निसर्ग | Nisarg

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : निसर्ग  - Nisarg

More Information About Authors :

उमाकांत ठोमरे - Umakant Thomare

No Information available about उमाकांत ठोमरे - Umakant Thomare

Add Infomation AboutUmakant Thomare

मिर्जि अन्नाराया - Mirji Annaraya

No Information available about मिर्जि अन्नाराया - Mirji Annaraya

Add Infomation AboutMirji Annaraya

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
उन्हाळ्याचे दिवस होते, चैत्र महिना जवळ जवळ संपत आला होता. सायंकाळ व्हायला आली होती म्हणून ऊन्हं उतरणीला लागल्यासारखी झाली, पण उकाड्याला अंत नव्हता. एक सारखा घाम घाम होत होता. अशा या तिन्ही सांजेच्या वेळेला मगदुमच्या घराच्या अंगणात काही मुलं खेळत होती. खेळ जोरात होता. लहान मुलं फेर धरून उभी होती. त्यात तारक्का मुलांना त्यांच्या उंचीनुसार नीट जागेवर उभी कण्यात गढली होती. फेशबाहेर तिची मैत्रीण सुमती खेळ पुढे चालू करायची वाट पाहात उभी होती. तारक्‍्काचं काम आटोपलं तसं ती मुलांना उद्देशून म्हणाली, 'सारेजण हात पुढे करा पाहु. चला खेळ सुरू करू या.' दोघींनी एकमेकींचे हात हातात घेतले. त्यातली एक वर्तुळात आणि दुसरी वर्तुळाबाहेर उभी राहून गायला लागली. 'कबुतर उडालं, घात झाला. मांजराला दूध नाही-कुत्र्याला भाकर नाही -कबूतर उडालं ! कबूतर उडालं !!' आणि हे पालूपद पुन: पुन्हा आळवीत फिरत शहिली.. मधून मधून कोणा न कोणातरी मुलाच्या डोक्यावर हात ठेवून गायची. मोत्यासारखी आई देईन बस, सोन्यासारखी नवरी देईन बस; गाईसारखी बहीण देईन बस..' अशा प्रकारे नाना प्रकारच्या गोष्टी देण्याचं अभिवचन देत देत ती एक एका मुलाला बसवत गेली. लग्नाचा सारा गडबड गोंधळ कालच आटोपला होता. बहुतांश मांडव उतरवला गेला होता; तरी देखील लग्नघशत लहान मोठ्या कामांना तोटा नव्हता. मगदुमांचे मल्ल आळीतल्या लोकांकडून लग्नापुरते वापपयला आणलेले सामान ज्याचे त्याला परत करण्यात आज देखील गुतलेले होते. ही सारी मंडळी आज मल्लच्याच घरी जेवायला. होती. आत यत्रीच्या जेवणाची तयारी चालू होती. मांडवाच्या एका कोपऱ्यात पडलेल्या औरसचौरस लाकडी बैठकीवर पाच सहाजण जेवायचं बोलावणं कधी येतंय याची वाट पाहात बसले होते. बसल्या बसल्या ते आपआपसात झाल्या लग्नाबाबतच टीका टिप्पणी करीत होते. एक म्हणाला, 'काहीही असो, तारक्‍्का सुस्थळी पडली, खूप आहे येवढं है. ' दुसरा म्हणत होता, 'नवरा मुलगा मुलीला शोभेसा नाहीए. वरतीच्या वेळी मुलाला




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now