महात्मा फुळे व्यक्तित्व आणि विचार | Mahatma Phule Vyaktitwa Ani Vichar
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
30 MB
Total Pages :
242
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)उतरती परंपरा बलिवेत राखोन दुर्बळ व्ततच आहेत. परंतु त्यांस साधारण गणावे
यैसे नाही. हे लोक भ्हणजे राज्याचे दायादच आहेत. ”*? या दृष्टीनेच देशमुख हा
देशाचा अधिपती आणि पाटील हा गावचा राजा अशी त्यांची ख्याती होती. हे
वतनदार एका अथी पिढीजात परंपरागत लोकप्रतिनिधी होते. राजा आणि रयत
यांना जोडणाऱ्या दुब्यासारखे त्यांचे समाजजीवनातील स्थान होते. जनसमुदायात
त्यांचा मान व प्रतिष्ठा फार मोठी होती. “देशात मुलकांचे पाटील कुळकर्णी यांचे
हाती [ व] देशमुखांचे हाती कुळ रयत??* असे जागोजाग दिसून येत असल्यास
नवळ नाही. जमिनीची मालकी येथे बह्दतांशी शेतकऱ्यांपाशी होती. पण त्याच्या
निव्वळ उत्पन्नातील बराचसा भाग जमीनमहसुलाच्या रूपाने द्यासनाकडे जाई, सात्र
शासनकत्यींचा व रयतेचा प्रत्यक्ष संबंध क्वचितच थेत असे. “राज्य चालविण्यास
राजाला जो पैका व धान्यादी सामग्री पाहिजे ती ह्या देशमुख-देशपांडे वतनदारां-
करवी मिळावयाची. देवमुख-देशपांड्यांच्या जोडीला राज्यसूत्र-चालकांकडून
सुभेदार नेमळेळे असतात; पण तेही देशमुख देशपांडे हे आपले काम बरोबर
करतात न करतात हे पाहण्यासाठी असतात. म्हणजे त्यांनीही देशमुखादिकांचेकडूनच
हे वसुळीचे काम करवून घ्यावयाचे आहे. स्वातंत्र्याने नाही. ** अशी कार्यपद्धती
पूर्वापार रूढ झालेली होती.
दोतकऱ्यांकडून जमीतवमहसुलाच्या रूपाने जो पैसा राज्याच्या खजिन्यात जमा
होई, त्यापैकी फारच थोडा अंश शासनाकडून त्यांच्यासाठी खर्च होत असे. कारण
त्या काळी ग्रामीण भागाच्या संदर्भात परचक्रनिवारण आणि शांततारक्षण एवढेच
सामान्यतः राजाचे कर्तव्य मानळे जाई. शिक्षण, दोतीसुघारणा, वैद्यकीय मदत
यांच्या वाबतीत खेड्यांतील जनतेची शासनाकडून कोणतोच अपेक्षा नव्हती. त्यांच्या
या गरजा ग्रामसंस्थेच्या मार्फत स्वायत्ततेने पुऱ्या होत असत. मध्ययुगातील राजे -
रजवाड्यांचे ऐश्वय व धनसंपत्ती ही युद्धातील छटीचा ऐवज सोडला, तर गरीव
शेतकऱ्यांच्या पिळवणुकीतूनच त्यांना प्राप्त होत होती. सरकारी खजिल्यात जमा
झालेला पैसा राजेरजवाह्यांची ख्यालीखुशाली, फौजफाटा, देवस्थानांची इनामे,
दास्त्रीपंडितांचा पुरस्कार व॒ अमीरउमरावांचे सरंजाम व मानमरातव इत्यादी
अनुत्पादक वाबींसाठीच वापरला जाई. शेतीचे उत्पादन कसे वाढवता येईल या
प्रश्नाच्या वाबतीत ग्रेथील राजे, जहागिरदार व वतनदार यांपॅकी कुणालाच खास
आस्था नव्हती. कराच्या ओझ्याखाली दडपला गेळेळा शेतकरी कशीबशी स्वतःची
गुजराण करीत होता. त्यामुळे दयातकामागून द्यतके लोटली, तरी येथील शेतीत
कोणतीच सुधारणा झालेली नाही.
देशमुखपाटीलग्रभृती वतनदारांचा पदाधिकार हा राजाच्या मर्जीवर अवलंबून
४ महात्मा फुले
User Reviews
No Reviews | Add Yours...