दशरूपक विधान | Dashrupak Vidhan
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
50 MB
Total Pages :
418
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)द नास्यशास्त्र
कथानकाच्या विकासाचे महत्त्व या प्रकारांत क्रमशः कमी कमी होते. परिणामतः या
इतर आठ प्रकारांत पताका व प्रकरी या दोन अर्थप्रकृतींची योजनाही अनावश्यक ठरते.
तेव्हा परिपूर्ण स्वरूपाचे रूपकप्रकार दोनच - नाटक आणि प्रकरण,
नाटक आणि प्रकरण हे दोन्हीही परिपूर्ण स्वरूपाचे असले तरी त्यांपैकी नाटक
ह्या खूपकप्रकाराचे श्रेष्ठत्व निरपवादपणे मान्य झाले आहे. नाट्यशास्त्रात सर्वप्रथम नाट-
काचा विचार केला आहे, त्यानंतर इतर प्रकारांचा. इतकेच नाही, तर नाटक हा शब्द
रूपक शब्दाचा पर्याय म्हणूनही वापरला आहे. जेव्हा कोणत्या एका विशिष्ट रूपक-
प्रकाराचा निर्देश करावयाचा नसून सर्वसाधारण रूपकांचा निर्देश अभिप्रेत असतो
तेव्हा रूप अथवा रूपक शब्दाऐवजी नाटक शब्दाचा उपयोग अनेक ठिकाणी केला
आहे.
नाटकाचे कथानक प्रख्यात असावे असे म्हटले आहे. याचा अर्थ ते रामायण महा-
भारतादी प्रंथांवरून घेतलेले असावे. त्याचा नायक प्रसिद्ध असा राजा असणे आवश्यक
आहे. राजाब्यतिरिक्त इतर कोणीही नाटकाचा नायक असू शकत नाही. नाटकात देव
नायक असत नाहीत याचे कारण अभिनवगुप्ताने असे दिले आहे की नाटकात विविध
भावांचा व रसांचा आविष्कार आव्यक असतो. पण देवांच्या संबंधात वित्रलम्भशुड्गार,
करुण, भयानक आदि रसांची व तत्संबद्ध भावांची योजना नसेल तर नाटकाच्या रंजक-
तेत वैचित्र्य येणार नाही, व त्यामुळे प्रेक्षकांमध्ये हृदयसंवाद उत्पन्न न झाल्याकारणाने
रसास्वाद असंभव होईल. शिवाय, देव दुःखापासून मुक्त असतात. तेव्हा त्यांच्या 'चरि-
तात दुःखमय प्रसंगांच्या निवारणाचे उपाय दिसून येत नसल्यामुळे प्रेक्षकांना तशा नाट-
कापासून काही बोघही घेता येणार नाही. इतर काही रूपकप्रकारांत देव नायक असू
शकतात, पण नाटकात नाही. उत्तरकालीन साहित्यदपणात मात्र नाटकात सुद्धा द्वय
नायक असू शकतो असे म्हटले आहे. (सा. द. ६.९).
नाटयशाब्राच्या चोविसाव्या अध्यायात धीरोद्धत, घीरललित, धीरोदात्त आणि धीर-
प्रशान्त अशा चार प्रकारच्या नायकांचा निर्देश केला असून देव घीरोद्धत असतात, राजे
घीरळलित, सेनापति आणि अमात्य धीरोदात्त आणि ब्राह्मण व वणिक धीरप्रशान्त असतात
असे पुढे म्हटले आहे (२४.१७-१९), त्यावरून असा निष्कर्ष निघण्याचा संभव आहे की
नाटकाचे नायक जे राजे ते संत्र ललित प्रकृतीचेच दाखविणे आवश्यक आहे. परंत हा
निष्कषे मान्य होण्यासारखा नाही हे उघड आहे. नाटकाच्या वर्णनात नायक उदात्त
असावा असेच म्हटले आहे. यासंबंधात अभिनवगुप्ताने असे स्पष्टीकरण केले आहे की ललित
प्रकृती कोणा नायकाच्या ठिकाणी दाखवावयाची असेल तर ती फक्त राजाच्याच ठिकाणी
दाखवावी, इतर कोणाच्या नाही.
User Reviews
No Reviews | Add Yours...