जळधारा | Jaldhara
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
13 MB
Total Pages :
148
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)ञजखस उ उ ९
अम ह १ अ अ,
विन आशाच पाट
रावांनी “भूक नाही! म्हणून सुरकावलें. तोंडाने “टॅंक असा आवाज काढीत
यमूताई मागल्या पावलींच परतल्या,
घामाघूम झालेली, काय होईल या भीतीनें उडणाऱ्या छातीवर एका
हातानें दाब देत व दुसऱ्या हातांत असलेलें एक गाठोडे लपवीत किशोरी
बरोबर <। वाजतां चोरट्या पावलाने मागील दाराने घरांत शिरली.
कोणत्याहि दाराने शिरली म्हणून होणारे थोडेच टळणार होतें १ परंतु मनुष्य-
स्वभाव हा की, आजची आपालि शक्यतॉवर उद्यांवर ढकलावयाची. गोविंद-
रावांनीं तिला पुढच्या खोलीतून हाक मारली, खालच्या मानेने किशोरी
वडिलांसमोर उभी राहिली.
“ कुठं गेली होतीस!” गोविंदरावांनी नेहमीच्या आवाजांत प्रश्न केला.
उत्तर नाहीं. गोविंदरावांनीं तोच प्रश्न तीनदां उच्चारला.
“ मावशींकडे--?” डबडबलेल्या नेत्रांनी वाडेलांकडे पाहत किशोरीने
उत्तर केले.
“ठी नको म्हणून सांगितलं असतांनासुद्धा १” गोविंदरावांचा आवाज
न कळत चढला होता.
“ मला ती पुष्कळ दिवस आग्रह करीत होती--” किश्लोरी कापर््या
आवाजांत, शुष्क झालेल्या ओठांवरून जिभेचा शेंडा हळूच फिरवीत म्हणाली,
“ मग तिच्याकडे कां जाऊन राहत नाहींस १ ज्या घरांत आपलें जमत
नाहीं त्या घरांत माझ्यासारख्यानें पाणीसुद्धा घेतले नसतें. मावशीला इतका
पुळका असेल तर संभाळ म्हणावं--आणि मावशीकडे इतका वेळ काय करीत
होतीस.१” गोविंदराव म्हणाले.
किशोरींने भयभीत नजरेनं आसपास पाहिलें. तिला कळून चुकलें, की
जगांत आपलें कोणी--कोणीसुद्धां नाहीं. आणि ही जाणीव विद्वेषतः बाल-
मनाला फास्च जाचत असते. काडीचा आधार म्हणून तिचें घरांत यमूताई-
कडेसुद्धां पाहिलें परंदु त्या दूर होत्या.
“ वाचा बसली का १-- ” गोविंदरावांनी पुन्हा प्रश्न केल.
User Reviews
No Reviews | Add Yours...