जगाचें राजकारण १ | Jagaachen Raahakaaran 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Jagaachen Raahakaaran 1 by वसंत मंजुनाथ - Vasant Manjunath

More Information About Author :

No Information available about वसंत मंजुनाथ - Vasant Manjunath

Add Infomation AboutVasant Manjunath

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अर्थ साधनें [३ राष्ट्रराज्यांना केवळ झांततेच्या काळांतच करावं लागतें असें नाहीं. युद्धकाळात देखील या विधिनियमांचें पालन युद्धमान व तटस्थ राष्ट्रे कसोशीने करतात. निरनिराळ्या राष्ट्रांतील संघर्षामुळे युद्धे निर्माण होतात. विसाव्या शतकाच्या प्रथमार्थातच जागतिक स्वख्ूपाचीं दोन महायुद्धे लढलीं गेठीं. ग्रा संघर्षामुळे मानवजातीचं आणि संस्कृतीचे केवढं अपरिभित नुकसान झालें याची मोजदाद कधींच करतां येणें शक्‍य नाहीं. पण या संघ्षीतूनच मानवजातीला आशादायक वाटणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटना निर्माण झाल्या. वरील तीनहि प्रकारांची नोंद सुसंगत रीतीने ठेवणें भावी पिढ्यांना मार्गदर्शक ठरतें. हाच आंतरराष्ट्रीय इतिहास होय. जागतिक राजकारणाच्या या सर्व विभागांचा साधा शलाकापरिचय देखील या पुस्तकात करून देणें स्थलाभावीं शक्‍य नाहीं. आंतरराष्ट्रीय संत्रघ आणि आंतरराष्ट्रीय संघटना यांची तोंडओळख करून देण्याइतपतच विवेचन करणें शक्‍य आहे जागतिक राजकारणांत अनेक राष्ट्रांचे परस्परांशी संघर्ष व संबंध निमीण होत असतात. पण या सर्व घडामोडींच्या पाश्चभूमीची छाननी केल्यास रा्रीय सामर्थ्य व त्याचा उपयोग करून सत्ताराजकारणांत यशस्वी होण्याचा प्रयत्न प्रत्येक राष्ट्र करीत असतें असें दिसून येते, हे राष्ट्रीय सामर्थ्य अनेक साधनांवर अवलंबून असते. या साधनांच्या अनुकुल्तेनुसारच प्रत्येक राष्ट्राचे जागतिक राजकारणांतील स्थान निश्चित होत असतें, स्थूलमानाने कोणत्याहि राष्ट्राचें सामथ्य खालील साधनांवर अवलंबून असते असें म्हणता येईल (१) लोकसंख्या (२) साधनसंपत्ति (३) औद्योगिक व शास्त्रीय प्रगति (४) लष्करी सुसजता (५) राष्ट्रीय चारिब्य व मनोवेरय (६) स्थिर राज्यव्यवस्था (७) जीवनविषयक तत्वशान, (१) लोकसंख्या :---राष्ट्राचं जागतिक राजकारणांतील स्थान त्या “राष्ट्राच्या लोकसंख्यवर कांहीं अंशीं अवलंबून असतें, हें उघड आहे,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now