समग्र केळकर वाड्मय ५ | Samagra Kelkar Vangmaya 5

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Samagra Kelkar Vangmaya 5 by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
असहका7?रता खंड असृतसरची राष्ट्रीय सभा (ता. १३ जानेवारी १९२० रोजीं गायकवाड वाड्यांतील पटांगणांत लो० टिळक यांच्या अध्यक्षतेखाली झालेलें व्याख्यान. ] राट्रीय क सभेस पूर्वी फार थोडे प्रतिनिधी जात असत; पण प संख्या दिवसेंदिवस हजारांनी वाढत आहे, राष्ट्रीय सभेला जाण्याच्या हेतूंतःपूर्वी लोकांचे देश पाहणें, देवस्थानांची व तीर्थांची यात्रा करणें व देखावे पाहणें असे तीन देकार असत; पण हल्लीं हे सव नाहींसे होऊन राष्ट्रीय सभेस जाव- याचें म्हणजे केवळ राष्ट्रकार्य करण्याच्या बुद्धीनें जावयाचे, पुढार्‍यांनी आपलीं मतें लोकांकडून संमत करून घेण्याकरितां तर अनुयायांनीं आपापल्या पुढा- ऱ्यांच्या मताला पुष्टि देण्याकरितां जावयाचें अशी भावना राष्ट्रांत सर्वत्र झाली आहे. अमृतसरवर अतिशय संकटाचे प्रसंग गृदरले असतांना आणि अधिकाऱ्यांच्या अत्याचारांचें व त्यांस बळी पडलेल्या आपल्या शेंकडों देव- वांधवांचें स्मरण करून देणारी स्थानें डोळ्यांपुढे असतांना अमृतसरच्या लोकांनीं तेथेंच कोग्रेस भरविण्याचें ठरविल्यामुळें या राष्ट्रीय सभेला विष । महत्त्व प्राप्त झाले होतें आणि सुधारणांचा कायदा पास झाल्यामुळें या कायद्या- संबंधानें सव हिंदुस्थान काय म्हणत उठतो याची श्नहानिद्ा यंदाच्या कौग्रेस- मध्ये व्हावयाची असल्यामुळें तर तिला अपूर्व राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले होतें. अमृतसर यंथं राष्ट्रीय सभेचें प्रातिनिधिक स्वरूप नाहींसें झालें, राष्ट्रीय सभेची नतिक शुद्धता नष्ट झाली व राष्ट्रीय सभेतील ठराव वाईट झाले असे तीन आक्षेप राष्ट्रीय सभेच्या कामासंबंधानें काढण्यांत आले आहेत. राष्ट्रीय सभेच्या नैतिक शुद्धतेचा आरोप तर अगदींच फोल आहे. राष्ट्रीय सभेची घटना नंमस्तांनींच ठरविली आहे व दादाभाईसारख्या पुढाऱ्यांनी ज॑ वोरण आंखून दिलें त्याच थोरणाबरहुकूम कॉग्रेसचें काम चाललें आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now