आदिम जीवांचा शोध | AADIM JEEVNANCHA SHODH

AADIM JEEVNANCHA SHODH  by पुस्तक समूह - Pustak Samuhविद्याधर बोरकर - VIDYADHAR BORKAR

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

विद्याधर बोरकर - VIDYADHAR BORKAR

No Information available about विद्याधर बोरकर - VIDYADHAR BORKAR

Add Infomation AboutVIDYADHAR BORKAR

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आदिम जीवांचा शोध / ३० क प त रं भय से ४१-१४. पसन रती 2०.29 28 ००22372 ०- १2:4६“ फिक < बाह्यस्तर (कका अ 'स्तर (... हर )) डः ० म रे ग्‌ कः व्‌ न पि न क क नो षक क नाप 2 आ डा ना आकृति १२ झ द्विस्तरीय आणि त्रिस्तरीय शरीररचनेतील फरक क. द्विस्तरीय शरीररचना, ख. देहगुहा विकसित न झालेली त्रिस्तरीय शरीररचना, ग. देहगुहा विकसित झालेली त्रिस्तरीय शरीररचना _ खंड$ पृष्ठ ३० आदिम जीवांचा शोध / ३१ तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणालाही तोंड द्यावे लागेल आणि जलस्तंभाच्या वजनामुळे निर्माण होणाऱ्या दाबालाही तोंड द्यावे लागेल. प्रपुराजीवकल्पामधील अविकसित प्रगतजीवांच्या बाबतीत हे काम आणखीनच कठीण ठरले असणार. कारण त्यांना पदसदृश अवयवही नव्हते आणि त्यांच्या शरीरावर कठीण कवचही नव्हते. तेव्हां उभे विवर करण्यासाठी त्यांनी कोणती पद्धत अवलंबली असणार हे पहाण्यासाठी सांप्रतच्या काळातले कवचविरहित आणि अवयव फारसे विकसित झालेले नाहीत असे प्राणी उभी विवरे निर्माण करण्यासाठी काय करतात याचे अध्ययन करणे इष्ट ठरेल. डॉ. शेफर यांनी सध्या अस्तित्वात असणाऱ्या प्राण्यांच्या विवरे निर्माण करण्याच्या पद्धतीविषयी फार मोठे संशोधन केले आहे. विविध प्रकारची विवरे निर्माण करण्याच्या दहा पद्धती आहेत असे त्यांना आढळून आले आहे. ज्या अविकसित, अळ्यांप्रमाणे शरीर असणाऱ्या, कवचविरहित प्राण्यांचे त्यांनी निरीक्षण केले ते प्राणी उभी विवरे निर्माण करताना लांबुळके शरीर अकदा आखूड करुन आणि अकदा लांब करुन शरीराच्या निरनिराळ्या भागाचे आकुंचन आणि प्रसरण करतात (आकृति ११) अशी हालचाल द्विस्तरीय शरीर असंणाऱ्या प्राण्यांना करणे शक्य होणार नाही. कारण जलस्तंभाच्या वजनाच्या दाबाला आणि त्याच प्रमाणे गुरुत्वाकर्षणाला विरोध करण्यासाठी अशा प्राण्यांच्या शरीरात स्वत:ची द्रवभारप्रेरक यंत्रणाच नव्हती. ती यंत्रणा म्हणजे शरीरांतर्गत अवयव सुरक्षित ठेवण्यासाठीची पोकळी, देहगुहा हीच असली पाहिजे, कारण त्यामध्ये द्रवपदार्थात अवयव सुरक्षित रहावेत असे अनुकूलन असते. ही पोकळी फक्त त्रिस्तरीय प्रगतजीव प्राण्यांमध्ये असते (आकृति १२). कैमूर शैलसमूहामधील खडकांमध्ये मध्यप्रदेशात आणि राजस्थानात जे स्कॉलिथॉस लिनिअँरिस प्रजातीतले जैवलेशावशेष सापडले, ती निर्विवादपणे उभी विवरे आहेत, स्तरपृष्ठाशी काटकोन केलेल्या अवस्थेत आढळली आहेत. ती नक्की कोणत्या प्राण्याने केली हे विज्ञानाला आज ठाऊक नाही आणि पुढेही ते कळण्याची सुतराम शक्‍यता नाही. पण ज्या प्राण्यांनी ही विवरे निर्माण केली त्यांची शरीरे त्रिस्तरीय रचनेने बनलेली होती. आपण पाहिले की कैमूर शैलसमूहातील खडकांचे वय ११५ कोटी वर्षे आहे: याचाच अर्थ . असा की प्रगतजीवांमध्ये त्रिस्तरीय शरीररचना अगदी प्रपुराजीवकल्पातच विकसित झाली होती आणि या गोष्टीचा फायदा अवसादांतर्गत उभी विवरे निर्माण करण्यासाठी झाला, हे निश्चित. उभी विवरे आडव्या विलवरांपेक्षा कोणत्या कारणांमुळे श्रेयस्कर ठरतात, हेही समजून घेतले पाहिजे. अवसाद आणि अवसादावरील जलस्तंभ यांचा संयोग जेथे होतो, ती पातळी बदलू शकते. परिस्थितिजन्य कारणांनी जमा झालेल्या अवसादाचे क्षरण होऊ लागले तर ही पातळी खाली जाऊ शकते, आणि अवसाद जमा होण्याचे प्रमाण अचानक वाढले, तर ही पातळी वर जाऊ शकते. अवसादाच्या पृष्ठभागावर किंवा पृष्ठभागाच्या खाली विवक्षित अंतरावर खंड ३ पृष्ठ ३१




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now