ध्यान - योग | Dhyaan Yog
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
69
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)ध्यान-योग ११
ताता. लिगक . 5 क
होऊन साधक निष्त्साह व उदासीन होऊं लागतो. असें झाल्यास
पराकष्ठेचें दक्ष राहुन मनावर मालिन्य न येऊं देण्याची सारखी
खटपट केली पाहिजे. हें करणें किती कठीण आहे, तें 'जावें त्याचे
वंशा तेव्हां कळे.' ह्या पद्धतींत दुसरा एक अवगुण असा आहे कां,
कांहीं अभ्यासानंतर एकेका अवयवावर जरी सारखी दृष्टि ठेवून
त्याचें चित्र 'सु-रेख' रेखाटतां आलें तरी एकेका अवयवापुरती
दृष्टीची पोंच आकुंचित करण्याची संवय लागल्यामुळें धारणेच्या
वेळीं सबंध मूति तशीच चित्तचक्षूंपुढें कांहीं काळ स्थिर करतांना
दृष्टीची पोंच सबंध मूर्तीभर चांगलीशी बसत नाहीं व हिरा नवीन
पद्धतीच्या सुट्या कोंदणाच्या कांट्यांत जसा चोहोंकडॅन गच्च
पकडावा तशी मूर्ति चोहोंकडून चित्तानें वेढून पकड बसवितां येत
नाहीं. ह्या पद्धतीनें अभ्यास करणें म्हणजे खरोखरी भ्यान' व
'धारणा ह्या दोहोंचा एका क्षणीं अभ्यास करू पाहणें आहे. ह्या
पद्धतीप्रमाणें कल्पित अवयवांची “धारणा' करून ती सतत तशीच
राखन, त्याच क्षणीं पुढच्या नवीन कल्पावयाच्या अवयवांचें ध्यान
करावयाचें व तो अभ्यास पुरा झाल्यावर तोही पुन: 'धारणेंत
घालून पुढे पुनः तिसर्या अवयवाच्या ध्यानास सुरुवात करावयाची
असेंच करीत पुर्ढे जावें लागतें.
अभ्यासाची दुसरी पद्धति म्हणजे अशी कीं, अवयवांची
पृथक पृथक् कल्पना न करितां चित्तचक्षूपुढें ध्येयमूति एके
समयीं एकदम सावयव उभी करावी. ही कल्पना समजून घेण्यास
मॅजिक लंटरनंचा दुष्टांत फार चांगला उपयोगी पडेल. मॅजिक लॅन्ट-
तेच्या लेन्सपुढें चित्रांची कांच धरिली असतां तिचें चित्र समोरच्या
पडद्यावर जसें सर्व जागीं एकदम उमटतें त्याप्रमाणें मनाच्या लेन्स-
मधून कल्पनापटावर ध्येयाकृति एकदम उमटवावी व तगीच ती
धरून ठेवण्याचा यत्न करावा. हें सांगणें अगर लिहिणें जितकें
सोपें आहे तितकें करणें सोपें नाहीं. पहिल्या पद्धतीपेक्षां ही पद्धत
जास्त कठीण व कष्टसाध्य आहे; पण ज्याची कल्पनाशक्ति चांगली
असेल त्यास फारशी कठीण नाहीं व साधल्यास पुढचा मार्ग सुगम
User Reviews
No Reviews | Add Yours...