द्विविध दर्शन | Dwividh Darshan
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
38 MB
Total Pages :
363
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
गजानन त्र्यंबक माडखोळकर - Gajanan Truanbak Madakholakar
No Information available about गजानन त्र्यंबक माडखोळकर - Gajanan Truanbak Madakholakar
श्रीनिवास नारायण - Srinivas Narayan
No Information available about श्रीनिवास नारायण - Srinivas Narayan
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)8 विष्णु कृष्ण चिपळ्णकर
या श्लोकांत अजराजाविषयीा म्हटल्याप्रमाणे, एकंदरींत सळोख्याचे
होतें. डलहोसीच्या अमदानींत हें धोरण सुटले आणि हिंदुस्थानाच्या
राजकीय क्षितिजावर नक्षत्रांप्रमाणें चमकणारी संस्थाने एकामागून एक
झपाट्याने ठुप्त होऊं लागलीं. या व इतर कारणांमुळे १८५७ साठीं
बंडाची भयंकर वावटळ उठळी. या बंडाचा प्रत्यक्ष संसर्ग किंवा उपसग
महाराष्ट्राहा फारसा झाला नाहीं. पण, ही वावटळ शमल्यानंतर ज्या
राजकीय तत्त्वांचा आणि राष्ट्रीय चळवळींचा उद्य हिंदुस्थानांत झाला,
त्यांचा प्रभाव मात्र महाराष्ट्रावर झाल्याशिवाय राहिला नाहीं. चिपळूण-
करांच्या जन्मानंतर फारच थोड्या अवधींत हे स्थित्यंतर घडून आहें.
महाराष्ट्रांत या स्थित्यंतराला चिपळूणकरांचें कर्तृत्व विशेष कारणीभूत
झालेलें असल्यामुळे त्यांच्या जन्माबरोबर अर्वाचीन महाराष्ट्राचाही जन्म
झाला, असें म्हणणें अतिशयोक्त होणार नाहीं.
: कृष्णशास्त्री चिपळूणकर हे जुन्या नव्या पद्धतीनें पढळेल्या तत्का-
लीन पंडितांचे अग्रणी होते. त्या वेळीं सरकारदरबारी या दोन्ही विद्यांची
बहुतेक सारखीच संभावना होत असे, तरीसुद्धा, स. १८४८ च्या
सुमारास बुधवारवाड्यांत जेव्हां नवीन सरकारी इंग्रजी शाळा सुरू
झाली, तेव्हां शाखत्रीबुवांचे गुरु मोरशास्त्री साठे यांनीं त्यांना स्पष्ट सांगि-
तळे कीं, “ या उपर खांद्यावर शालजोडी टाकून हिंडण्यांत प्रतिष्ठा
राहणार नाहीं; तू शाहणा असलास तर इंग्रजी शीक. ” शाखत्रीबवांचे
संस्कृत अध्ययन त्या वेळीं नुकतेंच पूर्ण झाले असून, त्यांचे शिकण्याचे
वयही राहिलेले नव्हतं. तथापि, त्यांनीं गुरूच्या उपदेशाप्रमाणें, हा अगदीं
अभिनव अभ्यासक्रम पत्करून, लवकरच इंग्रजी भाषेत प्रावीण्य मिळ-
विल. शाखत्रीबुवांची धारणाशाक्ति असामान्य होती; व तिला अविरत
उद्योगाची जोड मिळालेली असल्यामुळें त्यांच्या बुद्धीला आविषय
किंवा अगम्य असं कांहींच नव्हतें. न्यायशासत्राच्या मरुभूमीपासून
तों काव्यशासत्राच्या नंदनवनापर्यंत ती लीलेनें संचार करीत असे.
User Reviews
No Reviews | Add Yours...