महाराष्ट्राचा इतिहास १ | Maharashtracha Itihas 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maharashtracha Itihas 1 by शांताराम - Shantaram

More Information About Author :

No Information available about शांताराम - Shantaram

Add Infomation AboutShantaram

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
४____________*__महाराष्ट्राचा इतिहास खोर्‍्यांचा समावेश होतो. प्राचीन महाराष्ट्रातील मानवी वस्ती या नद्यांच्या खोऱ्यात झाल्याचे आढळते. पाषाणकाळापासून ते इ. पू. सातव्या-आठव्या शतकापर्यंत आणि त्यानंतरच्या ऐतिहासिक .कालातही निरनिराळ्या नद्यांची खोरी वसाहतीसाठी उपयुक्त ठरल्याचे दिसून येते. महाराष्ट्राचा पठारी प्रदेश लाव्हानिर्मित असून जवळजवळ «५ लक्ष चौरस मीटर व्याप्तीचा आहे. हा ट्रॅप वर्गांचा खडक सर्वसाधारणपणे ६५० ते १,५०० मीटर जाडीचा असला तरी काही ठिकाणी तो ३,००० मीटर इतका जाड असल्याचे दिसून येते. या प्रस्तरातून अनेक नद्या नागमोडी वळणे घेत बहुतांशी पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे वाहतात. याला अपवाद फक्त तापी नदीचा. ही नदी पश्‍्चिम-वाहिनी असून, याचे कारण की ही पश्‍चिम समुद्राला मिळण्यात सह्याद्रीची अडचण येत नाही. या उलट कोकणपट्टीतील नद्या पश्‍चिम वाहिनी असून त्या क्वचितच बारमाही वाहणाऱ्या आहेत. कोकण विभागामध्ये पाषाणयुगात आणि त्यानंतरही बऱ्याच काळापर्यंत वस्ती झाली नाही, हे या संदर्भात समजून घेणे आवश्यक आहे. , (त्मा 1986 ; देशपांडे १९७६ ) कोकण अरबी समुद्र एका बाजूस आणि उत्तुंग सह्याद्रीच्या रांगा दुसऱ्या बाजूला अशा दोन निसर्गिक घटकांमध्ये कोकणची किनारपट्टी अडकली आहे. कोकणपट्टीचे सर्वसाधारणपणे दोन विभाग करण्यात येतात. 'उत्तर-कोकण' ५६० कि. मी. लांबीचे असून, दमण ते वेंगुर्ले या भागाचा यात समावेश होतो. वेंगुर्ल्याच्या दक्षिणेस असणारा कोकणचा भाग महाराष्ट्रात समाविष्ट होत नाही. विषम, उंचसखल जमीन, . खोल दऱ्या आणि बहुतांशी पावसाळी नद्या ही कोकणची वैशिष्ट्ये सांगता येतील. कोकणपट्टी गाळ - निर्मित असून यातील मुख्य नदया वैतरणा आणि उल्हास या आहेत. समुद्रावरून येणारे मोसमी वारे सह्याद्रीची भिंत थोपवून धरते आणि त्यामुळे कोकण हा महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त पावसाचा (सुमारे १,५०० ते ३,५०० मि. मी. - दक्षिणेकडे जास्त ) प्रदेश ठरलेला आहे. सह्याद्रीतील घाट आणि खिंडी यांच्या साहाय्याने. देश आणि कोकण जोडले जातात. यातील सर्वात उल्लेखनीय॑ घाट जुन्नर जवळील नाणेघाट असून या घाटातून सरळ बा
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now