संसाररंजन | Sansarranjan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sansarranjan  by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कोण फजिती ! १९ परंतु तें भाषण ऐकतांच माझ्या छातींत धस्स झालें. अद्यापिहि एक गोष्ट राहिलीच आहे ! आणि अथातच ती कांहींतरी अशुभच असणार ! मन चिंती तें वैरी न चिंती! मी अगदीं भूमीला खिळल्यासारखी झालें. माझ्या सर्वांगांतून दरद्र घाम सुटला. मग माझी एवढीं मनोराज्यें, एवढ्या आशा, शेवटीं घुळीलाच का मिळणार १ अरेरे! त्याहून घरणी दुभंग होऊन मला पोटांत घेईल तरी बरें, असें मला होऊन गेलें. माझा उत्साह लोपला, सुखखप्रें भंगलीं व मी अगदीं हताश आणि दीन वनून गेलें. ही सारी रात्र मीं कशी घालविली असेल व्याची वाचकांनींच कल्पना करावी. [५७] एकदाची ती काळरात्र संपली व दुसरा दिवस उजाडला. सकाळींच तिकडची स्वारी आमच्या घरीं येऊन पोचली. आणि काय आश्चये सांगावें, काल तसें कठोर भाषण करणाऱ्या जिभेला आज पुनः साखर पेरण्यास आणि निल्याप्रमार्णेच माझ्याशी हास्यविनोद करण्यास यात्किचितहि दिक्कत वाटली नाही ! येतांच पहिल्यानें मला भेटून पुष्कळच हंसण्याखिदळण्यास सुरुवात झाली. परंतु तो हास्यविनोद मला सुळींच रुचला नाहीं. माझ्या अंतःकरणांत या वेळीं कोण गडबड उडाली होती. मी बाह्यात्कारी हास्यरत्ति दाखवून कांहीं बह्मणा करून साझ्या अभ्यासाच्या खोलींत जाऊन बसलें. बर भान करून तिकडच्या तोंडाकडे पहाण्यासहि आतां मला धीर होईना. मी आंत गेल्याला आतां चांगला अघी पाऊण तास होत आला होता; तरी बाबांच्या आणि तिकडच्या गोष्टी कांहीं आटपेनात. जसजसा अधिकाधिक वेळ होत चालला, तसतशा माझ्या मनांत वाईटवाईट शंका येऊं लागल्या. अरेरे! मग माझ्या आश्या, माझीं सुखखप्रें शेवटीं निष्फळच का व्हावयाची १ माझे डोळे भरून आले. गालांवरून सारखा अश्चुवषाव सुरू झाला. या वेळीं माझ्या मनाची जी कांहीं चमत्कारिक स्थिति होऊन गेली होती, ती ल्या नारायणालाच ठाऊक! शेवटीं माझ्यानें अगदींच धीर निघेना. तेव्हां मी तेथून उठून, काय प्रकार आहे तो समजून चेण्यासाठीं ह्मणून दिवाणखान्याच्या दारापाशीं आहें. अद्यापि दोघेहि बोलतच होते. गोष्टी माझ्याचसंबंधी चालल्या होत्या. मी कान देऊन ऐकूं लागलें. तिकडची खारी बाबांला ह्मणते “पण तिची प्रकृती कांहीं चांगलीशी दिसत नाहीं!”
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now