कोणे एके काली - 1 | KONE EKE KAALI , PART- 1

Book Image : कोणे एके काली - 1 - KONE EKE KAALI , PART- 1

More Information About Authors :

एम० चोकसी - M. CHOKSI

No Information available about एम० चोकसी - M. CHOKSI

Add Infomation AboutM. CHOKSI

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
“ ही आतल्तेच मी!” बाई म्हणाल्या. “आत्ताच आणखी एक पाहुणे आलेत. उत्तरेकडचे शिल्पकार आहेत म्हणे. खूप लांबून आलेत. त्यांना भूक लागली आहे.” कोपऱ्यात बसलेला एक म्हातारा मध्येच म्हणाला, “आपले महाराज स्वतः योड्े आहेत. योद्धयांच्या कुळातला त्यांचा जन्म आहे. आणि तरी त्यांनी म्हणे युद्ध करायचं सोडून दिलं. अशाने शांतता टिकेल कशी १” “पण टिकली आहे की शांतता!” न्यापाऱ्याने ठासून सांगितले. “परक्या शत्रंपासून आपल्याला भीती नाही. कारण हल्ला करण्याची त्यांची हिंमत नाही सैनिक आपापल्या घरी आहेत त्यामुळे पूर्वीसारखा, ते जातील तिथल्या लोकांना त्यांना पोसावं लागेल तोही त्रास नाही. 'चोरांपासून धोका नाही; कारण महाराजांचे शिपाई सगळीकडे सुव्यवस्था ठेवताहेत. अधिकाऱ्यांचं भय नाही; कारण आता ते स्वतः सगळे कायदे पाळतात आणि लोकांना पाळायला लावतात. नोंदणी अधिकारी हसला, म्हणाला, “आणि आम्ही सगळ्या नोंदी इतक्या काळजीपूर्वक ठेवतो नि देखरेख इतकी डोळ्यात तेल घालून करतो की कुणी कुणा- कडून जबरीने पैसे उकळण्याचा संभवच नसतो. महाराज वारंबार आपल्या अधिकाऱ्यांना सूचना देतात, की कायद्याचं पालन करा पण प्रेमाने धाकदपटशाने नको.” “पण्‌ महाराजांच्या आजोबांनी नि वडिलांनी जी एवढी सुरक्षा निर्माण केली आहे . तिच्यावर आवन बाहेरून कुठूनही शत्रू हल्ला करू शकेल.” म्हातारबुबा कुरकुरले. आता जोगी मध्ये पडला. म्हणाला, “महाराज राज्य करतात ते धर्माच्या आधाराने. लोकांना भीती दाखवून नव्हे. ” “ ठैन्य कमी केलं आहे असं नाही.” नोंदणी अधिकारी म्हणाला. “सीमांवर चांगला पहारा असतो आणि कायद्याची अंमलबजाबणी केली जाते.” जोगीबुवा म्हणाले, “ आपल्या थोर सम्राटाने घोषणाच केली आहे, “धर्माचं आणि न्यायनीतीचं शिक्षण यापुढे रणदुंदुभीची जागा घेईल. नाहीतरी मुष्याच्या हृदयावर मिळवलेला विजय तोच खरा विजय असतो.” “आणि म्हणूनच ”....न्यापारी म्हणाला, “महाराजांनी आपले धम्मनियम खडकांत नि खांबांवर कोरून ठेवले आहेत. हेत्‌ हा की सर्वांना आपली कतेव्यं समजावीत आणि कायद्याची सत्ता टिकून राह्मवी. देशात जिकडेतिकडे महाराजांचे संदेश कोरलेले आढळतात.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now