स्वगार्ची सहल | SWARGACHI SAHAL
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
18 MB
Total Pages :
34
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
लीलावती भागवत - LEELAVATI BHAGWAT
No Information available about लीलावती भागवत - LEELAVATI BHAGWAT
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)28
त्या वर्षी पूजेच्या निमंत्रणाच्या वेळी कमळा गोपाळला म्हणाली. “हे बघा,
उमावन्संनापण पूजेला बोलवा. त्यांना न. बोलावणं नाहीतरी चूकच. किती झालं
तरी ती तुमची सख्खी बहीण आहे. मुलांना घेऊन या म्हणावं. स्वतः जाऊन
बोलवा.”
गोपाळ हो म्हणाला आणि उमाच्या घरी जाऊन तिला निमंत्रण देऊन
आला. दखर्षीप्रमाणे पूजेची तयारी झाली, सगळी माणसे जमली. पण यंदा
त्यांची सरबराई करण्याकडे गोपाळचे लक्ष नव्हते. कमळाचेही नव्हते. ती दोघे
. उमाची वाट पाहात होती,
इतक्यात दारात गाडी वाजली. गोपाळ पुढे धावला. त्याने हाताला
(धरून उमाला गाडीतून उतरवले. सगळी लोक बघत होती. उमा आज
बुट्ट्यांचा शालू नेसली होती. दागिन्यांनी खप सजली होती. अंगावर
भरजरी शाल पांघरलेली होती. पण आज ती एकटीच होती. मुले नव्हती
तिच्याबरोबर.
ती आत आल्याबरोबर गोपाळने तिला बसण्यासाठी नक्षीदार चौरंग दिला.
तिच्यापुढे एक चांदीची थाळी ठेवली, त्यात सगळी पंचपक्वान्नं वाढली.
त्या. थाटमाटाकडे पाहून उमा हळूच हसली. गोपाळ जवळ उभा होता.
कमळापण उभी होती. उमा म्हणाली, “गोपाळ, आणखी एक चौरंग हवा
आहे मला.”
तिने म्हणायचा अवकाश की आणखी एक चौरंग हजर झाला. उमाने
आपल्या अंगावरची शाल काढून त्या दुसऱ्या चौरंगावर ठेवली. गोपाळला वाटले
तिला उकडत असेल. त्याने कमळाला सांगितले.
“जा पंखा घेऊन ये. ताईला उकडतंय, दिसत नाही १”
वामळा पंखा घेऊन आली आणि उमाला वारा घालू लागली. उमाने आता
आपला एकेक दागिना उतरून दुसऱ्या चौरंगावर ठेवायंला सुरवात केली.
29
गोपांळ म्हणाला, “ओझं झालं असेल ताई तुला दागिन्यांचं. इतके भारी दागिने
आहेत.” आणि कमळाला म्हणाला --- “पंखा जरा जोराने हालव. ताईला
उकडतंय, दागिन्यांचं औझं झालंय.” कमळा जोराने वारा घालू लागली. भग
उमाने सगळे दागिने उतरवून झाल्यावर एकेका दागिन्यावर चांदीच्या ताठातला
एकेक घास उचलून ठेवायला छुरुवात केली. सगळी आरश्चयीने बघत होती.
गोपाळने आरचर्याने विचारले, “ताई हे काय करतेस!” तेव्हा उमा हसून
User Reviews
No Reviews | Add Yours...