टागोरांच्या गोष्टी | TAGORANCHYA GOSTHI

TAGORANCHYA GOSTHI by पद्मिनी बिनीवाले - PADMINI BINIWALEपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

पद्मिनी बिनीवाले - PADMINI BINIWALE

No Information available about पद्मिनी बिनीवाले - PADMINI BINIWALE

Add Infomation AboutPADMINI BINIWALE

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रयत्न करीत तो म्हणाला, “तो बघ, तो पक्षी बघितलास? तो बघ तो उडाला, अरे गेला! ये रे पाखरा, ये!” हातवारे करत, सारखं काहीतरी बडबडत तो गाडी ढकलत राहिला. परंतु जो मुलगा भविष्यकाळात न्यायाधीश होणार असं भविष्य वर्तवलं होतं, त्याला अशा उपायानं फसवणं कसं शक्‍य होतं? शिवाय पक्ष्यांना आकर्षण वाटावं असं तिथे आजूबाजूला झाडही नव्हतं. त्यामुळे राईचरणनं निर्माण केलेल्या काल्पनिक पक्ष्यांवर फार वेळ काम भागणार नव्हतं. अखेर नाईलाज होऊन राईचरण म्हणाला, “बाळा! तू गाडीत बसून राहा, भी पटकन फुलं तोडून आणतो. मात्र नदीच्या पाण्याकडं जायचं नाही हं5! बघ गेलास तर!'” एवढं बजावून त्यानं गुडघ्यापर्यंत धोतराचा काचा मारला आणि तो कदंबाच्या झाडाच्या दिशेनं निघाला. परंतु ज्या वेळेस राईचरणनं ताकीद दिली, नवकुमारला पाण्याकडे जायचं नाही म्हणून बजावलं, त्याच वेळेस नवकुमारचं मन कदंबाच्या झाडावरून उडून खळाळत वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहाकडे धावलं. त्यानं पाहिलं, नदीचं पाणी खळखळ करत धावत सुटलं होतं. जणू काही त्या हजारो खट्याळ लाटा लहान मुलांसारख्या खळखळून हसत, कोणत्यातरी अद्श्य राईचरणचा हात सोडून सैरावैरा धावत सुटल्या होत्या! दुर्दैवानं त्या छोट्या मुलाचं मन ते पाणी पाहून इतकं अधीर झालं, की गाडीतून उतरून तो हळूहळू नंदीच्या प्रवाहाकडे गेला. जाता जाता त्यानं एक १८/रागोरांच्यागोष्टी - गवताचं पातं तोडून घेतलं आणिं ते मासे धरायचं जाळं आहे अशी कल्पना करून, पुढे झुकून तो मासे धरायला लागला. जणू त्या नदीच्या प्रवाहातील जलपऱ्या चित्रविचित्र आवाज करून त्याला आपल्या खेळघरात खेळायला बोलावत होत्या. 'धप्‌* करून कसलातरी आवाज झाला! पण पावसाळ्यात पद्मेच्या काठी असे कितीतरी आवाज होत असत. राईचरणनं ओंजळभर कदंबाची फुलं तोडली. झाडावरून उतरून तो हसतमुखानंच गाडीजवळ आला. बघतो तो तिथे कोणी नाही! त्यानं चारी दिशांना मोठ्या अपेक्षेनं भिरभिर पाहिलं, पण कुठेच कोणीही नव्हतं! क्षणभर राईचरणचं . रक्‍त. गोठून गेलं. डोळ्यापुढे अंधारी आली. भोवतालचं सगळं गरगर फिरतंय असं भासू लागलं. त्याचं हृदय विदीर्ण झालं होतं. घरी लपून बसलेल्या नवकुमारला तो हाक मारी, तशी प्राण एकवटून त्यानं हाक मारली, “बाबू5 5! अरे माझ्या गुणी बाळा5 5!” पण चन्नला कोणीच उत्तर दिलं नाही. लहान मुलाच्या खट्याळ हसण्याचा आवाज कुठे घुमला नाही. पद्मा नदी मात्र पूर्वीसारख्ीच खळखळ आवाज करत घावत होती. जसं काही घडलेलं तिला कळलंच नव्हतं. जणू काही लहान मुलाच्या मृत्यूसारख्या क्षुल्लक घटनेकडे लक्ष द्यायला तिला फुरसत नव्हती! .. संध्याकाळ झाली. काळजीत पडलेल्या नवकुमारच्या आईनं चारी दिशांना माणसं पाठवली. हातात कंदील घेऊन आलेल्या लोकांनी पाहिलं, तर




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now