नारायण सीताराम फडके | NARAYAN SITARAM PHADKE

Book Image : नारायण सीताराम फडके  - NARAYAN SITARAM PHADKE

More Information About Authors :

आशा सावदेकर - ASHA SAVDEKAR

No Information available about आशा सावदेकर - ASHA SAVDEKAR

Add Infomation AboutASHA SAVDEKAR

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
28 / ना. सी. फडके ममता तिला लाभली. त्याच्या मृत्यूनंतर सिनेमासारख्या वासनेने वखवखलेल्या दुनियेत तिला यदुनाथ हा तिच्या बडिलांचा चाहता भेटतो आणि संगीताच्या वैभवशाली दुनियेत प्रवेश होतो. यदुनाथच्या सहवासात तिचे मन जागे होते. फुलू लागते. पण विवाहित यदुनाथचा संसार उध्वस्त होआू नये म्हणून ती स्वतंत्र राहू लागते. य॒दुनाथबद्दलच्या भावना तिला व्यक्त करता येत नाहीत आणि तो त्या समजूनही घेअू शकत नाही. विचित्र रागाने घुमसत ती रघू कार्तिकच्या प्रेमात स्वतःला झोकून देते. पण मनातल्या मनात यदुनाथशी काय आणि कसे बोलायचे ते ठरवीत शहते. त “तुमचा संसार सुखाचा आहे त्या सुखात भुणेपणा आणायचा नाही मला. परंतु तुमचं थोडं तरी प्रेम माझ्या वाट्याला येअू द्या. तुमच्याविषयी फक्त कृतज्ञताच माझ्या मनात आहे, असं का समजता ? तुमच्या प्रीतीची मला भूक आहे. तुम्हाला शरीरसुख देण्याची ओढ माझ्या जिवाला लागलेली आहे. तुमची पत्नी होण्याचं भाग्य, माझ्या नशिबात नसेल तर नसू द्या, परंतु तुमची प्रेयसी - निदान दासी तरी होअू द्या मला .... नीट बघितलंत तर माझी व्यथा तुम्हाला खचित कळेल. जे तुम्हाला दिसत नाही ते दिसेल. जे तुम्हाला ऐकू येत नाही ते ऐकू येईल...'” अबोलीचे कार्तिकवरचे प्रेम वेडे आहे, त्यात देहासक्ती आहे. तिला रूप लाभले नव्हते तरीही रघू तिच्या रूपाचे गुणगान करीत असल्यामुळे तिला प्रिय होता. संताप, चीड, घृणा यामुळे रघूच्या फसवणुकीनंतर ती आत्मपरीक्षण करू लागते. तिला तिचा आनंद सापडतो तो कलासाधनेत. नियती ती कलाही तिच्यापासून हिसकावून घेते. तिचा आवाज अपघातात नाहीसा होतो. शेवटी मानसोपचाराच्या प्रयोगाने डॉ. प्रियदर्शन तिला हरवलेला सूर मिळवून देतो. काहीसे योगायोग आणि अपघात मान्य करूनही फडके यांनी अबोलीच्या व्यक्तिचित्रणातील वळणांचे सारे बारकावे फार जाणकारीने टिपले आहेत असेच म्हणावे लागते. काही लहान लहान व्यक्तिचित्रणेही फडक्यांच्या मर्मग्राही दृष्टीमुळे लक्षात राहण्याजोगी बनलेली आहेत. “निरंजन” मधील जान्हवी, “अटकेपार” मधील नायकाचे बडील शंभुराव, 'अंजली' मधील माधव, अशी काही अुदाहरणे सांगता येतील. 'अटकेपार' मधील शंभूरव सनातनी, संस्कृतप्रेमी. पण पत्नीला नवज्वर झाला असता ते योगवासिष्ट वाचत बसतात, तिचा ताप अुतरताच त्यांच्या डोळ्यातून पाणी येते. त्यांची मुलगी माई दुःखीकष्टी अबस्थेत माहेरी परतते तेव्हा यज्ञाच्या पवित्र समारंभात प्राप्त झालेली शाल अनिष्टाचे निवारण करण्याकरिता ते तिच्या अंगावर पांघरतात. भायेचा गुप्ते झरा दाखवून कटर सनातनी पिळदार व्यक्तित्वाला फडके यांनी वेगळा रंग प्राप्त करून दिलेला आहे. निरंजन मधील आन्हवीचे सतत आजारामुळे बिछान्याला खिळणे, त्यातून लहरी, चिडचिड्या व हेकेखोर वृत्तीमुळे पतीपासून तिचे दूर जाणे फडके चांगले टिपतात. मंदाकिनीशी निरंजनचे हसणेबोलणे टोचल्यामुळे असूया व संताप यांनी ती इतरांच्या मनस्तापाला कारणीभूत होते. पण मृत्यूची चाहूल लागताच ती मंदाकिनीचा हात मोठ्या मनाने आपल्या