सत्यनारायण पोथीतील कथा | SATYANARAYANCHA POTHITEEL KATHA

SATYANARAYANCHA POTHITEEL KATHA by खट्टर काका - KHATTAR KAKAपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

खट्टर काका - KHATTAR KAKA

No Information available about खट्टर काका - KHATTAR KAKA

Add Infomation AboutKHATTAR KAKA

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भरात काठाजवळ येत असलेली नाव नदीत बुडते. कलावती रडू लागते. सत्यनारायण पुन्हा एकदा प्रत्यक्ष होत तू नवऱ्याला भेटण्याच्या गडबडीत माझा प्रसाद आणायचा विसरलीस. हा माझा घोर अपमान आहे. आता माझे ऐक. तू परत जा व प्रसाद घेऊन ये. तोपर्यंत तुझा नवरा व बाप नदीच्या तळाशी असतील. कलावतीसमोर दुसरा मार्ग नव्हता. पळत पळत घरी जाते. प्रसाद खाते व राहिलेला प्रसाद घेऊन येते. व देवाची इच्छा पूर्ण करते. काका म्हणाले, “मला कळत नाही की एक तरूण स्त्री आपल्या नवऱ्याला भेटण्यासाठी उतावीळ होऊन पळत आल्यास या सत्यनारायणाला याचा का हेवा वाटावा? या प्रकारच्या गोष्टी चित्रपटातील व्हिलनला शोभतात. परंतु तो हा देव एखाद्या खल्ननायकाप्रमाणे वागत होता. शेवटी कलावती मेल्यानंतर सत्यलोकी पोचली असेल. ती त्या ठिकाणी कशी काय रहात असेल, ते स॒त्यनारायणच जाणे. त्यामुळे सत्यनारायणाचे नाव ऐकले की माझी धडकी भरते.” “काका, सत्यनारायणाच्या पूजेत चारच कथा का आहेत - एकच पुरेशी ठरली असते की.” “त्याचे काय आहे की हिदू धर्मातील चार वर्णाच्या लोकांनी पूजा करावी हा उद्देश त्यामागे असल्यामुळे प्रत्येक वर्णासाठी कथा आहेत. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांच्यासाठी एकेक कथा आहेत. ब्राम्हण श्रीमंत झाला. क्षत्रिय राजाला काही ब्रास झाला नाही. वैश्य व्यापाऱ्याचे वैभव परत आले. आणि लाकूडतोइ्याला दुप्पट मजूरी मिळाली. या कथांचा हा सारांश आहे. खरे पाहता कथेत वर्णन केल्याप्रमाणे असे प्रसंग भोवताली नेहमी घडत असतात. त्या कठिण प्रसंगांचा पूजा करण्याशी वा पूजा न करण्याशी काहीही संबंध नाही.लीलावती गर्भवती झाली यात विशेष काय होते? आपल्या येथील अब्दुलला बारा मुलं आहेत. त्यानी कुठली पूजा केली होती? आपल्या शेजारच्या चौधरीच्या घरी दर महिन्याला पूजा होत असूनसुद्धा त्याला मूल का होत नाही? तो विश्वंभर भटजी आयुष्यभर देवासमोर ठणाठणा घंटा वाजवत असतो. परंतु राहण्यासाठी धड घर नाही. या उलट भिकूशेठ धान्याचा काळाबाजार करून तीन मजली घरात आरामात राहतो. स॒त्यनारायणांनी त्याची संपत्ती हिसकावून का घेतली नाही?” “म्हणजे सत्यनारायणाच्या कथेत सत्य नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे का?” “जरा तूच विचार कर. सुरुवातीपासून शेवटपर्यंत या कथा ऐकताना हा सत्यनारायण कपटी, स्वार्थी, दुष्ट असावा की काय असेच वाटतो. एखाद्या दुष्ट माणसापेक्षा तो जास्त वाईट वागतो. गोष्टीतल्या माकडासारखे त्याचे एकूण वर्तन आहे. हातातील केळी फेकून देतो, अशी भीती दाखवायची व नतर गंमत म्हणून केळी तुमच्या हातात द्यायची. त्यामुळे अशा देवाची भक्ती, पूजा कशी काय करायची हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे.” “परंतु सत्यनारायणाची पूजा केल्यास व भक्तीभावाने त्याची कथा ऐकल्यास ह्या देव प्रसन्न होऊन इष्टफळ देतो असे सांगितले जाते.” “माहित नाही. कदाचित... परंतु हाडवैर असलेले एकमेकासमोर शहडू ठोकून उभे असलेले दोघेही पूजा करू लागले तर कुणाला इष्ट फळ मिळेल हे सांगता येईल का?”




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now