पाणिग्रहण | Paanigrahan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Paanigrahan by प्र. के. अन्ने - Pra. Ke. Anne

More Information About Author :

No Information available about प्र. के. अन्ने - Pra. Ke. Anne

Add Infomation About. . Pra. Ke. Anne

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
नीरा : तुमचं काव्य राहूं द्या बाजूला ! तुम्ही लग्न कधीं करणार तें सांगा अगोदर ! चंडोल : (खोट्या रागाने ) तुम्हीं कशाला हो उठाठेव चालविली आहे माझ्या लग्नाची आजकाल १ मी एकटा आनंदामध्यें राहातो आहे इथं म्हणून तुम्हाला हेवा वाटतो होय माझा? (एकदम विरसून ) क्षमा करा हं! मी त्या अर्थानं बोललों नाहीं; मला वाटलं लग्न या संस्थेचा तुम्हाला तिरस्कार वाटत असिल. खरंच सांगा नीराताई, तुमच्यासारख्या देवतातुल्य पत्नीचा आणि चंदूसारख्या तेजस्वी रत्नाचा त्याग करणारा नरपश्ञ्‌ ज्या विवाहसंस्थेमधून निर्माण होतो, त्या संस्थेबद्दल माझ्यासारख्या भावनाप्रधान कवीला कसं प्रेम वाटणार ! नारा : सगळ्यांच्याच वांट्याला माझ्यासारखं दुदैव येत नाहीं. चंडोल, ( आजे: बाजुला बघून ) काय हा तुमचा संसार ! कसा यांत तुम्हांल आनंद वाटतो ! कुणी आलं इथं तर म्हणेल कीं हें घर आहे का गोठा! चंडोल : नीराताई, आम्हीं कविललक काय माणसांत जमा असतों अशी तुमची समजूत आहे १ एकदां आमची ब्रह्मानंदीं टाळी लागली म्हणजे मग आम्हांला भूक नाहीं कीं तहान नाहीं, काळ नाही कीं स्थळ नाही! (स्टोव्ह दाखवून ) ही आमची अकन्नपूरणादेवी बघा ! घासलेट नसल्यामुळें गेल्या आठ दिवसांत पेटली नाहीं. म्हणून आम्हांला कांद्दी तिची परवा आहे का! नीरा : शर्थ आहे तुमच्यापुढं ! मग घेऊन कां आलां नाहीं घासलेट १ चंडोल : महाराष्ट्राचा एवढा मोठा मी कवि, नीराताई ! हातांत टिनपाट घेऊन त्या घासलेटच्या रांगेमध्यें तासन्‌ तास उभा राहूं होय रस्त्यावर ! नीरा : (टेबलावरचें घड्याळ उचलत ) आणि हें तुमचं घड्याळ ! वाहवा, घड्याळ पण घड्याळ आहे!; किती दिवसांत किछी दिली नाहींत हो याला! चंडोळ : त्याला किलछी देऊन उपयोग काय १ त्याचा तास कांटा तुटून एक वर्ष झालं ! बिचारं एकाच पायावर लंगडत होतं पुष्कळ महिने ! त्याचे हाल पहावेनात म्हणून मींच त्याला किली द्यायचं बंद केले शेवटीं ! काळाची आठवण इथं आहे कुणाला १ नीराताई, तुम्हांला वाटत असेल कीं मी इथं खेलींत रहातो! नीरा : ( आश्चर्यानें ) मग ! चंडोल : मी या खोलींत रहात नाहीं, नीराताई ! मी वर रहातों हा वर! ( नीरा वर- बघते, ) आढ्याकडे काय बघतां १ तिथं नाहीं ! अह्दो, वर म्हणजे स्वर्गात, एकदम वर ! अप्सरांच्या गळ्यांत हात घाळून आम्ही नंदनवानांतून सांजसकाळ र




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now