भिषग्वर भाग १ | Bhishhagvar Bhaag 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bhishhagvar Bhaag 1 by गणपत पांडुरंग - Ganpat Pandurang

More Information About Author :

No Information available about गणपत पांडुरंग - Ganpat Pandurang

Add Infomation AboutGanpat Pandurang

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र झिपषग्वर'. जतुबीज (8901'63 ) असें म्हणतात. हद्दी जंतुबिजें प्रत्यक्ष जंतंपेक्षां नाश करण्यास फार कठीण असतात. अशा जंतूपैकीं कित्येक प्रत्यक्ष रोग उत्पन्न करितात त्यांस रोगजंतू असें म्हणतात. कित्येक जंतु रोगोत्पादक नसून ते मृत प्राण्याचे शरीर वगेरे मध्यें सांपडतात. क्षय, ऑंत्रक्षतज्वर वैगरे रोगांचे विशेष प्रका- रचे जंतु असतात व ते अशा रोग्यांचे शरीरांत आढळतात. परंतु फुफ्फुसदाह, विसर वगेरे रोगांनी पछाडलेल्या रोग्यांत अनेक प्रकारचे रोगजंतु एकत्र असलेले सांपडतात. अशा रोगजंतूंचा« शोध प्रथम डॉ. लिस्टर यांनी लाविला व कॉच साहेवांनी त्यानंतर पुष्कळ शोध लावून ह्या जंतुशाख्राची वृद्धि केली. जंतुशास्त्राचा इति- हास देण्याचे हें स्थल नाहीं तथापि ल्युवेनहॉक, मुर, श्वान, कॉने, पाश्र्‍चुर, लिस्टर, काच, एंक वगेरे जंतुझोधकांचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत यांत शंका नाहीं. रोगजंतु निरनिराळ्या मा्गीनीं शरीरांत प्रवेश करितात. कित्येक श्वासमार्गानें प्रवेश करितात. उदा; स्कालेंट फीव्हर, टायफस फीव्हर, गोवर, डांग्या खोकला, घटसर्प ह्यांचे सृक्ष्मजंतु. कित्येक मुखमार्गानें प्रवेश करितात. उदा; टायफॉइड फीव्हर, संग्रहणी, कॉलरा ह्यांचे सूक्ष्मजंतु. कित्येक गुद्येंद्रियांच्या अंतःत्वचेमार्फत प्रवेश करितात. उदा; फिरगोपदंश, पूयप्रमेह ह्यांचे सृक्ष्मजतु. कित्येक शरीरावर कोठ जखम पडली असेल तर तीतून प्रवेश करितात उदा; फिरंगोपदश, अलक- विषाचे सूक्ष्मजंतु. अशा रोगजंतूंचा कोणत्या तरी मागीनें शरीरांत प्रवेश झाल्यावर कांही मुदतीपर्यंत त्यांचा शरीरावर कांद्दीहि परिणाम झालेला दिसून येत नाहीं. त्या मुदतीनंतर त्या त्या विशेष रोगाची लक्षण दृष्टीस पटू * जंतुशासत्रावर विस्तारपूर्वक माहिती आमच्या 'रोगजंतु'* नांवाच्या पुस्तकांत दिली आहे ती पहावी,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now