जीवनसत्त्व क,ड,ई आणि एंटीऑक्सीडेंटस | VITAMINS ANI ANTIOXIDANTS

VITAMINS ANI ANTIOXIDANTS  by पुस्तक समूह - Pustak Samuhमेघा गोखले - MEGHA GOKHALEवैशाली आगते - VAISHALI AAGTEशोभा राव - SHOBHA RAO

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

मेघा गोखले - MEGHA GOKHALE

No Information available about मेघा गोखले - MEGHA GOKHALE

Add Infomation AboutMEGHA GOKHALE

वैशाली आगते - VAISHALI AAGTE

No Information available about वैशाली आगते - VAISHALI AAGTE

Add Infomation AboutVAISHALI AAGTE

शोभा राव - SHOBHA RAO

No Information available about शोभा राव - SHOBHA RAO

Add Infomation AboutSHOBHA RAO

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
जीवनसत्त्व क, ड, ई आणि अन्टीऑक्लसिडंटस्‌..... 30 गरोदरपणी व त्यानंतर मुलांना स्तनपान देणे चालू असण्याच्या काळामध्ये (ड जीवनसत्त्वाच्या अभावी) शरीरात निर्माण झालेली कॅल्शियमची कमतरता कधीच भरून येत नाही व त्यामुळे त्यांना ऑस्टिओमॅलॅशिया म्हणजे अस्थिमार्दव (हाडात पुरेसे कॅल्शियम नसणे) नावाचा आजार होतो. वय वाढत जाते तसतशी हाडे ठिसूळ होतात. यास ऑस्टिओपोरॉसिस (हाडे सच्छिद्र होणे) म्हणतात. म्हातारपणी शारीरिक हालचालींवर बंधने येतात. बाहेर हिंडणे-फिरणे कमी होते. त्यामुळे पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी ड जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होते. भारतासारख्या उपखंडातसुध्दा ड जीवनसत्त्वाच्या अभावाची लक्षणे दिसून येतात. सतत बुरखा वापरणाऱ्या तसेच दाट लोकवस्तीत राहणाऱ्या लोकांमध्ये अपुऱ्या सूर्यप्रकाशामुळे ड जीवनसत्त्वाचा अभाव निर्माण होऊ शकतो. अभावाची कारणे अपुरा सूर्यप्रकाश- ध्रुवीय प्रदेशात वर्षातील बराच काळ हिवाळा असतो व दिवसासुध्दा फारच कमी वेळ सूर्यप्रकाश पडतो. त्यामुळे अतिनील किरणेसुध्दा फार कमी प्रमाणात उपलब्ध होतात. यास्तव ध्रुवीय प्रदेशातील लोकांमध्ये विशेषतः मुलांमध्ये मुडदूस होण्याची शक्यता अधिक असते. तसेच तेथील वृध्द लोकांमध्येसुध्दा ड जीवनसत्त्वाचा अभाव निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. मांसाहाराचा अभाव- जे लोक पूर्ण शाकाहारी असतात त्यांच्यात अस्थिमार्दव या व्याधीने ग्रस्त झालेले लोक अधिक संख्येने आढळतात. त्वचेचा रंग- त्वचेतील रंगद्रव्यामुळेही अतिनील किरणांच्या शोषणास अडथळा येतो. त्यामुळेही काहीवेळा कृष्णवर्णीयांमध्ये ड जीवनसत्त्व कमी प्रमाणात शोषले जाऊन ब्रुटी निर्माण होऊ शकते. उ या कारणांखेरीज ज्या लोकांमध्ये मूत्रपिंड किंवा यकृत यांच्या कार्यात बिघाड झाला असेल त्यांच्यामध्ये ड जीवनसत्त्व तयार होण्याचे प्रमाण घटते व अशांमध्येही हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण वाढते. ड जीवनसत्त्वाचा दीर्घकाळ व तीव्र स्वरुपाचा अभाव झाल्यास मुडदूस हा आजार होतो. मुडदूस उ उ अकाली जन्मलेल्या (अपुऱ्या दिवसाच्या) मुलांमध्ये ड जीवनसत्त्वाची व्रुटी अधिक आढळते कारण गर्भावस्थेतील शेवटच्या तीन महिन्यात बाळाच्या शरीरातील कॅल्शियमच्या एकूण संचयार्पैकी ८० टक्के संचय होतो. ही संधी या अपुऱ्या खंड ३ पृष्ठ २७४ जीवनसत्त्व क, ड, ई आणि अन्टीऑक्सिडंटस्‌..... 