विज्ञानयुगाचे शिल्पकार | VIGYANYUGACHE SHILPKAR

Book Image : विज्ञानयुगाचे शिल्पकार  - VIGYANYUGACHE SHILPKAR

More Information About Authors :

कोगेकर - KOGEKAR

No Information available about कोगेकर - KOGEKAR

Add Infomation AboutKOGEKAR

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
२४ : विज्ञानयुगाचे शिल्पकार/रे लव्हॉयझिअरवर ठेवून अशा मनुष्याला सर्वांत नजीकच्या दिव्याच्या खांबावर फाशी द्यावे असा प्रचार सुरू केला. सदर आरोप जरी उघड उघड विसंगत, असंबद्ध अश्या स्वरूपाचे होते तरी फ्रेंच राज्यक्रांतीनंतरच्या हिसाचाराच्या कालात, मॅरटच्या आरोपांनी जनतेच्या अविवेकी मनाची चांगलीच पक्कड घेतली होती. त्यामुळे लव्हॉयझिअरला कैद करून तुरुंगात टाकण्यात आले ब वरील गुन्ह्यांसाठी अखेर त्याला फाशी द्यावे अशी न्यायालयाकडून शिक्षा ठोठावण्यात आली. त्याने वैज्ञानिक क्षेत्रात केलेल्या बहुमोल कामगिरीकडे पाहुन तरी त्याची फाशीची शिक्षा रद्द करावी अशी विनंती त्याच्या चाहत्यांनी व अनेक प्रतिष्ठित फ्रेंच नागरिकांनी न्यायाधीशाला केली पण' त्यांचा काही' उपयोग झाला नाही. उलट न्यायाधीशांनी असे उद्‌गार काढले म्हणतात की, “ फ्रेंच प्रजासत्ताकाला शास्त्रज्ञांची जरुरी नाही.” फ्रेंच राज्यक्रांतीनंतरच्या उदग्र हिसाचाराच्या धामधुमीत न्यायाधीशाच्या न्यायबद्धीला सर्वस्वी तीलांजली दिली गेली हेच खरे ! न्यायाधीश्षाचा उद्वेग आणणारा करील निकाल व' त्यानंतर त्याने तोंडावाटे उधळलेली मृक्‍्ताफळे ऐकल्यानंतर थोर फ्रेंच गणितज्ञ ला ग्रांज म्हणाला, “ लव्हॉयझिअरचा शिरच्छेद करण्यासाठी केवळ एक क्षण पुरा पडेल, परंतु त्याच्यासारखा श्रेष्ठ शास्त्रज्ञ-संशोधक निर्माण होण्यासाठी एका शतकाचा दीर्घ काल लोटावा लागेल.” फ्रान्सची राजधानी जी पॅरिस त्या शहराच्या एका भपकेबाज भागात २६ आगस्ट १७४३ रोजी अँटनी लवब्हॉयझिअरचा जन्म झाला. त्याचे वडील एक श्रीमंत जमीनदार व व्यापारी होते. अँटनी सात वर्षांचा झाला आणि त्याची आई वारली. त्याबरोबर तो आपल्या आजीच्या भव्य अशा प्रासादात राहावयास गेला. त्याचे वडील व त्याची एक नि:स्वार्थ अविवाहित चुलती या दोघांनी, अतिशय ममतेने त्याचे संगोपन केले. आपल्या मुलाने मोठेपणी कायद्याचा अभ्यास करून' एक निष्णात कायदेपंडित व्हावे अली त्याच्या वडिलांची इच्छा होती. त्याप्रमाणे वडिलांच्या इच्छेला मान देऊन अँटनीने आपले कायद्याचे शिक्षण पॅरिसमधील मॅझेरिन या कॉलेजातून योग्य वेळी पूर्ण केले व वकिलीची सनदही मिळविली. मात्र त्याचा नैसगिक कल कायद्या- पेक्षा विज्ञानाकडेच अधिक होता. कॉलेजचे हिक्षण घेत असता अॅन्टनीने अन्टनी छव्हॉयझिअर : २५ तात्विक रसायन शाखेचे प्राध्यापक बोरदेलिआं यांची रसायनदास्त्रावरील व्याख्याने नियमाने ऐकली. कारण रसायनश्ास्त्राची त्याला फार आवड होती. अशा व्याख्यानांबरोबर व्याख्यात्या सहाय्यकाकडून जी प्रात्यक्षिके दाखविली जात ती त्याला फार आवडत. स्विस्‌ वैज्ञानिक लिनॉस्‌ व अँन्टती या दोघांची भेट झाली तेव्हा भावी आयुष्यात आपण कायदेपंडित होण्याऐवजी वैज्ञानिक व्हावयाचे असे अँन्टनीने आपल्या मनाशी ठरवून टाकले. पॅरिस शहरासाठी कार्यक्षम व आदर्श प्रकाश योजना तयार करण्यासाठी जी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यात लक्हॉयझिअरने सादर केलेली योजना परीक्षकांचे मते सर्वोत्कृष्ट ठरल्यामुळे बावीस वर्षांच्या लव्हॉयक्षि- अरला, फ्रँच अकेंडेमी ऑफ सायन्सेस या संस्थेने एक सुवर्णपदक बहाल केले. फ्रान्स देशाचा भूवेज्ञानिक अभ्यास करणारा अहवाल तयार करण्याबद्दल, तसेच कॅल्शम सल्फेट व प्लॅस्टर ऑफ पॅरिस या द्रव्यांवर संशोधन करण्याबद्दल वरील संस्थेने लव्हॉयझिअरला आपला सभासद म्हणूनही निवडले. संस्थे कडून निवडल्या जाणाऱ्या अशा सभासदांवर, नगरविषयक काही जबाब- दार्‍्या पार पाडण्यास मदत करण्याचे बंधन असे. विज्ञानाशी संबंधित अश्या नागरी जीवनातील प्रदनांची सोडवणूक करण्याची जबाबदारी संस्थेकडून संबंधित सभासदावर टाकण्यात येई. उदाहरणार्थ: पॅरिस शहराच्या पाणी- पुरवठ्यात सुधारणा सुचविणे. पॅरिसमधील मलश्रणालाना (स्यअस॑ ) येणारा घाण वास नाहीसा करण्यासाठी उपाय सुचविणे, सार्वजनिक इमारतीत थंडीचे दिवसात उबदारपणा टिकवून ठेवण्यासाठी योजना आखणे, आग विझंविण्याच्या पद्धतीत सुधारणा घडवून आणणे इत्यादी, इत्यादी. जँक्यूस पॉलसो नावाच्या एका फ्रेंच उमरावाबरोबर लव्हॉयझिअरचा परिचय होऊन, त्याने दिलेल्या सल्ल्यावरून तो शेतजमीन महयूल वसूल करणाऱ्या मक्‍्तेदारांच्या संघटनेत सामील झाला व हे काम करणारा एक मक्तेदार म्हणून त्याने आपले नाव सरकारात नोंदवले. या संघटनेचे मक्तेदार सभासद शेतजमिनीच्या विशिष्ट क्षेत्राबद्दल सरकारने ठरवून दिलेली रक्कम प्रथम स्वतः सरकारात भरीत व नंतर सदर रक्‍कम जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांकडून वसूल करण्याचे काम आपण स्वतः अगर आपल्या पगारी हस्तकांकरबी पार पाडीत. या मक्‍्तेदारांचा व त्यांच्या हस्तकांचा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now