अविनाश | Avinaash

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : अविनाश  - Avinaash

More Information About Author :

No Information available about वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar

Add Infomation About. . Vi. S. Khaandekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
९९ तीट दाडेकराची जशी कवि म्हणून प्रसिद्धि नाहीं, तसा र. गो. सरदेसाई याच्यावरही प्रथितयश विनोदी लेखक ? असा काहीं शिक्काछाप बसलेला नाहीं. पण * कागदी विमाना?तळे त्याचे लघनियंघ वाचताना श्रीपाद कृष्णाच्या विनोदी लेखनशलीची ज्याला आठवण होणार नाही असा वाचक विरळाच सांपडेल. * दोजारी ? या लघुनिबंधातली ही चटकदार वाक्येच पाहा ना--'शेजारघमं आताशा फक्त उसनवारी करण्यापुरताच उरलेल असावा.? शेजारी या प्राण्याचे स्वरूप पौराणिक मयसमेसारखें असते. स्नेहाचे जल दाखवून कपटाच्या फरशीवर तुमचा कपाळमोक्ष करण्यात शेजाऱ्याचा कारस्थानी हात कणीच धरू शकणार नाही.? “तुमच्या फजि- तीच्या प्रसंगासारखा आनद तेमच्या शेजाऱ्याला प्रत्यक्ष पुत्रजन्माच्या वेळींही होत नसेल.? “इंग्लंडची अडचण हीच आयलडची सुसधि ? हे ब्रीद आयलंडला सुचले याचें कारण इग्लड व आयलंड यांच्यामधला शोजारी- पणाच असावा असे मला वाटते. * या सवं गोष्टी आठवताच मला वाटले--एखाद्याला गाणे आवडत नाही ना ! आपल्या या संपादकमित्राची रसिकता लघनिबंधाच्या बाबतीत तशीच सदोष असावी ! आम्ही दोघे विरुद्ध बाजू घेऊन बोलूं लागलो. या खेळीमेळीच्या वाद- विवादात मी हरली नाही; पण मल्या विजयही मिळाला नाही. सपादकानी आपल्याकडे य्रणाऱय्या लघुनिबंधातली एक एक गमत सागायला जेव्हा सुरुवात केली, तेव्हा मी एकीकडे हंसत होतो नि एकीकडे मनात म्हणत होतो-असळे असबद्ध आणि अथ अनकरणाने भरलेले लिखाण ज्याला दरशोज वाचावे लागत असेल, त्याला या लेखन-प्रकाराचा वीट येणे स्वाभाविक आहे. लष्कथेपेक्षा लघ्ननिबंघ हा वाड्मयप्रकार अधिक सोपा म्हणून नवशिके लेखक हष तसा हाताळू लागळे आहेत. पण महत्त्वाची गोष्ट त्याच्या ध्यानात आलेली दिसत नाही. हा वाइमयप्रकार केवळ व्यक्तिनिष्ठ आहे. तंत्रकाशल्याला त्यात विशेष अवसर नाही. लघ्कथेला कथासूत्राची आवश्यकता असल्यामुळे, कठड्याचा आधार घेऊन जिना उतरणाऱ्या मुलाप्रमाणे नवखा लेखक तिची रचना थोडीफार व्यवस्थित करू शकतो.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now