पतीच्या हातात देते. एक परिणामकारक स्वभावचित्रण म्हणून जान्हवी मनाला भिडते. ना. सी फडके यांचे कादंबरीविशव / 29 अंजली कादंबरीतील माधवचे व्यक्तिचित्रण त्यातील बदलांसकट फार ताकदीने रंगविण्यात फडके यशस्वी झालेले आहेत. पिता असूनही माधव त्यांच्या बालपणी पोरका आहे. एका मुलीच्या आक्रस्ताळेपणामुळे त्याला आर्ट स्कूल साडावे लागते आणि खीच्या निर्हेतुक प्रेम, सात्विकता या गुणांवरून त्याचा बिश्‍वास उडून जातो. पैसा हे साध्य आणि अप्रमाणिकपणा, फसवणूक ही साधने अशा दुनियेच्या बजबजाटात किंतीतरी काळ माणसाच्या अंतररगाचे सौंदर्य त्याला दिसत नाही. अंजलीच्या रूपाने ती ओढ त्याच्या आयुष्यात अवतरते आणि तिला वश करण्यासाठी वासनेच्या कचाय्यात त्याचे मन सापडते. पण विवाहित अंजली त्याला वासनेचा अंश काढून शुध्द केलेल्या प्रेमामुळे आयुष्यातील दु:खे कमी करण्याची नवी ताकदच जणू बहाल करते; आणि या विपरीत दुनियेतील सात्विक प्रेमसामर्थ्यापर्यंत त्याला घेन जाते. ही वासनांवर मात करण्याची मानसयात्रा फडके बारकाव्यानिशी चितारतात. फडक्यांनी कादंबरीसृष्टीत विकृतींचे चित्रण केले, जुळ्या भावांचे परस्परविरोधी स्वभाव टिपले, वेगवेगळ्या स्थळवर्णनांची पार्श्वभूमी निवडली, राजकीय वातावरण व चळवळी यांचे वर्णन करण्याची धडपड केली. त्यांनी संवादमाधुर्य, निसर्गवर्णन, वाक्चातुर्य यांचा भुपयोग केला पण अनुभवाची खोली टाळली. घटनास्थळांमध्ये विविधता आली तरी ते बाह्यांग आरले, वेगवेगळ्या कलक्षेत्राशी संबंधित नायकनायिका यांचे चित्रण केले तरी त्यांची वृत्तिभिन्नता त्यांना टिपता आली नाही. फडके गौरवग्रंथात श्री. के. क्षीरसागर यांनी फडके यांची दृष्टी नेमकी टिपलेली आहे. ते म्हणतात, *फडक्यांच्या वाडूमयकल्पनेत सुखद स्वप्नांना अधिक जागा आहे असे मी म्हणेन... भुत्कटतेपेक्षा रंजकतेला आणि खोल अनुभूतीपेक्षा सुखद आस्वादाला ते अधिक महत्त्व देतात.” मात्र ना. सी. फडके हे कुसुमावतीबा देशपांडे म्हणतात त्याप्रमाणे केवळ आरामोद्यान निर्मिणारे' नाहीत. त्यांच्या जवळ त्यांची अशी एक दृष्टी आहे. ती मर्यादित असली तरी विविधतेत रमणारी अशी ती दृष्टी आहे. पण आत्मतृप्तीमुळे खोली गाठता न येण्याची स्वत:ची मर्यादा त्यांना भुमगलेली नाही. त्यांना अभिरुची निर्माण करणे महत्त्वाचे वाटले. चांगले दृश्य पाहणे, सुंदर गाणे ऐकणे, अप्रतिम क्रीडानिपुण्य अनुभवणे, कलासौदर्यात रस घेणे, अुत्तमोत्तम गोष्टींचा आस्वाद घेणे हे त्यांनी आपल्या कादंबर्‍यांमधून टिपले. फडके यांच्या कादंबऱ्या वाचकवर्गाला का आकर्षित करू शकल्या त्याचे हे महत्त्वाचे कारण आहे. वि. वा. पत्की यांच्या 'आनंदयात्री' या पुस्तकाच्या प्रस्ताबनेत गंगाधर गाडगीळांनी फडके यांच्या वैशिष्ट्यावर नेमके बोट ठेवलेले आहे. ते म्हणतात, -- ' मध्यम स्थितीतला लहानसा का होईना, पण एक पांढरपेशांचा वर्ग निर्माण झाला होता. सामाजिक जीवनातल्या काचणाऱ्या बंधनातून तो हळूहळू मुक्त होत होता... आणि यामुळे ऐहिक जीवनाकडे, माणसामाणसातल्या संबंधाकडे आणि सुखोपभोगाकडे हा वर्ग एका नव्या दृष्टीने, मोकळ्या आणि स्वागतशील वृत्तीने पाहू लागला होता. त्या दृष्टीचे प्रतिबिंब या वर्गातील वाचकांना फडक्यांच्या कथा कादंबऱयांत अुमटलेले आढळले आणि साहजिकच या वाचकवर्गाला त्या अगदी मनापासून आवडल्या !''




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now