प्राचीन साहित्य | Praachiin Saahitya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Praachiin Saahitya  by रामचंद्र बळवंत आठवळे - Ramchandra Balvant Aathvale

More Information About Author :

No Information available about रामचंद्र बळवंत आठवळे - Ramchandra Balvant Aathvale

Add Infomation AboutRamchandra Balvant Aathvale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
९ साहित्यांत हाताचे बोटावर मोजण्याइतकीही सांपडू नयेत हें स्वाभाविकच आहे. पण एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासून पोर्वात्य व पाश्‍चात्य संस्कृतीचा जो परस्परसंघर्ष होऊं लागला त्याचा परिणाम दोन्ही संस्कृतीवर होऊन प्रत्येक संस्कृतीतील एकांतिकपणा हलके हलके कमी होऊं लागला. आज तर हया दोन्ही संस्कतीचा परस्परांवर इतका जबरदस्त प्रभाव पडला आहे की, आम्ही वर सांगितलेली बुद्धीची विशेषता आतां पाश्चात्य किवा पौरस्त्य कोणांतही उत्कट- त्वानें राहिली नाही. आतां तिकडे पाहचात्य साहित्यातही “हास्य” हया एकाच विषयाचा सुक्ष्मतम प्रपंच करून त्यावर एक बडा ग्रंथ लिहिला जातो तर आपल्याकडेही आतां महाराष्ट्रांत तात्या- साहेब कोल्हटकरांसारख्या मामिक टीकाकाराकडून एक -' तोतयाचें बंड ' हें नाटक घेऊन त्याचें अत्यत व्यापक दृष्टीनें ( आणि सुक्ष्म- दृष्टीनेही पण ) विशाल परीक्षण केलें जातें, अथवा ** दुटप्पी कीं दुहेरी ” ह्या छोटेखानी कथेवर श्री. वामनराव जोश्षी यांच्या- सारख्या अत्यंत सहृदय व कुशल ता्किकाकडून बहुत्परीक्षण व्यापक दृष्टीनें लिहिले जातें; आणि आतां बंगाल्यांतही ह्विजेंद्रलाल रायसारखा विद्वान लेखक तोलनिक अभ्यास करून ( कालिदास ओ भवभूति* यासारख्या एक सुदर निबंध लिहितो आणि रवींद्रबाबसारख्या सह्ददय टीकाकारांच्या हातून प्रस्तुत पुस्तकांतील ' छुमारसंभव आणि शकुंतला १ अथवा * शकुंतला ' अह्षा तऱ्हेचे मारभिक व तौलनिक दृष्टीनें संपन्न असे निबंध उतरलेले दिसतात. अशा रीतीने आज हिंदुस्थानांतील प्रमुख भाषांच्या साहित्यांतून उपरिनिदिष्ट प्रकारचें लिखाण सुरू झालेलें असलें तरी अजूनही आपल्या मािकपणानें, व्यापक दृष्टीनें व॒ तौलनिक अभ्यासानें रसिकांना माना डोलवावयाला लावतील असे आधुनिक पद्धतीचे टीकाकार उभ्या हिदुस्तानांत थोडेच सांपडतील. महाराष्टांतही असे प्रतिभाद्याली टीकाकार अजून फारसे नाहींत. अशा स्थितींत
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now