31 दिवसाच्या अर्भकांना मिळू शकत नाही. आईच्या शरीरात जर ड जीवनसत्त्व कमी असेल आणि तरीही बाळ जर ४ महिन्यानंतर सुध्दा केवळ अंगावरच दूध पीत असेल तर त्या बाळाला मुडदूस होण्याची शक्‍यता जास्त असते. लहान मुलांमध्ये ज्या वेळी शारीरिक वाढ वेगाने होत असते - उदा. जन्मानंतर पहिल्या तीन वर्षात त्यावेळी जर ड जीवनसत्त्वाची न्यूनता उत्पन्न झाली तर त्यामुळे उद्‌भवणाऱ्या विकृतीला मुडदूस म्हणतात. ड जीवनसत्त्वाअभावी कॅल्शियम आणि फॉस्फरस ह्यांच्या चयपचयात बिघाड निर्माण होतो व त्यामुळे हाडांवर दुष्परिणाम होतात. उ ज्या देशात दैनंदिन आहारात माशाचे तेल वापरले जाते तसेच ज्या देशात भरपूर सूर्यप्रकाश असतो अशा ठिकाणी हा रोग आढळत नाही. यूरोप, अमेरिका, कॅनडा या सारख्या देशांमधील मोठया शहरातील गलिच्छ वस्त्यांमध्ये ३०-९० टक्के मुले या रोगाने ग्रस्त आढळतात. भारतातही एकूण ब्रुटीजन्य आजारांपैकी जवळपास ५ टक्के रोगी मुडदुसाचे आढळतात. ड जीवनसत्त्वाअभावी अस्थिपेशींमध्ये कॅल्शियम व फॉस्फरसचे खनिजीभवन नीट होत नाही. हाडांमध्ये कॅल्शियमचा संचय नीट होत नाही. त्यामुळे अस्थिचा मधला भाग मऊ रहातो आणि स्नायूंच्या ताणामुळे लांब हाडे वक्र बनू लागतात. या हाडांशिवाय कवटी, पाठीचा कणा, कमरेचे हाड या मध्येही कॅल्शियमचे खनिजीभवन नीट न झाल्याने वाढ वेडीवाकडी होऊन वि्ठुपता येते. लक्षणे र लहान मुलांमध्ये सुरुवातीच्या काळात मूल चिडखोर होते. स्नायूंमध्ये शिथिलता आल्याने पोट पुढे आलेले दिसते, दात उशीरा येतात, कपाळावर नेहमी घाम येतो, बरगडयांची 'हाडे छातीच्या मध्यावर जिथे जिथे जोडलेली असतात विशेषतः ४ थ्या, ५ व्या व ६व्या फासळयांवर दोन्ही बाजूला जाड गाठी बनतात. त्या छातीवर रुळणाऱ्या मोत्याच्या माळेप्रमाणे दिसतात. त्यांना मुडदूस गुटिकामाळा असे म्हणतात. ज्या ठिकाणी छाती व उदरपोकळी यामधील स्नायूंचा पडदा जोडलेला असतो त्या ठिकाणी छातीभौवती खळगा तयार होतो. या लक्षणाला एडविन हॅरिसन नावाच्या ब्रिटीश वैद्याच्या नावावरुन हॅरिसन खाच म्हणतात. गंभीर रोगात पाठीच्या कण्याच्या भागात कुबड निर्माण होते व ते मूल बसलेले असताना स्पष्ट दिसते. पायातील लांब हाडाच्या वक्रतेमुळे कधी गुडघे एकमेकांपासून लांब जाऊन अथवा गुडघे जवळ येऊन एकमेकांस घासणे ह्या विकृती निर्माण होतात. छातीला बरगड्या जेथे जोडल्या जातात त्या सांध्याच्या जाडीत वाढ होणे हे बहुधा सर्वप्रथम खंड ३ पृष्ठ २७५




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now