टपाल तिकिटांची अद्भुत कथा | TAPAL TICKITANCHI ADBHUT KATHA

TAPAL TICKITANCHI ADBHUT KATHA by एस० पी० चटर्जी - S. P. CHATERJEEपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

एस० पी० चटर्जी - S. P. CHATERJEE

No Information available about एस० पी० चटर्जी - S. P. CHATERJEE

Add Infomation AboutS. P. CHATERJEE

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
. झाल्यावर आता ती तिकिटे अल्बम आणि चिमटे आहे. आता पहिली गोष्ट कोणती करायची तर वापरलेली तिकिटे कागदावखून सुटी करून घेणे. त्यांच्या मागे लागलेला जुना डिंकाचा थर काढून टाकून तिकीट स्वच्छ करा. हे करण्यापूर्वी तुमच्या संग्रहातील तिकिटांचे वर्गीकरण करून ठेवा. खूपच खराब झालेली तिकिटे ज्यांचे डिझाईन फाटलेले आहे, कोपरे गेलेले आहेत, छिद्रांची ' कड कापली गेली आहे, किंवा पोस्टाच्या शिक्क्यातील शाई तिकिटावर जास्त पसरलेली आहे, अशी तिकिटे संग्रहातून बाजूला काढा. इतकी सगळी तिकिटे काढून टाकणे तुमच्या जीवावर येईल, पण ते करण्यात कोणतेही अनमान करू नका. कारण तुमचे ध्येय, एक उत्तम प्रतीचा तिकीट संग्रह बनवणे आहे आता एका भांड्यात थंड पाणी घेऊन त्यात तुम्ही निवडलेली चांगली तिकिटे टाका ती पाण्याखाली बुडवून हलक्या हाताने कागदावरून ती वेगळी करा. एकाच वेळी सर्व तिकिटे पाण्यात टाकू नका. एका वेळी मूठभर किंवा दोन मुठी तिकिटेच पाण्यात टाका. त्यांना भिजण्यासाठी पुरेसा वेळ द्या. त्यामुळे कागदावरून तिकिटे आपोआप सुटी होतील. तिकिटे पाण्यात भिजवली की काही तिकिटावरची शाई पाण्यात उतरते अशी तिकिटे पाण्यातून चटकन काढून घ्या, नाही तर भांड्यातील इतर तिकिटेही खराब होतील. जी तिकिटे कच्च्या रंगांच्या शाईत छापली गेली असतील अशी तिकिटे बाजूला काढून वेगळी आणि काळजीपूर्वक भिजवावी. कागदापासून सुटी झालेली तिकिटे चिमट्याने उचलून 'स्वच्छ कागदावर डिझाईनची बाजू खाली करून वाळायला ठेवावी. जशी ती वाळू लागतील तसे त्यांच्या कडा वरच्या बाजूने वळू लागतील. अशी तिकिटे सपाट करून काही तासांसाठी एखाद्या पुस्तकात घालून ठेवावी, त्यामुळे ती सपाट होतील. भिजवून, वाळवून आणि सपाट करून तुमच्या अल्बममध्ये चिकटण्यास सज्ज झाली असे समजावे. आता ज्या क्रमाने तिकिटे लावण्याची तुमची योजना १, कागदी बिजागरीची घडी कशी घालावी. २. घडी घातलेली कागदी बिजागरी टपाल तिकिटामागे कशी चिकटवावी पाठीमागे लावलेल्या डिंकाचा डाग पडून तिकीट खराब होण्याची शक्‍यता असते. बिजागरी तिकिटावर चिकटवल्यानंतर बिजागरीचे दुसरे टोक हवे तेवढेच ओलसर ३ आणि ४ तिकीट संग्रहाच्या पानावर य॒पाल तिकीट कसे चिकटवावे. असेल त्या प्रमाणे ती वेगवेगळी करून त्या त्या पानावर पसखन ठेवा. कागदी बिजागरीची एका कडेपासून एक तृतीयांश किंवा एक चतुर्थांश अंतरावर घडी घालून छिद्राच्या कडेपासूनची तिकिटाची मागची बाजू घडीच्या आखूड भागावर चिकटवा. बिजगरी चिकटवताना ती खूप ओली करू नका. विशेषतः न वापरलेल्या कोऱ्या तिकिटांना खूप ओले केल्यास त्यांच्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now