तिस्तेकाठचा वृत्तांत | Tistekaathachaa Vritaant

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Tistekaathachaa Vritaant by देवेश राय - Devesh Rayविळास गिते - Vilas Gite

More Information About Authors :

देवेश राय - Devesh Ray

No Information available about देवेश राय - Devesh Ray

Add Infomation AboutDevesh Ray

विळास गिते - Vilas Gite

No Information available about विळास गिते - Vilas Gite

Add Infomation AboutVilas Gite

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
न्यावडा नदीतील नाव 7 पाण्यात धपाधपा उतरून, 'है-है' करीत करीत नावेच्या दिशेने पळत निघतात. शेळीवाला ताबडतोब शेळीला खांद्यावर घेतो आणि त्याने खांद्यावर घेतल्याबरोबर शेळी शेपटी उंचावून लेंड्या टाकते. जणू ती या संधीची वाटच पहात होती. जणू त्या माणसालाही याची कल्पना असावी. त्याने शेळीला खांद्यावर अशा प्रकारे घेतलेलं असतं की लेंड्या त्याच्या अंगाला लागतही नाहीत, बाहेरच पडतात. त्याच्या अंगावर लेंड्या न टाकता आल्यामुळेच जणू शेळी तारस्वराने चित्कार करून त्याच्या खांद्यावरून निसटून जाण्याचा प्रयत्न करते. पण तो माणूस खांद्यावर शेळीचे चारी पाय दाबून धरून उडी मारून नावेत चढतो. साईनबोर्ड घेतलेली ती दोन माणसंही अशी काही नावेट,डे पळतात, की जणू ती दोघे साईनबोर्ड विकायलाच चाललेली आहेत, जणू हा साईनबोर्ड विकायचा 'सी न'च आहे! पण, मोठा साईनबोर्ड नावेत कडेला टॅकून ठेवल्यावर आणि छोटा साईनबोर्ड पाठीशी टाकून तो माणूस उभा राहिल्यावर वाटतं, खरोखर ही सारी नाव कृत्रिम गो- प्रजनन केंद्र' आणि 'संक्रमण छावणी' आहे. नावाड्याने नाव घाटापासून आधीच सोडलेली होती. या लोकांच्या ओरडण्यामुळे तो नाव आणखी पुढे वल्हवीत नाही. हे लोक नदीकाठचा चिखल तुडवीत येऊन कसेबसे नावेत चढलं आहेत. नावेचा पाय ठेवायचा खालचा तळ भिजलेलाच होता. हे लोक तो आणखी भिजवतात. सगळ्यांना नावेत चढताही येत नाही. पण आता लोक खूप झाले आहेत पाहून नावाडी लग्गीच्या सहाय्याने नाव पुढे नेतो. आणखी थोडं वल्हवल्यावर तर पैलतिरावर जाता येईल इतकी ही छोटी नदी! बहुधा कुठे-कुठे तर ती चालतही पार करता येते. पण सगळ्याच ठिकाणी नेहमीच एकाच खोलीचं पाणी असत नाही. शिवाय वरून छोटामोठा पूरही य्रेऊ शकतो. म्हणूनच लोक नावेतून नदी पार करतात. नावेत सगळेच उभे राहिलेले आहेत. त्यांच्यात इकडच्या बाजूचा सगळ्यात मोठा जोतदार नोशेर आलम हासुद्धा आहे. वक्फ इस्टेटचा मालक. हजारो बिघे जमीन त्याच्या ताब्यात. डूयार्सचा जेव्हा प्रथम बन्दोबस्त करण्यात आला, तेव्हापासून नौशेर आलम इकडच्या सगळ्या जमिनीचा मालक आहे. खासजमिनीचा कायदा पास झाल्यापासून गेली पंचवीस-तीस वर्षे नौशेर आलमशी सरकारचे कोर्टात मामले चालूच आहेत. अनेक केसेस सुप्रीम कोर्टापर्यंत गेल्या-त्यातल्या बऱ्याच केसेसमध्ये नौशेर आलम जिंकला, सरकार हरलं. त्याशिवाय बऱ्याच जमिनींमध्ये दहा ते वीस वर्ष इंजंक्शन झालंय. इंजंक्शनचा निकाल लागत नाही. तोपर्यंत त्या जमिनीतलं पीक नौशेर आलमच्याच ताब्यात जातंय. सर्वांना असं वाटतं, की सरकार आलमच्या जमिनीवरच्या गवतालाही स्पर्श करू शकत नाही. आलमची जमीन कसणारे काही अधियार लोक अधूनमधून त्याचा वाटा देत नाहीत.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now