श्री ज्ञानेश्वरी १४ | Sri Gyaneshvari 14

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sri Gyaneshvari 14 by गोविन्द रामचंद्र - Govind Ramchandra

More Information About Author :

No Information available about गोविन्द रामचंद्र - Govind Ramchandra

Add Infomation AboutGovind Ramchandra

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र स्वभावसिद्ध कर्म हॅ दिसण्यांत वेगुण्यतेचें जरी तरी उत्तम प्रकारें इंद्रियांच्या धर्मास आचरण्यापेक्षां श्रेष्ठ आहे; कारण स्वभावसिद्ध कर्माचें आचरण करण्याने पाप लागत नाहीं. स्वभावसिद्ध कर्म, सहज असें जें, तें सदोष असें जरी दिसलें, तरी तें टाकू नये, कारण कर्म म्हणजे जें सर्व किंवा जात तें कसल्या ना कसल्या तरी दोषानें व्यापून असतेंच. पण ज्याची बुद्धि आसक्तिरहीत व ज्यानं मन जिंकिलें आहे, व जो निःस्पृह किंवा निरिच्छ त्याला कर्मफलत्याग केल्यानें (कर्तव्यच एक तेथें फल तें इच््छिणें, पाहणें केव्हांही नाहीं ) सर्वात श्रेष्ठ अशी नेष्कम्य सिद्धि प्राप्त होते. ज्ञानाची परमसीमा जें ब्रह्म तें होण्याची योग्यता येते व प्रसन्न चित्तामुळें शोक किंवा इच्छा अथवा अपेक्षा नच करणारा होऊन तो सर्वांभूती सम होत्साता माझी साम्यसिद्धि अथवा साम्य- भक्ति प्राप्त होणारा होतो. मी कोण आहें, कसा आहे, कशा प्रकारचा आहें, याचें त्याला खरें ज्ञान होतें. याप्रमाणें माझी तात्विक ओळख झाल्यावर तो मींच होतो-मजमध्येंच तो प्रवेश करून असतो-तो मजमध्येंच प्रवेशाने असतो. आत्मपरायण झालेला तो, सर्व कर्म करीत असतांही त्याला माझ्या प्रसादाने शाश्वत व अविनाशी पद प्राप्त होतें. चेतसानें (चेतम्‌ू-मन, ज्ञान, सजीवता ) सर्व कर्म मला अपण करून मत्परायण हो, बुद्धियोगाचा आश्रय कर व निरंतर माझ्या ठिकाणीं चित्त ठेव, याप्रमाणें माझ्या ठाई चित्त ठेवून राहाशील तर तूं सर्व संकटांतून तरून जाशील, पण अहंभावनेमुळें माझें नच ऐकशील तर परम म्हणजे श्रेष्ठ असा जो अर्थ त्यापासून च्युतीचा होशील. सवे कर्म ईंश्वरापेण हाच त्याग: भाव हाच अर्थ ईश्वरभावास आलेला, तेथें सहज स्वाभाविक आसक्ति का फलापेक्षा नच ठेवल्याने ते मग लोक लोचनलीला-आज्ञापालन-लीलालालन-क्रीडाकुतुहुल महत्त्वास येणारें झाल्याने सहज इश्वरापेण झालें. फलेच्छेचा त्याग केल्याशिवाय कोणींही योगी होऊं शकत नाहीं. देहधारी पुरुषाला कर्माचा निःशेष त्याग करणें शक्य नाहीं म्हणून जो कर्मफलत्यागी आहे त्यासच त्यागी म्हणतात. निषिद्ध जें तें व काम्य कर्म जें तें सर्वथा त्यागावें हेच बरें. १) नियत म्हणजे वर्णाश्रमास नेमलेल्या नित्य कर्माचा त्याग करणें केव्हांही उचित नाहीं (पण कोणत्याही किंवा कसल्याही मोहानें त्यांचा त्याग केला असतां त्याला तामस त्याग म्हणतात). २) शरिराला कष्ट होतील या भीतीनें कर्म करणें तें दुःखकारक का कष्टमय असें समजून त्याग करणें तो “राजस” त्याग असल्यानें त्यास खरा जो त्याग आहे त्याचें फळ मिळत नाहीं. ३) शाख्त्रविहित कर्म, आसक्ति, अहंक्तेत्वबुद्धि व फल सोडून किंवा टाकून “एक कर्तव्यच तें करणें?च केव्हांही, असें म्हणून केलें असतां तो सात्विक त्याग समजला जातो. ४) अकुशल म्हणजे क्षेशकर वाटणाऱ्या कर्माचा जो द्वेष करीत नाहीं व कुशल म्हणजे सुखकर वाटणाऱ्या कर्मात जो आसक्त होऊन असत नाहीं (न अनुषज्यते ) संशयरहित ( छिन्नसंशयः) असा खरा त्यागी होय. कर्म, काम्य, संन्यास, त्याग : कामना, हेतू किंवा (बुद्धिपुरस्सर म्हटलें गेलेले ज म्हणजे) कांहीतरी फलाची इच्छा घरून केलेले कर्म तें काम्य कर्म होय; व तें सोडणें यास संन्यास म्हणतात. आपलें कर्तव्यकर्म करणें हेच एक महत्त्व दिलेलें तेथें त्या क्तेव्याचें फळ अपेक्षणें नच जें तो संन्यास, व तोच योग- विरभ्नि व अक्रिय असा कर्म करणारा कोणीच होत नाहीं-.ना तो योगी-ना संन्यासी-ना योगी. म्हणून जो कर्मफलवत्याग तो संन्यासच एक. सहजपणेंच तें फलापेक्षेशिवाय केलेलें कर्म ईश्वरापेण होतें, व हाच त्याग म्हटला जातो (कोणी म्हणतात की प्रत्येक कर्म सदोष असल्यामुळें कर्माचा त्यागच करावा, दुसरे कांही म्हणतात यज्ञ, दान व तपादि कर्म तें टाकूं नये-या बद्दलचा निर्णय तो असा कीं हे पुरुषव्याघ्र म्हणजे श्रेष्ठ, त्याग जो आहे तो तीन प्रकारचा आहे. यज्ञ, दान व तप हीं जीं कमें ती टाकूं नयेत-तीं करावींतच, कारण तीं बुद्धिमान्‌ पुरुषांना पावन करणारीं आहेत. कम हीं आसक्ति व फल सोडून व त्याग करून केलीं पाहिजेत असें माझ निश्चित मत आहे.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now