कौटिळीय अर्थशास्त्र | Kuatilya Arthshastra
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
102 MB
Total Pages :
744
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)चार उपोद्घात
यांचा मेगॅस्थिनीस आणि कौटिल्य यांच्या विधानांची विस्तृत तुलना करून त्या
दोहोंत मेळ नाही असे दाखविण्याचा प्रयत्न करणारा ग्रंथ (जमन भाषेत)
१९२१ मध्ये प्रसिद्ध झाला. बी. ब्रेलोअर यांचे संशोधन तीन खंडांत प्रसिद्ध
झाले आहे. पहिल्या खंडात जमिनीच्या मालकीचा प्रहन विचारात घेतला आहे
दूसऱ्यात दोन पक्षांमध्ये होणाऱ्या करारांचा विचार आंहे आणि तिसऱ्यात
अर्थव्यवस्थेचे विस्तृत विवेचन आहे. तिसऱ्या खंडासाठी ब्रेलोअर पुण्यात पेशवे
दप्तराचा अभ्यास करून गेले होते. हे खंडही जमन भाषेत आहेत. अलीकडे
एच्. शाफ यांनी ग्रंथ व ग्रंथकार यांच्या संबंधात उत्पन्न होणाऱ्या अनेक प्रश्नांचे
विवेचन विस्तृतपणे करणारा ग्रंथ (जमन भाषेत) प्रसिद्ध केला आहे. स्टेन
कोनो यांचा १९४५ मध्ये प्रसिद्ध झालेला ' कौटिल्य स्टडीज ' नावाचा ग्रंथ
इंग्रजीत आहे. वस्तुत: कौटिलीय अर्थशास्त्राच्या अध्ययनाला सुरुवात पौर्वात्य
विद्यांच्या अध्ययनाला वाहिलेल्या जनंल्समध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांनी झाली
होती. एच. याकोबी, ए. बी. कीथ, जे. योली, एम्. विर्टानिट्झ यांसारख्यांचे
अनेक महत्त्वपूर्ण लेख ह्या ग्रंथाच्या सखोल अध्ययनास चालना देण्यास कारणीभूत
झाले. त्या सर्वांचा नामनिर्देश करण्याची आवश्यकता नाही. तेव्हापासून
आतापर्यंत या ग्रंथावर असंख्य लेख लिहिले गेले आहेत. ते लिहिणाऱ्यांमध्ये
वरील पंडितांशिवाय ए. हिलेब्रांठ, ओ. स्टाइन, एन. एन. लॉ, प्राणनाथ, ई. एच.
जॉन्स्टन, बी. ब्रेलोअर, डी. आर. भांडारकर, के. ए. नीळकंठ शास्त्री, पी. व्ही.
काणे, टी. वरो यांचा प्रामुख्याने निर्देश केला पाहिजे.
ह्या ग्रंथाच्या निमित्ताने त्राचीन भारतीय राजनीतिशास्त्रावरील लिखाणाला
एकदम वहर आला. के. पी. जायस्वाल, एन. एन. ला, डी. आर. भांडारकर,
यू. एन. घोषाल, बी. के. सरकार, बेती प्रसाद, ए. एस. आळतेकर आदींच्या या
विषयावरील ग्रंथांत साहजिकच कौटिलीय अर्थशास्त्राचा मोठ्या प्रमाणात
उपयोग केला गेला आहे. याशिवाय हा ग्रंथ मौयकालीन आहे असे मानल्यामुळे
तत्कालीन परिस्थितीचे विवेचन त्याच्या आधारे करण्यात आले आहे. एफ.
डब्ल्यू. टॉमस यांनी केंब्रिज हिस्टरी ऑफ इंडिया ' च्या पहिल्या खंडात मीर्यांच्या
राजवटीचे वर्णन करताना ह्या ग्रंथाचाही उपयोग केला आहे. तसेच के. ए.नीळकंठ
शास्त्री यांनी *एज आफ दी नंदाज अँड दी मौर्याज ' ह्या ग्रंथात “ अर्थशास्त्र “
याप्रमाणेंच आधारासाठी वापरले आहे. द्या ग्रंथाच्या अध्ययनाला आणखी एक
दिशा लाभली आहे. धर्मशास्त्र व अर्थशास्त्र यांत काही विषय - विद्देषत: कायदा
व न्यायदान -- समान असल्यामुळे या दोन शास्त्रांचे तुलनात्मक अध्ययन होणें
स्वाभाविक होते. जे. योलींच्या प्रारंभीच्या लेखांनंतर पी. व्ही. काणे यांच्या
* हिस्टरी ऑफ धमशास्त्र ' ह्या ग्रंथाच्या तिसऱ्या खंडांत असे तुलनात्मक अध्ययन
User Reviews
No Reviews | Add Yours...