पांढरपेशांचें जग | Paandharapeshaanchen Jag

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Paandharapeshaanchen Jag  by ज. जोशी - J. Joshi

More Information About Author :

No Information available about ज. जोशी - J. Joshi

Add Infomation About. J. Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१२ पांढरपेशांचे जग केसांना वास्तव्य करण्याची परवानगी दिली होती. काणे मास्तर स्तब्ध होते. फक्त त्यांच्या डोळ्यांत निराहोचें पाणी कांठोकांठ भरत चाललें होतें. कीतिकर हेडमास्तर आमच्याकडे वळून म्हणाले, “मुलांनो, औद्योगिक आणि महत्त्वाकांक्षांच्या पूर्तीची खोटी पोपटपंची करून आम्ही तुम्हांला पिढ्यान्‌पिढ्या फसवीत आहोंत, उद्योगाला किंमत नाहीं, महत्त्वाकांक्षांना तर त्याहूनहि नाहीं. हल्लींच्या जगांत सवेत्न कंपूशाही आहे. माणसानें कितीही प्रयत्न केला तरी त्याला ठराविक मर्यादेबाहेर जाणें शक्य नाहीं.” काय भेसूर दिसत होते ते त्या वेळी ! त्यांची उंची जास्तच वाढली होती. डोळ्यांत कसल्या तरी दारुण विषादाची चमक दिसत होती. “म्हणून माणसांनी जगांतली कंपूशाही हाणून पाडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, नाहीं तर...” इतकें बोळून ते लहानग्या अविनाशजवळ गेले. “नाहीं तर तुमच्या पिढीची जशी स्थिति झाली, तशीच पुढच्या पिढ्यांची होईल. हल्लींच्या जगांत, उद्योगावर आणि कतेंबगारीवर मोठेपणा नसतो. उदाहरणार्थ, हा अविनाश... इतकें बोळून त्यांनीं अविनाशची मानगूट धरून त्याला वर उचलले, “ होती का याच्यांत बुद्धिमत्ता ! श्रीमंत बापाचा एकुलता एक पोरगा म्हणून शाळेंत आम्ही याचें कौतुक करीत होतों. पण हा काय अभ्यासू होता, आयु- ष्यांत पुढें येण्याकरितां झटत होता १ छे. पण हा तुमच्याबरोबर मॅट्रिक पास झाला, बापाची श्रीमंती असल्यामुळें, पांचसहा वर्षे कॉलेजमध्ये राहून पदवी न घेतां परत आला, पण आतां याचे काय झालें आहे... त्यांनीं एकदा लहानग्या अविनाशकडे बघून, त्याला वर उचलले; वते म्हणाले, “वडिलाजिंत इस्टेटीमुळें गांवांतील झब्षूमध्यें याची गणना झाली; आणि असें म्हणून त्यांनीं हातांतल्या अविनाशला दूर अंतराळांत भिरकावला. ते काय आश्चये, तो लहानगा अविनाश वितळून जाऊन, त्याच्या जागीं स्वच्छ नेहरू शट घातलेले, आमच्या गांवाचे पुढारी अविनाश हे उभे राहिले, दुसरें उदाहरण घ्या.” असें म्हणून ते गोदावर्यपाशी आले, गोदावरी जोरांत लिहून घेत होती. तिला वर उन्चळून ते म्हणाले, “ तीस वांपूर्वी तुमच्या वर्गीतील मन लावून अभ्यास करणाऱ्या या मुलीच्या आकांक्षा काय होत्या, हें माहीत आहे! तिला हिंदुस्थानांतील एक उत्तम कार्यकती स्त्री




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now