नटीचा बंगळा | Natiichaa Bangalaa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
6 MB
Total Pages :
92
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about विनायक देवरुखकर - Vinayak Devrukhakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अंक पहिला ११
सदानंद-बरं मग ?
धोंडीराम-तुझ्या खोलींत ने कीं मला चहा प्यायला.
सदानंद-अं ह ! तें नाहीं जमायचं .
धोंडीोराम-पाहिलंस ! मग माणसाला कां संशय येऊं नये रे? सद्या,
एकटा एकटा काय करीत असतोस रे ?*
सदानंद-कांहीं नाहीं. बसतो वाचीत कांहींतरी.
धोंडीराम-मग दार बंद कशाला करून बसतोस? कीं चोख्नमाख्तं
कांहीं भलतंसलतं वाचीत बसतोस ? मला वाटतं तुझं कांहींतरी गुपीत
असलं पाहिजे. नाहींतर इतका कडेकोट बंदोबस्त कशाला? सद्या, लेका,
एकादी पोरगीबिरगी आणून लपवून ठेवली आहेस कीं काय ?
सदानंद-(रागानें) धोंडीराम, थट्टेलासुद्धां मर्यादा असते. दुसऱ्याची
जास्त चौकशी करू नये.
धोंडीराम -अँहॅ ! राग तर कसा नाकाच्या शेंड्यावर बसलाय !
मग ने कीं मला तुझ्या खोलींत !
सदानंद-तें शक्य नाहीं.
धोंडीराम-आतां कां? म्हणजे नक्कीच कांहींतरी गफलत असली
पाहिजे. अहो राजमान्य राजश्री, तुमच्या खोलींत जी काय भानगड असेल
ती कधींतरी जगासमोर आल्याशिवाय रहाणार नाहीं.
सदानंद-ती जर जगासमोर अली तर डोळे दिपतील
तुमचे ! (जातो)
धोंडीराम-अँहं ! म्हणे डोळे दिपतील ! कूंभाराची सून उकिरड्या-
वर आल्याशिवाय रहायची नाहीं ! लेकाचा मोठा डायरेक्टरच लागून
गेलाय कीं नाहीं. (फोनची घंटा वाजते) हें कोण कडमडलंय ! (फोत
घेऊन) हॅलो, कोण आहे? काय काम आहे? अं..? ताईसाहेब आज
भेटायच्या नाहींत. हो. . मुळीच भेटायच्या नाहींत. . मेहेरबान, सिनेमा”
नटाला भेटण्यापेक्षां' दुसरे उद्योग करा. . तुम्हीं 'चारदें मँलांवरून आलांत
User Reviews
No Reviews | Add Yours...