डोळयांचे तारणहार - अरविन्द नेत्रालय | STORY OF THE ARAVIND EYE HOSPITALS
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
306 KB
Total Pages :
10
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
नीलम जोशी - NEELAM JOSHI
No Information available about नीलम जोशी - NEELAM JOSHI
पावी मेहता - PAAVI MEHTA
No Information available about पावी मेहता - PAAVI MEHTA
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)करण्यापासून कोणीच परावृत्त करू शकत नव्हते. ह्या मागे डॉक्टर वी. ह्यांचा एक दूर दृष्टीकोन
होता, ज्याचा ते नेहेमीच उल्लेख करत असत. अरविंद नेत्रालायाचे काम एखाद्या यंत्रा सारखे, फक्त
लोकांना त्यांची दृष्टी परत मिळवून द्यायची एवढेच नव्हते. हे नेत्रालय लोकांना सन्मानपूर्वक
वागणूक देते आणि त्यांच्या आत्मसन्मानाला कधीच ठेच पोचणार नाही हयाची कायम काळजी घेते.
ह्या हॉस्पिटलच्या मॉडेल मध्ये लोकांची प्रतिष्ठा राखणे ह्याला अव्वल स्थान होते. इथे आपण एका
गरीब देशातील लोकांबद्दल बोलतोय, येथील ग्रामीण भागात इष्टिहीन झाल्यावर लोक केवळ २-३ वर्षे
कसेबसे जगतात. भारतात आंधळं असणं म्हणजे एक महाभयंकर शाप आहे. इष्टी गेल्यावर आपले
उदरनिर्वाहाचे साधन तथा / तसेच नोकरी जाते. अशाने/ असे झाल्यानंतर हे लोक, समाजात आणि
कटंबात आपले स्थान गमवन बसतात. त्यांच्या आत्मसन्मानाला जबरदस्त धक्का बसतो. ह्या
पार्श्वभमीवर अरविंद नेत्रालय जे काम करत आहे ते महत्वाचे आहेच, पण त्याही पलीकडे जाऊन ते
नक्की काय करतात हे समजून घेणे अधिकच गरजेचे आहे. हे हॉस्पिटल उपचारासाठी दाखल झालेल्या
रुग्णांचा आदर कसा राखू शकते? असे करण्यासाठी त्यांनी एक अनोखी शुल्क आकारणीची पद्धत
अवलंबिली. हया पद्धतीनुसार रुग्ण स्वत:च ठरवू शकत असे - तो झिरो-फीज देणार की
मार्केट-रेट देणार. तसा तो निर्णय घेऊ शकत असे. हा पर्याय लोकांच्या अस्मितेला, सन्मानाला
सांभाळणारा व लीन न करणारा होता. म्हणून जेव्हा रुग्ण पैसे देतात, त्या पैशांनी नि:शुल्क सेवा
घेणाऱ्या रुग्णांचा खर्च भागतो. पैसे देणारे तसेच नि:श॒ल्क उपचार घेणारे अशा दोन्ही प्रकारच्या
रुग्णांची सेवा करणारी डॉक्टरांची टीम एकच असते. हयामळे नि:शल्क रुग्ण अन्य रुग्णांसोबत एकाच
खोलीत राहत असतात आणि एका सामुदायिक खानावळीत जेवतात. दुसरीकडे स:शुल्क उपचार घेणारे
रुग्ण स्पेशल संलग्न बाथरूम असलेल्या वातानकलीत खोलीत आपल्या सहाय्यकाबरोबर राहू शकत
होते. ह्या साठी त्यांना अतिरिक्त पैसे मोजावे लागत असत. अशा तर्हेने हे हॉस्पिटल आर्थिक ट्ष्ट्या
समर्थ लोकांच्या सहाय्यतेने गरीब लोकांची शुश्रुषा करते. ह्या हॉस्पिटलचा मुख्य उद्देश नफा कमावणे
नसून, सेवा करणे हा आहे.
पूर्ण जबाबदारी स्वतःच उचला
अरविंद नेत्रालय सुरु केल्यावर लवकरच एक बाब सुस्पष्ट झाली. मोफत उपचाराची सोय असून सुद्धा
गरजू लोक उपचारासाठी तिथे येत नसत. खास करून गरीब लोक, ज्यांना नेत्र शस्त्रक्रियेची खरोखर
गरज होती, तेच येत नसत. तेव्हा तिथे आलेल्या एका अंध भिकाऱ्यामुळे त्यांना खरी अडचण लक्षात
आली. तो म्हणाला, तुम्ही म्हणता की तुमचा ईलाज नि: शुल्क होईल. पण ह्या हॉस्पिटल मध्ये
दाखल होण्यासाठी मला बसचे तिकीट काढावे लागेल. इथे पोचल्यावर मला राहण्याची सोय करावी
लागेल. जेवणाची व्यवस्था करावी लागेल. दृष्टिहीन असल्यामुळे कदाचित मला मदतीशिवाय
एकट्याने हॉस्पिटल मध्ये यायला जमणार नाही, कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. जर मी माझ्या
मलीला इथे सोबत घेऊन आलो तर तिला एका दिवसाच्या मजरी वेतनाला मृकावे लागेल. अशा तर्हेने
तुमची नि:शुल्क सेवा माझ्यासाठी खर्चिक होईल आणि मला कमीत कमी शंभर रुपये खर्च येईल.
बरेचदा फुकट दिलेली सेवा गरिबांसाठी महागडी पडते आणि ते त्याचा लाभ घेऊ शकत नाही. हे
ऐकल्यावर अरविंद नेत्रालयाने काय केले असेल? अरविंद नेत्रालय काही वाहतूक कंपनी नव्हती आणि
त्यांच्या स्वत:च्या बसेस नव्हत्या. आणि हॉस्पिटल मध्ये राहण्यासाठी खोल्या मोजक्याच होत्या. त्या
टृष्टिहीन भिकाऱ्याचे बोलणे ऐकल्यावर, गरिबांच्या अडचणी लक्षात घेऊन अरविंद नेत्रालयाने
रुग्णाच्या हया सगळ्या गरजा पूर्ण करायचे ठरवले. सध्या अरविंद नेत्रालय आपल्या डॉक्टर आणि
User Reviews
No Reviews | Add Yours...