अळंकार प्रदीप | Alankaar Pradiip

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : अळंकार प्रदीप  - Alankaar Pradiip

More Information About Authors :

ग. त्र्यं. देशपांडे - G. Tryan. Deshpande

No Information available about ग. त्र्यं. देशपांडे - G. Tryan. Deshpande

Add Infomation AboutG. Tryan. Deshpande

पु. गो. निजसुरे - Pu. Go. Nijsure

No Information available about पु. गो. निजसुरे - Pu. Go. Nijsure

Add Infomation AboutPu. Go. Nijsure

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
३ र किंवा व्यंजना असतात. यापिकी अभिधा व लक्षणा इतर दास्त्रांनीहि मानल्या आहेत. पण व्यंजक शब्द, व्येग्य अर्थ, व्ग्यव्यंजक॒संबंध आणि व्यंजना व्यापार या गोष्टी साहित्यशास्त्रानेच मानल्या आहेत, किंबहुना हाच साहिय- शास्त्राचा विशेष विषय होय, म्हणूनच मम्मट “स्याद्वाचको लाक्षाणिकः दब्दो उत्र उयंजकल्रिघा-” यावर वृत्ति लिहितांना “अत्र ? म्हणज “काव्ये १ अशी टीप दतो. बृत्तिभेदाने शब्द वाचक, लाक्षणिक किंत्रा व्यंजक असतो. याचा अथ असा नव्हे की कांही शब्द केवळ वाचक, तर कांही केवळ लाक्षणिक, तर कांह केवळ व्यंजकच असतात. वृत्तिमेदाने तोच शब्द वाचक, लाक्षणिक किंवा ब्यंजक असू शकतो. उदाहरणाथ * भाई? हा शब्द घेऊं, आई म्हणजे जन्म देणारी स्त्री. हा आई शब्दाचा मुख्यार्थ झाला. * रामाची आई कौसल्या ? या वाक्यांत आई हा शब्द सुख्यार्थान आला आहे. या मुख्याथांचा आई हा शब्द वाचक होय. उलट “गरज ' ही कल्पकतेची आई होय ” ( ऐर०८९५४॥ ५ 15 06 ७७०६७६7 0 10एपं०0 ) येथ आई शब्दाचा मुख्याथं घेऊन निभाव लागत नाही. येथ आई-उत्पत्तीच कारण असा भर्थ घ्यावा लागतो. हा लक्ष्या असून येथ आई शब्द लाक्षणिक आहे, परंतु भक्त जेव्हा देवाला ““ आई 55” म्हणून हाक मारतो किंवा--- तू माझी माऊली मी वो तूझा तान्हा । प्रमे खोडी पान्हा, पांडुरंगे ॥। अस आढवतो त्या वेळीं त्याच्या * आई ', *माऊली” या हाकंतून द्योतित होणारी त्याची आतेता, करुणा, ओढ इत्यादि भावना म्हणजे व्यंग्यार्थ होय, या व्येग्यार्थांची आभिव्यक्ति करणारा आई हा शब्द व्यंजक होय. अशा प्रकार एकच शब्द दृलतिभेदाने वाचक, लक्षक किंवा व्यंजक होऊं शकतो,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now