मराठी वाचन पुस्तकें २ | Maraathii Vaachan Pustaken 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maraathii Vaachan Pustaken 2 by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
घु एकदम माझ्या डोक्यांत लखकन प्रकाश पडला. आमच्या मास्तरांनी आज मोठा पोषाख कां केला, आणि आज ही म्हातारी .मंडळी शाळेला पुनः कां आली, तं मी आतां पुरते समजली. काय ? आमच्या फ्रेंच भाषेच्या अभ्यासाची इतिश्री ! भलतेंच कांहीं तरी ! मला तर अजून चार ओळी देखील नीटपणे लिहितां येत नव्हत्या. अरेरे, आज- पर्यंत टंगळमंगळ करून शिकण्याकडे दर्लक्ष केलं, त्याचे मला आतां कितीतरी वाईट वाढूं लागळें एकदम. जीं बुके आजपर्यंत मला डोळ्यां- समोर नको असत, तींच आज मला दूर निघून जायला तयार झालेल्या प्रिय मिब्राप्रमाणें अत्यंत प्रिय वाढूं लागलीं ! मास्तरांनी माझ नांव घेतलेल माझ्या कानीं पडलें. आज जर भविष्य- काळाचे सर्व नियम मळा बिनचूक सांगतां आले असते तर मीं काय पाहिजे तं खुषीने दिलें असत. पण आतां काय उपयोग ? मी खालीं मान घालून नुसता उभा राहिलो. मला अतिशय वाईट वाटत होते; पण वर मानसुद्धां करणे मला अशक्य झालं. मी नेहमीप्रमाणे कोरडा ठणठणीत आहें, असें पाहून मास्तर रागावले नाहींत. उलट ते आज मृदु स्वराने मला म्हणाले : “अरे मुला, आज मी तुठा बिलकुल रागे भरत नाहीं. देवानॅच तुम्हांआम्हांठा आज रगड शिक्षा दिली आहे. आजपर्यंत रोज तूं म्हणत आला आहेस कीं इतकी घाई काय आहे, उद्यां शिकतां येईल मला. अन्‌ आज आतां काय परिणाम झाला आहे, तो पहा. या आल्सेसमध्यें आपल्या सर्वांची मोठी चूक जी झाली ती हीच कीं, आजच कशाला उद्यां शिकतां येईल असें आपण सारे म्हणत आलों आणि आतां जर्मन सरकार आम्हांला म्हणणार कीं, जर तुम्हांला आपली मातृभाषा छिहितांवाचतां येत नाहीं, तर तुम्ही आपणांला फ्रेंच लोक कसे म्हणवतारे ?” येथें आमच्या मास्तरांना मातृभाषेच्या प्रेमाचा उमाळा आल्य. ते म्हणाले: “ अहाहा ! आमच्या फ्रेंच भाषेसारखी सुंदर, तिच्याप्रमाणें जोर- द्वार, अन्‌ इतक्या विपुल शब्दांनी भरलेली अशी दुसरी भाषा त्रिभुव्तांत




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now