साधना - जून 2010 | SADHANA - JUNE 2010

Book Image : साधना - जून 2010 - SADHANA - JUNE 2010

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

साने गुरुजी - Sane Guruji

No Information available about साने गुरुजी - Sane Guruji

Add Infomation AboutSane Guruji

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ती लक्षात घेता आध्यात्मिक साधनेवर अतोनात भर देणाऱ्या आश्रम जीवनाविषयी गुरुजींच्या मनात शंका असू शकतात. गांधी-विनोबांचे आश्रम हे माणसाला निवृत्तिपथावर नेणारे खचितच नव्हते. निःस्वार्थी-निर्मोही-समत्व बुद्धीच्या कार्यकर्त्यांना घडविणाऱ्या त्या कार्यशाळा होत्या. असे असले तरी विनोबांचे आश्रम आणि महात्मा गांधींचे आश्रम यांच्या स्वरूपात काही मूलभूत फरक होते. म.गांधींच्या निकटच्या अनुयायी मीराबेन यांनी त्यांच्या आत्मचरित्रात हा फरक अतिशय बारकाईने नोंदवला आहे. त्या लिहितात, गांधीजींचे आश्रम हे विविधतेने नटलेल्या भारताचीच छोटी प्रतिकृती असत. त्यात विविध प्रवृत्तीचे दीड-दोनशे लोक राहत असत. या लोकांत विविध जाति-धर्मांच्या स्त्रिया -पुरुष आणि लहान मुले, संन्यस्त वृत्तीचे साधक आणि संशयग्रस्त खया सर्वच असत... या उलट विनोबांच्या आश्रमात शांतपणे, कडक शिस्तीने आणि मेहनतीने साधना करणाऱ्या मोजक्याच लोकांचा समावेश असे.” गांधीजी आणि विनोबांच्या आश्रमांतील हा फरक लक्षात घेतला तर विनोबांचे साधकांचे शिस्तबद्ध आश्रम माणसांच्या भुकेल्या साने गुरुजींच्या वृत्तीला मानवणारे नव्हते असेच म्हणावे लागेल. शिवाय समत्व वृत्ती धारण करण्यात आयुष्य खर्ची घालताना सामाजिक-राजकीय हस्तक्षेपासाठीचा अवकाश कधी आणि कसा शोधणार हाही पेच गुरुजींना जाणवला असू शकतो. या संदर्भात गुरुजींनी १९४२'च्या तुरुंगवासात लिहिलेली ' श्यामची पत्रे ' विशेष लक्षात घेण्यासारखी आहेत. गुरुजी या पत्रांमध्ये गांधीवादाची तीन तत्त्वे सांगतात. १. संपत्ती एका हाती न देणे, २. सत्ता एका हाती न देणे आणि ३. लोकांची एकाच ठिकाणी गर्दी होऊ न देणे. या तिन्ही तत्त्वांत विनोबांच्या एकादश व्रतातील अहिंसा-सत्य-ब्रह्मचर्य यांचा समावेश नाही, हे लक्षात घेण्यासारखे आहे. एकादश व्रतातील अस्तेय, अपरिग्रह यासारख्या तत्त्वांमध्ये गुरुजींनी मांडलेली तत्त्वे अनुस्यूत असली, तरी इतिहासाच्या त्या टप्प्यावर या तत्त्वांना विनोबा देत असलेला अग्रक्रम गुरुजींना मान्य नव्हता असे म्हणायला जागा आहे. शिवाय हिंसेच्या वापराबद्दलदेखील गुरुजींची भूमिका विनोबा किंवा इतर गांधीवाद्यांपेक्षा भिन्न होती. श्यामची पत्रे 'मध्येच गुरुजी लिहितात, आम्ही हिंसेचे भक्त नसलो तरी हिंसा अपरिहार्य असेल तरच ती आम्ही करू. श्रीमंतांना, तुम्ही ट्रस्टी व्हा असे सांगता. कोणता श्रीमंत हे ऐकत आहे? या श्रीमंतांविरुद्ध आम्ही अहिंसक सत्याग्रह करून काय होणार? आमच्यावर गोळ्या घातल्या जाणार. आम्ही असे मरायला तयार नाही. उपासमारीने मरण. गोळीबाराने मरण. आमचे रोज मरणच आहे. ज्यामुळे मरण आहे त्याला नष्ट करायला आम्ही उभे राहू. हिंसा-अहिंसा आमच्यासमोर प्रश्‍न नाही. कोट्यवधी गरिबांची हाय हाय होत आहे. ही जी श्रमणाऱ्या लोकांची तीळ तीळ हिंसा होत आहे, ती थांबवण्यासाठी मूठभर लोकांची हिंसा करावीच लागली तर ती आम्ही करू...” गुरुजींची हिंसेविषयीची ही भूमिका १९३६ ते १९५० या काळात त्यांनी केलेल्या विविध लेखनात कमी अधिक प्रमाणात मात्र आलेली आढळते. गुरुजींचा हा वैचारिक प्रवास लक्षात घेतला, तर विनोबांचा १६ / साधना : १२ जून २०१० आश्रम सोडतानाची त्यांची मनोवस्था समजू शकते. साने गुरुजींनी विनोबांचा आश्रम सोडला तरी विनोबांबरोबरचे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध कायम राहिले. १९३६च्या फैजपूर काँग्रेसच्या तयारीसाठी गुरुजींनी प्रचंड मेहनत केली. त्या वेळी त्यांच्या प्रकृतीची काळजी विनोबा स्वतः जातीने घेत असत. प्रचारसभांत बोलून घसा बसलेल्या साने गुरुजींना विनोबा दररोज तूप-मीठ घातलेले पाणी स्वत: गरम करून देत असत. विनोबा आणि गुरुजींचे जिव्हाळ्याचे नाते स्पष्ट करणारी अनेक पत्रे दोघांनीही एकमेकांना लिहिलेली आहेत. १२ डिसेंबर १९४१च्या पत्रात विनोबा लिहितात, तुमची आमची हृदये एक आहेत. अनेक जन्मांचे आपण सोबती आहोत. कसलेही भेद-कल्पनेचे, काळाचे आणि स्थळाचे- आपणास अलग करू शकत नाहीत. मग भेटीची तळमळ कशाला? पण कधी कधी होते खरी. आणि हीच माझी मानवता. दुर्बळ पण सरळ; प्रेमळ आणि प्रांजळ... विनोबांचे गुरुजींविषयीचे हे ममत्व बिनशर्त होते. गुरुजींचा वैचारिक प्रवास स्वतंत्रपणे आणि समांतरपणे चालू झाल्यानंतरही विनोबांचा गुरुजींविषयीचा स्नेह कायम राहिला. गुरुजींची १९३८'च्या आसपास कम्युनिस्टांशी जवळीक झाल्यानंतरदेखील विनोबांनी




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now