शास्त्रज्ञ व्हा | BECOME A SCIENTIST
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
1 MB
Total Pages :
18
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
अंजली तलेगावकर - ANJALI TALEGAONKAR
No Information available about अंजली तलेगावकर - ANJALI TALEGAONKAR
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)पदार्थांच्या घनतेचा ध्वनीच्या गतीवर परिणाम होतो का ? अंदाज
लिहून ठेवा. या प्रयोगासाठी ७५ फूट लांबीचे तारेचे कुंपण हवे. मोठ्या
ग्राऊंडभोवती मिळेल. तुम्ही एका टोकाला उभे रहा व मित्राला दुसऱ्या
टोकाला उभे करा. तुम्ही तारेच्या कुपणाला कान लावा. मित्राला दुसऱ्या
बाजूने दगडाने तारेवर घासायला सांगा
तुम्हाला दोन आवाज ऐकू येतात का ? एकामागे एक. हवेतून एक
आवाज येतो व तारेतून एक. ध्वनिलहरी हवेतून जलद जातात की
घन पदार्थातून ?
उत्तर : पाण्यामध्ये दगड जोरात आपटता येत नाहीत. त्यामुळे
आवाज ऐकू येत नाही. किंवा बारीक आवाज येतो.
२७. वाद्ये तयार करूया.
जलतरंग
आठ एकसारख्या बाटल्या घ्या. (जुन्या सॉसच्या रिकाम्या बाटल्या
मिळू शकतील) एक बाटली पूर्ण रिकामी ठेवा. एक बाटली पूर्णपणे
पाण्याने भरा. या दोन बाटल्या दोन टोकांना ठेवून मधल्या बाटल्यात
वेगवेगळ्या उंचीपर्यंत पाणी घाला. पहिल्या रिकाम्या बाटलीनंतर थोडे
पाणी असलेल्या बाटल्या ठेवा. शेवटी पूर्णपणे भरलेली बाटली ठेवा.
एक छोटी गोल काठी घ्या (रॉड) व तिने प्रत्येक बाटलीच्या
आस्ज्ञ व्हा & २८
तोंडावर हळूच आपटा. सूर निघेल. कोणत्या बाटलीतून उच्च स्वर येतो?
इतर बाटल्या त्यातून निघणाऱ्या स्वराप्रमाणे लावा. सर्वात लहान स्वर
कोणत्या बाटलीतून येतो? नेमकी कशाची स्पंदने होतात? हवेची
पाण्याची की काचेची?
आता बाटल्यांऐवजी एकसारखे कप, एकसारख्या ताटल्या अथवा
वाट्या घेऊन वरीलप्रमाणे करा. कोणता फरक आढळतो?
उत्तर : स्पंदने हवेची होतात. ज्या बाटलीत हवा कमी असेल,
तेथून उच्च स्वर येतो.
२८. चुंबकीय क्षेत्राचा ब्लू-प्रिंट काढणे.
लोहचुंबकाचे चुंबकीय क्षेत्र तसे डोळ्यांना दिसत नाही. परंतु
लोखंडाच्या किसाच्या साहाय्याने ते दृश्य स्वरूपात, दाखविता येते. भरपूर
सूर्यप्रकाश असेल, अशा दिवशी हा प्रयोग करायचा. प्रयोग करताना
वारा नको.
दोन काचेच्या तुकड्यांमध्ये ब्लू-प्रिंट पेपर घाला. प्रथम हे सर्व
सावलीतच करायचे आहे.
ब्लू-प्रिंट पेपर स्टेशनरीच्या मोठ्या दुकानात मिळेल. लोखंडाचा
कीस शास्त्रीय उपकरणांच्या दुकानात मिळेल. लोहचुंबकही याच दुकानात
मिळेल.
एक पट्टी लोहचुंबक घ्या. त्यावर ब्लू-प्रिंट पेपर काचेच्या
तुकड्यांसह अलगद ठेवा. काचेवर लोखंडाचा कीस पसरा. लोखंडाचा
कीस चुंबकीय क्षेत्राप्रमाणे नक्षी तयार करील. ही नक्षी न बिघडवता
काचेसह ब्लू-प्रिंट पेपर उन्हात ठेवा. कागदावरचा रंग जाईपर्यंत उन्हात
ठेवा. नंतर आत आणा. वरचा लोखंडाचा कीस डब्यात ओता. ब्लू-
प्रिंट पेपर काढून पाण्यामध्ये बुडवून काढा.
चुंबकीय क्षेत्राचा ब्लू-प्रिंट काढणे £ २९
User Reviews
No Reviews | Add Yours...