंतनाचा आणि कुतुहलाचा विषय झाला. त्याचा जणू जनाबाईंच्या मनाला छंदच जडला. एवढेच नव्हे तर आपले अनुभव अभंगांतून कसे व्यक्त करावेत, याची किमयाच जणू जनाबाईच्या मनाने प्राप्त केली. जनाबाईंच्या आध्यात्मिक जीवनाला अशा प्रकारे प्रारंभ झाला. त्यासाठी नामदेवांकडून गुरुमंत्र घेण्याच्या उपचाराची जनाबाईंना आवश्यकता भासली नाही. कारण तिला तिच्या गुरुच्या अखंड सहवासाचा लाभ




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now