मराठीची सजावट २ | Maraathiichii Sajaavat 2
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
11 MB
Total Pages :
209
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गोपाळ गोविंद मुजुमदार - Gopal Govind Mujumdaar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)मराठी भाषेचा इतिहास. भै
असले पाहिजेत असें या पक्षाचें म्हणणें आहे, एकंदर्यत या पक्षाच्या सतें
मराठीर्चे बीज मूळचें महाराष्ट्रांतलें आहे. कोणत्याहि पक्षाचें म्हणणें खरें धरलें तरी,
जुनी महाराष्ट्री बदलत जाऊन, तींत, आजच्या देशी भाषेची .ओळख पटेल
असें स्पष्ट रूप दुसरें व चवरे शतक यांच्या दरम्यान तयार् झालें असावें अर्स
अनुमान आहे व तोच सामान्यतः मराठीचा जन्मकाळ समजण्यास हरकत नाहीं.
कोणत्याही भाषेचा नक्की उत्पत्तिकाळ सांगणें शक्य. नाही, तसाच मराठीचा
नाहीं. अगदींच विरळ आढळणारा एखाद दुसरा शब्द किंवा रूप सोडून दिले
तर शालिवाहन शकाच्या नवव्या किंवा दहाव्या शतकापर्यंत निव्वळ मराठी
असा एकही लेख आपणांस अद्याप उपलब्ध नाहीं. शके नऊशे पांचच्या समारास
राचमछ गंग नांवाच्या राजाच्या कारकीर्दी।त गोमतेश्वराचा एक मोठ
प्रचंड सर्वोत्तुंग दगडी पुतळा उभारल्यानंतर त्याचा प्रधान चामंंडराय यांन
आआपर्लें कर्तृत्व जाहीर करण्याकरितां त्या पुतळ्याखालीं कांहीं वाक्यं कोरविली.
त्यांताल एक वाक्य '* श्रीचावुंडरायें करविले ' असे आहे. इतर भाषांतल्या
बाक्यां बरोबरच हें वाक्य घातलें आहे, यावरून इतकें स्पष्ट होतें कीं, त्यावेळी
मराठी भाषा बोलणारे, व 1शेष्ट समजून ती प्रचारांत वापरणारे बरेच लोक होते.
अर्थात् पांच चारशें वर्षे तरी तिला या वेळीं उत्पन्न होऊन झालीं असलीं
पाहहजेत. प्रो. पोतदारांच्या मते मराठी सातव्या शतकाच्या खुमारास अस्तित्वांत
आली असावी.
यानंतर शके १०५१ मध्यें चालुक्यवंशीय सोमेश्वर राजानें रचलेला * अभि-
लषिताथं-!चिंतामाणि ' नांवाचा ग्रंथ उपलब्ध झाला आहे. त्यांत मराठी शब्द
तर जागजागी आले आहेतच, पण एका भागांत कांही मराठी पद्येही आलीं
आहेत. त्यांतील एक पुढें * मराठीचे स्थित्यंतर-दर्शक नमुने ' या प्रकरणांत देण्यांत
येईल. याच ग्रंथांत पुढें महाराष्ट्रांतील बायका कांडतांना ओव्या म्हणतात असा उल्लेख
आहे त्यावरून ओवी हा छंद तरी त्यावेळेपासूनचा आहे असें मानावयास हरकत नाहीं.
थानंतर शके १०७५-९ मधला एक, शके ११०९ मधला एक, शके ११२६
च्या सुमारचा एक ( हा मंगळवेढचा ताम्रपट म्हणून प्रसिद्ध असून, चुकीनें शके
४१० मधला समजला जात असे ), शके ११३० च्या सुमाराचा एक, शके
११९६ च्या सुमाराचा एक व शके ११९५ चा, पंढरपूरचा महत्त्वाचा व प्रसिद्ध
असा एक, इतके ठळक शिलालेख सांपडले आहेत. येथपर्यंत मराठी भाषा इछूं
User Reviews
No Reviews | Add Yours...